agriculture news in marathi, Investigations Rs 1.5 crore of green gram | Agrowon

उडदाचे दीड कोटी रुपयांचे चुकारे अडकले चौकशीच्या फेऱ्यात
टीम अॅग्रोवन
सोमवार, 8 जानेवारी 2018

हिंगोली : हिंगोली येथील नाफेडच्या खरेदी केंद्रांवर उडिद खरेदीमध्ये अनियमितता आढळून आल्यामुळे सुमारे ६०० शेतकऱ्यांचे १ कोटी ५० लाख रुपयाचे चुकारे थांबविण्यात आले आहेत. या प्रकरणाची चौकशी मुंबईच्या पथकामार्फत केली जाणार असून त्यानंतरच शेतकऱ्यांना चुकारे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. परंतु त्यासाठी चौकशी तत्काळ पूर्ण करून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.

हिंगोली : हिंगोली येथील नाफेडच्या खरेदी केंद्रांवर उडिद खरेदीमध्ये अनियमितता आढळून आल्यामुळे सुमारे ६०० शेतकऱ्यांचे १ कोटी ५० लाख रुपयाचे चुकारे थांबविण्यात आले आहेत. या प्रकरणाची चौकशी मुंबईच्या पथकामार्फत केली जाणार असून त्यानंतरच शेतकऱ्यांना चुकारे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. परंतु त्यासाठी चौकशी तत्काळ पूर्ण करून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.

आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गंत हिंगोली येथे खरेदी विक्री संघामार्फत नाफेडची उडिद खरेदी सुरू करण्यात आली होती. परंतु उडिद खरेदीनंतर जिल्हा विपणन अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आलेला अहवाल आणि प्रत्यक्षात झालेली खरेदी, वखार महामंडळाच्या गोदामात साठविलेला माल यांमध्ये तफावत येत आहे. शेतकऱ्यांना चुकारे अदा करण्यासाठी वखार महामंडळाच्या गोदामात साठवण केलेल्या शेतमालाचा योग्य अहवाल विपणन अधिकारी कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक आहे.

या खरेदी केंद्रावर अनियमिता आढळून येत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे जिल्हा विपणन अधिकारी कार्यालयाने २५ नोव्हेंबर पासून खरेदी विक्री संघाकडून केली जाणारी खरेदी बंद करण्यात आली. त्यानंतर ९ डिसेंबर पासून कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत खरेदी करण्यात आली. खरेदी विक्री संघामार्फत ६७३ शेतकऱ्यांच्या ३ हजार ३४ क्विंटल उडिदाची खरेदी करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना चुकारे अदा करण्यासाठी नाफेडकडून जिल्हा विपणन अधिकारी कार्यालयाकडे निधी प्राप्त झालेला आहे. परंतु खरेदीतील अनियनिमेतेच्या तक्रारीमुळे सुमारे ६०० शेतकऱ्यांच्या उडिदाचे १ कोटी ५० लाख रुपयाचे चुकारे थांबविण्यात आले आहेत.

या केंद्रावर खरेदी करण्यात आलेला उडिद शेतकऱ्यांचाच आहे का, याबाबत सात-बारा, पेरणी क्षेत्र, आधारकार्ड, बॅंक पासबूक आदीसह खरेदी केंद्रावरील अभिलेखांची पडताळणी चौकशी पथकाकडून केली जाणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर कायमनगर  : अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
स्वाभिमानीचा सर्जिकल स्ट्राईक,...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून...
सातारा जिल्ह्यात दूध दरप्रश्नी तिसऱ्या...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...
संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखीचे सोलापूर...सोलापूर : पिटू भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा...
कोयना, कण्हेर धरणांतून विसर्गसातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी...
कर्नाटकातून येणारे दूध आंदोलकांनी अडवलेसोलापूर :  दुधाच्या वाढीव दरासाठी स्वाभिमानी...
किणी टोल नाका येथे पोलिसांची जबरदस्ती;...कोल्हापूर- : स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने पुणे...
कनिष्ठ सहायकाची एक वेतनवाढ बंदनाशिक  : जिल्हा परिषदेची सभा असो की मुख्य...
भेंडीची वेळेवर लागवड आवश्यकभाजीपाला पिकांमध्ये भेंडी पिकाची लागवड वाढत आहे....
दूध दरप्रश्‍नी राज्य सरकार दोषी : राज...पुणे  ः दूधदराचा प्रश्न गंभीर होत आहे....
पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये १०६ टीएमसी...पुणे  : जिल्ह्यातील पश्‍चिम भागात असलेल्या...
बुलडाणा, वाशीममध्ये दूध दरप्रश्‍नी...अकोला  ः दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दर...
पोषक घटकांनीयुक्त शेळीचे दूधभारतामध्ये प्रामुख्याने गायीच्या व म्हशीच्या...
मराठवाड्यात तिसऱ्या दिवशीही दूध...औरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या गेलेल्या...
कोल्हापुरात हिंसक वळणकोल्हापूर : दूध आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी...
चंद्रकांतदादांच्या आश्वासनानंतर उपोषण...परभणी  ः पीकविमा परताव्यापासून वंचित...
शेतकऱ्यांना बोंड अळीची नुकसानभरपाई...नाशिक  : गेल्या वर्षी बोंड अळीमुळे कापूस...
खानदेशात ८० टक्के पेरणी उरकलीजळगाव : खानदेशात जवळपास ८० टक्के क्षेत्रावर पेरणी...
हाँगकाँग येथे जांभळ्या रताळ्यापासून...हाँगकाँग येथील एका खासगी साखळी हॉटेल उद्योगाने...
फ्लाय अॅशपासून कॉंक्रिटची निर्मिती शक्यसध्या टाकाऊ समजल्या जाणाऱ्या फ्लाय ॲशपासून अधिक...