agriculture news in marathi, Irregular power supply in Khandesh | Agrowon

खानदेशात अनियमित वीजपुरवठा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

जळगाव : खानदेशात जलपातळी सातत्याने घटत आहे. कूपनलिकांमधील ही पातळी चार ते पाच मिटरने कमी झाली आहे. त्यातील कृषिपंप जळण्याचे प्रकार वाढले आहेत. यातच वीज कंपनीकडून अनियमित, कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने पंपांमध्ये अनेक ठिकाणी बिघाडही वाढल्याचे सांगितले जात आहे. 

जळगाव : खानदेशात जलपातळी सातत्याने घटत आहे. कूपनलिकांमधील ही पातळी चार ते पाच मिटरने कमी झाली आहे. त्यातील कृषिपंप जळण्याचे प्रकार वाढले आहेत. यातच वीज कंपनीकडून अनियमित, कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने पंपांमध्ये अनेक ठिकाणी बिघाडही वाढल्याचे सांगितले जात आहे. 

हिवाळा संपत आहे, तशी पिकांना पाणी देण्यासह वाफसा कायम राखण्याची लगबग शेतकऱ्यांमध्ये आहे. कांदा, केळीची लागवड तापी, गिरणाकाठी आहे. चार दिवस दिवसा वीज असते. त्यातच दर अर्ध्या ते एक तासात वीज बंद होते. काही रोहित्र जुनाट व कमी क्षमतेचे आहेत. त्यावरील विजेचा वापर अधिक जोडण्यांमुळे मोठा आहे, असे रोहित्र वारंवार बंद पडतात. वीजपुरवठा सुरळीत नसल्याने शेतकऱ्यांना सिंचनासंबंधी अडचणी येत आहेत.

दिवसा चार दिवस वीज जळगाव, चोपडा, यावल, पाचोरा व चाळीसगाव भागात मिळते. पाट पद्धतीने कांदा, लहान केळी व इतर रब्बी पिकांना पाणी देताना दिवसा वीज गरजेची असते. मात्र वारंवार रोहित्र दुरुस्त करावे लागतात. कृषिपंप जळाले, की आठ ते  १० दिवस सिंचन करता येत नाही. बाजरी, कांदा पिकाची ज्यांनी पाट पद्धतीने सिंचनाची व्यवस्था केली, त्यांना अधिकचा त्रास सहन करावा लागत आहे.

कृषिपंप दुरस्तीसाठी चार ते साडेचार हजार रुपये लागतात. हा भुर्दंड शेतकऱ्यांना बसत असल्याचे चित्र आहे.

इतर बातम्या
कृषी विभाग म्हणते, पॉलिहाउस, शेडनेट...जळगाव ः खानदेशात १ ते ११ जून यादरम्यान झालेल्या...
केळी पीकविमाधारकांना परताव्यांची...जळगाव  ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत...
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाअभावी... कोल्हापूर  : अनेक ठिकाणी पेरण्या झाल्या...
कांदा निर्यात, प्रक्रियेवर भर गरजेचा ः...राजगुरुनगर, जि. पुणे : कांदा बाजारभावातील अनिश्‍...
सात महिन्यांपूर्वी विकलेल्या मुगाचे...अकोला ः नाफेडने खरेदी केलेल्या मुगाचे पैसे सात...
महावितरण’द्वारे देखभाल, दुरुस्तीची ९०३३...‘सातारा : थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व...
रत्नागिरीत खतनिर्मिती कारखान्यावर छापारत्नागिरी : येथील एमआयडीसी परिसरात मच्छीच्या...
आषाढी पालखी सोहळ्यासाठी आरोग्य विभाग...पुणे : आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर...
गोंदिया जिल्ह्यात २ लाख हेक्‍टरवर...गोंदिया ः राइससिटी असा लौकिक असलेल्या गोंदिया...
आमदार दीपिका चव्हाण यांनी मांडली...नाशिक : जिल्ह्यातील बागलाण व चांदवड तालुक्यातील...
औरंगाबाद जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती औरंगाबाद : जिल्ह्यातील ७७८ गाव व २७२...
नाशिकला ‘राष्ट्रवादी युवक’चे रेल रोको...नाशिक  : केंद्र व राज्य सरकारच्या अपयशामुळे...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत कापूस...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत २०१८-...
जतला कर्नाटकातून पाणी मिळणे धूसरसांगली : कर्नाटकातून कृष्णेचे पाणी जत तालुक्याला...
आषाढी वारीत ३५ हजार विद्यार्थी करणार...सोलापूर : आषाढी वारीत पाच विद्यापीठांतील ३५ हजार...
कात्रजकडून गायीच्या दूध खरेदीदरात वाढपुणे  : दुष्काळी स्थितीत दूध उत्पादक...
सौर कृषिपंप योजनेतील लाभार्थी हिस्सा...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत...
कृषी विभागात बदल्यांची धूमपुणे  : राज्यात ऐन खरिपाच्या नियोजनात कृषी...
विधीमंडळ अधिवेशन ः सलग तिसऱ्या दिवशीही...मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही...
हायब्रीड बियाणे किमतीवर सरकारी नियंत्रण...पुणे  : महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती...