गुलटेकडीत भाजीपाल्याची आवक कमी; दर वाढले

गुलटेकडीत भाजीपाल्याची आवक कमी; दर वाढले
गुलटेकडीत भाजीपाल्याची आवक कमी; दर वाढले

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २४) भाजीपाल्याची अवघी सुमारे १३० ट्रक आवक झाली होती. दुष्काळी परिस्थितीमुळे भाजीपाल्याची आवक दिवसेंदिवस घटत असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत सुमारे १० ट्रकने भाजीपाल्याच्या आवकेत घट झाली आहे. आवकेत झालेली घट आणि मागणी असल्याने हिरवी मिरची, सिमला मिरची, फ्लॉवर, कोबी, घेवडा, पावटा यांच्या दरात वाढ झाली होती. तर पालेभाज्यांचे वाढलेले दर स्थिर होते.

विविध भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून सुमारे ८ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून ५ टेम्पो शेवगा, राजस्थान येथून मटार सुमारे ७, तर गाजर सुमारे ६ ट्रक, कर्नाटक आणि गुजरात येथून ३ ट्रक कोबी, कर्नाटकमधून तोतापुरी कैरी सुमारे ४ टेम्पो, बंगलोर येथून आले १ टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ५ हजार गोणी आवक झाली होती.

महाराष्ट्राच्या विविध भागांतील झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार २०० गोणी, टोमॅटोे सुमारे ४ हजार क्रेट, कोबी ५, तर फ्लॉवर सुमारे १० टेम्पो, ढोबळी मिरची ६ टेम्पो, हिरवी मिरची २ टेम्पो, भेंडी सुमारे ८ टेम्पो, गवार ४ टेम्पो, शेवगा ३ टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, तर कांदा नवीन सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. तसेच स्थानिकसह आग्रा, इंदूर येथून बटाट्याची ४० ट्रक आवक झाली होती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव कांदा - ६०-८०, बटाटा : ७०-१३०, लसूण : २००-४०० आले : सातारी ६००-६५०, बंगलोर -५००-५५०, भेंडी : ३००-४००, गवार : गावरान -५००-७००, टोमॅटो : १६०-२००, दोडका : ३००-३५०, हिरवी मिरची : ५००-७००, दुधी भोपळा : १५०-२००, चवळी : २५०-३००, काकडी : १००-१५०, कारली : हिरवी- ४००-४५० पांढरी ३००- ३५०, पापडी : ३५०-४००, पडवळ : ३००-३५०, फ्लॉवर : ८०-१२०, कोबी : १००-१४०, वांगी : १५०-२५०, डिंगरी : २००- २५०, नवलकोल : १२०-१४०, ढोबळी मिरची : ४००-६००, तोंडली : कळी ३००- ३५०, जाड : १५०-१६०, शेवगा : २००-२५०, गाजर : १२०-१४०, वालवर : ३००-४००, बीट : ८०-१००, घेवडा : ६००-६५०, कोहळा : २००-२५०, आर्वी : ३००- ३५०, घोसावळे : २००-२२०, ढेमसे : ३००-३५०, भुईमूग : ६००-६५०, पावटा : ५००-५५०, मटार : ४५०- ४८०, तांबडा भोपळा : १२०-१६०, चिंच अखंड - ३००-३५०, सुरण : २००-२२०, मका कणीस : ५०-८०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्या पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीची सुमारे दीड लाख, तर मेथीची सुमारे ४० हजार जुड्या आवक झाली होती. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ५००-८००, मेथी : १०००-१४००, शेपू : ३००-६००, कांदापात : ५००-८००, चाकवत : ५००-६००, करडई : ५००-६००, पुदिना : २००-३००, अंबाडी : ५००-८००, मुळे : १०००-१२००, राजगिरा : ५००-८००, चुका : ५००-६००, चवळई : ५००-७००, पालक : ४००-६००.

फळबाजार फळबाजारात रविवारी (ता. २४) मोसंबी आणि संत्र्यांचा प्रत्येकी सुमारे ५० टन, डाळिंब सुमारे २५० टन, पपई १० टेम्पो, लिंबे सुमारे २ हजार गोणी, चिकू ८०० बॉक्स आणि गोणी, पेरु ३०० क्रेट, कलिंगड ३५ टेम्पो, खरबूज २० टेम्पो, तर विविध द्राक्षांची सुमारे २० टन आवक झाली होती. तर कोकणातून कच्च्या हापूसच्या आंब्याची सुमारे २ हजार पेटी आवक झाली होती.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : ४००-१०००, मोसंबी : (३ डझन) : १३०-३००, (४ डझन) : ५०-१२०, संत्रा : (३ डझन) १५०-३८०, (४ डझन) : ६०-१४०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : २०-८०, आरक्ता १०-४० गणेश -५-२०, कलिंगड : ५-१२, खरबूज : १०-२०, पपई : ५-१५, चिकू : १००-५००, पेरू (२० किलो) : ३००-५००,  द्राक्षे : जम्बो (१० किलो) ५००-१०००. सुपर सोनाका - १०००-१२००, शरद सीडलेस (१०)- ६००-११००, कर्नाटक आंबा - तोतापुरी (प्रति किला) ५०-६०, बदाम-५०-७०, मल्लिका -६०७०, हापूस (२ डझन) - ६००-९००, कोकण हापूस (४ ते ८ डझन) १५०० ते ५०००  

फुलबाजार फुलांचे प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ५-१६, गुलछडी : ८०-१२०, बिजली : १०-३०, कापरी : १०-३०, कागडा (बंडल) : १००-२००, मोगरा : २००-३५०, ॲस्टर : १२-१६, (गड्यांचे भाव) गुलाब गड्डी : १०-२०, गुलछडी काडी : ३०-६०, डच गुलाब (२० नग) : २०-६०, लिली बंडल : २-५,  जरबेरा : १०-२०, कार्नेशियन : २०-६०.

मासळी नुकतीच झालेली तुकाराम बीज, रविवारी (ता. २४) संकष्ट चतुर्थी आणि सोमवारी (ता. २५) उपवास यामुळे मासळीची मागणी घटली होती. तर होळीनिमित्त किनाऱ्यावर होड्या परतल्याने मासेमारी तुलनेने घटली आहे. परिणामी, देशाच्या पूर्व व पश्‍चिम किनारपट्टीवरून मासळी बाजारात दाखल होत असून, आवक आवक कमी असल्याने गेल्या आठवड्यातील तेजी टिकून आहे. तसेच चिकन, अंडी आणि मटणाची मागणी आणि पुरवठा संतुलित असल्याने यांचे भाव स्थिर होते.  गणेश पेठ येथील मासळी बाजारात खोल समुद्रातील मासळी सुमारे ६ टन, खाडीची १५० किलो, तर नदीच्या मासळी सुमारे दीड टन आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे ७ टन आवक झाली होती.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) :  पापलेट : कापरी : १५००, मोठे १५००, मध्यम : १०००-११००, लहान ८००-९००, भिला : ६५०-७००, हलवा : ६००-६५०, सुरमई : ६००-६५०, रावस : लहान ६५०-७००, मोठा ८५०, घोळ : ६५०, करली : २८०, करंदी  (सोललेली) : ३६०, भिंग : ४००, पाला : ६००-१२००, वाम : पिवळी लहान ४८० मोठे  ८००,  काळी : ३२०-३६०, ओले बोंबील : १००-२००

कोळंबी ः लहान १८०, मोठी ४८०, जंबो प्रॉन्स : १५००, किंग प्रॉन्स : ७५०, लॉबस्टर : १४००, मोरी : २८०-३६०, मांदेली : १२०, राणीमासा : १६०-२००, खेकडे : २००, चिंबोऱ्या : ५५०-६००

खाडीची मासळी : सौंदाळे : २८०, खापी २८०-३२०, नगली : लहान ३६० मोठी ६००, तांबोशी ४८०-५८०, पालू : २८०, लेपा : लहान १००, मोठे २००-२४०, शेवटे : २८० बांगडा : लहान १४०-१६०, मोठा २००-२८०, पेडवी : ६०-८०, बेळुंजी : १६०, तिसऱ्या : २००, खुबे १४०, तारली : १२०-१६०

नदीची मासळी : रहू : १४०-१८०, कतला : १६०-२००, मरळ : ३६०, शिवडा : २८०, चिलापी : १२०, मांगुर : १४०, खवली : २४०, आम्ळी : १६० खेकडे : ३२०, वाम : ५२०. 

मटण : बोकडाचे : ४८०, बोल्हाईचे : ४८०, खिमा : ४८०, कलेजी : ५२०. चिकन : चिकन : १६०, लेगपीस : १९०, जिवंत कोंबडी : १३०, बोनलेस : २६०.  अंडी : गावरान : शेकडा : ६८०, डझन : ९० प्रति नग : ७.५० इंग्लिश : शेकडा : ३५५ डझन : ५४ प्रतिनग : ४.५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com