Agriculture news in Marathi, irregularity will stop?, Maharashtra | Agrowon

अराजपत्रित बदल्यांचा बाजार थांबणार?
टीम अॅग्रोवन
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

कृषी विभागातील अराजपत्रित कर्मचाऱ्यांच्या बदल्या नागरी सेवा मंडळामार्फत करण्याचा निर्णय चांगला आहे. मात्र, या बदल्या समुपदेशन पद्धतीने, पारदर्शकरित्या व्हाव्यात. मंडळात संघटनेच्या प्रतिनिधींचादेखील समावेश असावा. काही दिवसांपूर्वी कृषी आयुक्तांनी अतिशय पारदर्शकता ठेवत समुपदेशन पद्धतीने बदल्या केल्या. यामुळे एकाही कर्मचाऱ्याला रुपयादेखील खर्च करावा लागला नाही. अशीच पारदर्शकता सर्व बदल्यांमध्ये असावी.
- नवीन बोराडे, विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना

पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील अराजपत्रित कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदल्या यापुढे नागरी सेवा मंडळामार्फत करण्यात येणार आहेत. त्यामुळे या बदल्यांमधील प्रचलित खाबुगिरीला चाप लागण्याची शक्यता आहे. 

कृषी खात्यात क्षेत्रिय पातळीवर विस्ताराची कामे कृषी सहायक व पर्यवेक्षकांना करावी लागतात. मात्र, आंतरजिल्हा बदली हवी असल्यास क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना मंत्रालयातून वेठीस धरले जात असल्याच्या तक्रारी होत्या. लक्ष्मीदर्शनाशिवाय फायली हालत नसल्याचा अनेकांचा अनुभव आहे. आता मात्र नागरी सेवा मंडळाच्या शिफारशीनुसार बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या मंडळाच्या अध्यक्षपदी कृषी खात्याचे प्रधान सचिव अनुपकुमार असतील. मंडळाचे सदस्य सचिव म्हणून सु. धं. धपाटे काम बघणार अाहेत. दुग्धविकास विभागाचे प्रधान सचिव, आदिवासी विभागाचे सचिव या मंडळाचे सदस्य असतील.

कृषी खात्यातील पर्यवेक्षक, सहाय्यक, वरिष्ठ लिपीक, सहाय्यक अधीक्षक, कनिष्ठ लिपीक, अनुरेखकांच्या आंतरसंभागीय बदल्या आता परस्पर केल्या जाणार नाहीत. मंडळाची शिफारस असल्याशिवाय क्षेत्रिय कर्मचाऱ्यांची बदली करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

सध्याच्या पद्धतीनुसार आंतरजिल्हा बदलीचे प्रस्ताव तयार करण्यासाठी दोन्ही विभागीय सहसंचालकांची नाहरकत प्रमाणपत्रे घ्यावी लागतात. त्यानंतर हा सहसंचालकांकडूनच हा प्रस्ताव कृषी आयुक्तालयाच्या आस्थापना शाखेत पाठविला जातो. आस्थापना शाखेतून आयुक्तांच्या मान्यतेनंतर बदलीचा प्रस्ताव मंत्रालयात जात होता. तेथे मंत्र्यांच्या मर्जीनुसार फायली हालत होत्या. 

`कृषी खात्यात एसएओ, जेडीए किंवा संचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांचे रेकॉर्ड तपासले तर अनेक गोंधळ दिसतील. असे असूनही या अधिकाऱ्यांना हव्या त्या जागांवर बदली, बढती मिळते. क्षेत्रिय कर्मचाऱ्यांची मात्र मुस्कटदाबी सुरू असते. बदल्यांसाठी वेळ, पैसा खर्च करूनही मनस्ताप होतो. त्याचा परिणाम आमच्या कामकाजावर होतो,` अशा शब्दात एका पर्यवेक्षकाने आपली कैफियत मांडली. 

कृषी विभागात अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये समुपदेशन पद्धत अवलंबल्यामुळे गैरप्रकार, खाबुगिरी, ठराविक अधिकाऱ्यांची मक्तेदारी या प्रकारांना काही प्रमाणात आळा बसला आहे. त्या पाठोपाठ आता अराजपत्रित कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठीही नवीन पध्दत अवलंबली जाणार अाहे. त्यामुळे विभागाच्या कामकाजात सकारात्मक बदल होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.  

इतर अॅग्रो विशेष
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...
अडीच कोटींचे अनुदान ‘हरवले’पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र...
उन्हाचा चटका काहीसा कमी पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या चटक्यात...
ऊस पट्ट्यात द्राक्ष शेतीतून साधली...लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी (ता. चाकूर) हे गाव ऊस...
खारपाणपट्ट्यात कृषी विद्यापीठाने दिला...खारपाणपट्ट्यात विविध हंगामात पिके घेण्यावर...
शेतीमाल दरवाढीचे लाभार्थी सधन शेतकरीचमिलिंद मुरुगकर यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या...
व्यवस्था परिवर्तन कधी?सतराव्या लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे. एक...
राज्यातील दहा मतदारसंघांत आज मतदानपुणे ः लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात...
मराठवाड्यात सव्वाचार लाख जनावरे चारा...औरंगाबाद : गत आठवड्याच्या तुलनेत औरंगाबाद, बीड व...
नुकसानीचे पंचनामे होणार केव्हा?जळगाव  ः खानदेशात सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच...
जीपीएसद्वारे टँकर्सचे नियंत्रण करा ः...मुंबई : राज्यातील धरण व तलावांमध्ये उपलब्ध...
राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाजपुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सर्वच भागात हजेरी...
चीनची दारे भारतीय केळीसाठी बंदच जळगाव ः अतिथंडी व फी जारियम विल्ट या रोगामुळे...
वादळी पावसाने दाणादाणपुणे  : सोसाट्याचा वारा, मेघगर्जना, विजा,...
उत्पादन वाढले; पण उठाव ठप्पशेतकऱ्यांच्या दृष्टीने चालू ऊस हंगाम फारसा ठीक...
शुभवार्तांकनावर शिक्कामोर्तबअर्धा देश दुष्काळाने आपल्या कवेत घेतला आहे....
'कोरडवाहू'साठी एक तरी शाश्‍वत पीक...माझ्याकडे उत्तम बागायतीची सुविधा असून, गेल्या २०-...
खानदेशात चाराटंचाईचे संकटजळगाव : खानदेशातील पशुधनाच्या रोजच्या गरजेपेक्षा...