उडदाची आवकही घटली, मुगाची जवळपास बंदच

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची सध्या अत्यल्प आवक आहे. त्याला दरही २५०० रुपये प्रतिक्विंटलपासून २९०० रुपयांपर्यंत आहे. दर अपेक्षित नसतानाच पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

मागील वर्षी १० ऑक्‍टोबरपासून सोयाबीनची आवक वाढली होती. प्रतिदिन किमान ५०० ते ६०० क्विंटल आवक होत होती. यंदा मात्र अद्याप प्रतिदिन १५० ते २०० क्विंटल आवक होत आहे. दरही दर्जा व इतर मुद्यांमुळे २५०० ते २९०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. दरांबाबत निराशाजनक स्थिती असल्याने अनेक शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये सोयाबीन आणणे टाळले आहे.

सध्या दिवाळीपूर्वीची तयारी बाजार समितीमधील अडतदार करीत आहेत. परंतु उडदाचे लिलाव सुरू असून, लिलाव प्रक्रिया सुरळीत आहे. उडदाची रोज ५०० क्विंटल आवक होत आहे. परंतु मुगाची आवक मात्र घटली आहे. मुगाची आवक घटल्याने दालमीलचालक हे ऑनलाईन मूग खरेदी करू लागले आहेत. उडदाला ३५०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर आहेत.

उडदाचे दर या हंगामात हमीभावापेक्षा कमीच राहील्याचे सांगण्यात आले. दरम्यान अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कडधान्याची हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात तालुका सहायक निबंधक, बाजार समिती प्रशासन यांच्याकडे माहिती देण्यात आली आहे, असे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com