गुलटेकडीत भाजीपाल्याची आवक कमी; फ्लॉवरचे दर वाढले

गुलटेकडीत भाजीपाल्याची आवक कमी; फ्लॉवरचे दर वाढले
गुलटेकडीत भाजीपाल्याची आवक कमी; फ्लॉवरचे दर वाढले

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १४) भाजीपाल्याची अवघी सुमारे १२० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. दुष्काळी परिस्थिती आणि वाढत्या तापमानामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात घट झाल्याने आवक मंदावली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवकेत सुमारे ५ ते ६ ट्रक ने घट झाली होती. या वेळी बटाटा, दोडका आणि फ्लॉवरच्या दरांसह पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली होती. 

विविध भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथून ३ टेम्पो शेवगा, हिमाचल प्रदेशातून सुमारे ३ ट्रक मटार, कर्नाटक आणि गुजरात येथून ३ ट्रक कोबी, कर्नाटकमधून तोतापुरी कैरी सुमारे ६ टेम्पो, बंगलोर येथून आले १ टेम्पो, मध्यप्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ४ हजार गोणी आवक झाली होती. 

महाराष्ट्राच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार गोणी, टॉमेटो सुमारे ४ हजार क्रेट, कोबी आणि फ्लॉवर प्रत्येकी सुमारे ७ टेम्पो, ढोबळी मिरची ८ टेम्पो, गाजर ४ टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, काकडी १०, भेंडी ८, गवार ५ टेम्पो, तर कांदा सुमारे १०० ट्रक तर स्थानिकसह आग्रा, इंदौर येथून बटाट्याची सुमारे५० ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव  कांदा - ७०-८५, बटाटा- १००-१५०, लसूण - ३००-६००, आले : सातारी ५५०-६२०, भेंडी : २००-३००, गवार : ३००-५००, टोमॅटो - ८०-१००, दोडका : ३००-४००, हिरवी मिरची : ५००-६००, दुधी भोपळा :१००-१५०, चवळी : २००-२५०, काकडी : १००-१५०, कारली : हिरवी ३५०-४०० - पांढरी २५०-३००, पापडी :३०० -३५०, पडवळ :३००-३५०, फ्लॉवर : १२०-१५०, कोबी : ६०-१००, वांगी :१०० -२००, डिंगरी :२०० -२५० , नवलकोल :१०० -१२०, ढोबळी मिरची : ३५०-४००, तोंडली : कळी २५०- ३००, जाड : १००-१२०, शेवगा :१५०-२००, गाजर : १२०- १४०, वालवर : ३००-३५० , बीट :१२०-१४०, घेवडा : ५५०-६००, कोहळा : २०० -२५०, आर्वी : ३००- ३५०, घोसावळे :२०० -२५०, ढेमसे : २००-२५०, भुईमूग : ६०० -६५०, पावटा :५५० -६००, मटार : ५५०-६००, तांबडा भोपळा १००-१५०, चिंच अखंड ३०० -३५०, सूरण : २००-२२०, मका कणीस : ६०-८०, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

पालेभाज्या  पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे सव्वा लाख तर मेथीची सुमारे ४० हजार जुड्या आवक झाली होती.  पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : १००० -२०००, मेथी : ७००-१०००, शेपू : ६००-१०००, कांदापात : १००० -१५००, चाकवत : ५०० -७००, करडई : ५०० -७००, पुदिना : २०० -३००, अंबाडी : ७००-८००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ५०० -७००, चुका : ५००-८००, चवळई : ४०० -७००, पालक :५०० -८००. 

फुलबाजार  फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-४०, गुलछडी : १००-१२०, बिजली : २०-४०, कापरी : १०-४०, मोगरा : २५०-५००, आस्टर : १२-१६, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १२-२५, गुलछडी काडी : २०-४०, डच गुलाब (२० नग) : २०-५०, लिली बंडल : ५-१०, जर्बेरा : १०-३०, कार्नेशियन : २०-५०. 

फळबाजार  रविवारी (ता. १४) मोसंबी सुमारे ५० टन, संत्री २५ टन, डाळिंब १५० टन, पपई १० टेम्पो, लिंबे सुमारे दोन हजार गोणी, चिक्कू २ हजार डाग, कलिंगड ३० टेम्पो, खरबूज २५ टेम्पो आणि द्राक्षांची ६ टन आवक झाली होती. तर कोकणातून हापूस आंब्याची सुमारे अडिच हजार पेटी आवक झाली होती. तर कर्नाटकातून विविध जातींच्या आंब्याची सुमारे ६ हजार पेटी, करंडीची आवक झाली होती. 

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रती गोणी) : ५००-१०००, मोसंबी : (३ डझन) : १३०-३२०, (४ डझन ) : ६०-१४०, संत्रा : (३ डझन) : १८०-५००, (डझन ४) : ८०-२००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : २०-७०, गणेश ५-२०, आरक्ता १०-४०. कलिंगड : ५-१२, खरबूज : १०-२०, पपई : ५-१५, चिकू : -१००-६००, द्राक्षे : सुपर सोनाका (१५ किलो) ८००-१३००, माणिकचमन (१५ किलो) ५००-८००. आंबा (कर्नाटक) : बदाम (१ किलो) ३०-४५, तोतापुरी ३०- ५०, लालबाग २०-३५, हापूस (२ डझन) ४००-७००, पायरी (२ डझन) २००-३५०. कोकण हापूस (४-८ डझन) कच्चा १५००-३००० तयार - २०००-३५००, (५ ते १० डझन) कच्चा २ ते ४ हजार, तयार २५०० ते ४५०० 

मासळी बाजार  गणेश पेठेतील मासळीच्या घाऊक बाजारात खोल समुद्रातील मासळीची सुमारे १० टन, खाडीची २०० ते २५० किलो तर नदीच्या मासळीची दीड ते दोन टन आवक झाली होती. तसेच आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १४ टन आवक झाली होती. दरम्यान उन्हाळ्यामुळे मासळीला मागणी कमी आहे. मात्र, आवकदेखील कमी असल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत दर स्थिर होते. तर इंग्लिश अंड्यांच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत शेकड्याला १५ ते २० रुपयांनी वाढ झाली होती. तसेच, मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे चिकन, मटण भाव स्थिर होते. 

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) :  पापलेट : कापरी :  १४००-१५००, मोठे १४००- १५००, मध्यम : १०००, लहान ९००, भिला : ६५०, हलवा : ६५०, सुरमई : ६५०-७००, रावस : लहान ६५०, मोठा ७५०, घोळ : ७५०, करली : २८०, करंदी (सोललेली) : ३६०, भिंग : ४००, पाला : लहान ७५०- मोठा १०००, वाम : पिवळी लहान ४०० मोठे ८००, काळी : ४००, ओले बोंबील : १६०-२००, कोळंबी ः लहान २४०-२८०, मोठी ४८० जंबोप्रॉन्स : १४००, किंगप्रॉन्स : ७५०, लॉबस्टर : १४००, मोरी : लहान : २००, मोठी ३२०, मांदेली : १४०, राणीमासा : १८०-२००, खेकडे : २००-२८०, चिंबोऱ्या : ५००-६००.

खाडीची मासळी :  सौंदाळे : २४०-२८०, खापी २४०, नगली : लहान : ३६० मोठी ५५०-६००, तांबोशी : ४००- ४८०, पालू : २८०, लेपा : लहान १६०, मोठे २४०, शेवटे : २०० बांगडा : लहान १४०, मोठा १८०-२००, पेडवी : १००, बेळुंजी : १६०, तिसऱ्या : २४०, खुबे १४०, तारली : १६० 

नदीची मासळी :  रहू : १६०, कतला : १६०-१८०, मरळ : २८०-४८०, शिवडा : २००, चिलापी : ८०, मांगुर : १४०, खवली : २००, आम्ळी : १२० खेकडे : २८०, वाम : ५५०. 

मटण :  बोकडाचे : ४८०, बोल्हाईचे : ४८०, खिमा : ४८०, कलेजी : ५२०. 

चिकन :  चिकन : १६०, लेगपीस : १९०, जिवंत कोंबडी : १३०, बोनलेस : २६०. 

अंडी :  गावरान : शेकडा : ६५०, डझन : ९० प्रती नग : ७.५० इंग्लिश : शेकडा : ३६० डझन : ५४ प्रतिनग : ४.५०  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com