agriculture news in marathi, irrigation conferance will held at akola, aurangabad, maharashtra | Agrowon

विसावी सिंचन परिषद अकोला येथे होणार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

सोयगाव, जि. औरंगाबाद   : येथे रविवारी (ता. १४) १९ व्या राज्य सिंचन परिषदेचा समारोप करण्यात आला. पुढील राज्यस्तरीय सिंचन परिषद अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात घेण्याच्या ठरावासह विविध ठराव या परिषदेत घेण्यात आले.

सोयगाव, जि. औरंगाबाद   : येथे रविवारी (ता. १४) १९ व्या राज्य सिंचन परिषदेचा समारोप करण्यात आला. पुढील राज्यस्तरीय सिंचन परिषद अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात घेण्याच्या ठरावासह विविध ठराव या परिषदेत घेण्यात आले.

१९ व्या राज्यस्तरीय सिंचन परिषदेच्या समारोपीय सत्राच्या अध्यक्षस्थानी अजिंठा शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाश काळे होते. या वेळी गोपीनाथ मुंडे संशोधन केंद्राचे संचालक डॉ. सर्जेराव ठोंबरे, डॉ. सुधीर भोंगळे, ज्‍येष्ठ वैज्ञानिक दिलीप पोकळे, शेतकरी संघटनेचे अमर हबीब, जैन उद्योग समूहाचे डॉ. बी. डी. जडे, सिंचन सहयोगचे उपाध्यक्ष बापू अडकीने, डॉ. संजय साळुंके, भूगोल विभागाचे डॉ. मदनलाल सूर्यवंशी उपस्थित होते. महाराष्ट्र सिंचन सहयोग, अजिंठा शिक्षण संस्था आणि जैन उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने सोयगाव येथे सिंचन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

परिषदेच्या समारोप सत्रात राज्य सिंचन सहयोगचे अध्यक्ष डॉ. दि. मा. मोरे यांनी ठराव मांडले. या वेळी श्री. ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले. सिंचन परिषदेतंर्गत वनस्पतीशास्र आणि भूगोल विभागाच्या राष्ट्रीय चर्चासत्राचाही समारोप डॉ. दिलीप पोकळे यांच्या भाषणाने करण्यात आला. आभार प्राचार्य डॉ. अशोक नाईकवाडे यांनी मानले, तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. संतोष तांदळे यांनी केले.
 
परिषदेतील प्रमुख ठराव

  • २० वी राज्य सिंचन परिषद अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात घ्यावी.
  • सोयगाव येथील वेताळवाडी धरणावरील झुडपे लोकसहभागातून काढणे.
  • यापुढे सिंचन सहयोगची शाखा काढण्यासाठी नोंदणी करण्याची गरज राहणार नाही. १९ व्या सिंचन परिषदेत सहभागी झालेल्या व्यक्तींनी त्यांच्या जिल्ह्यात सिंचन सहयोगची शाखा नसल्यास त्या ठिकाणी शाखा उघडणे.
  • सोयगावला स्वागताध्यक्ष रंगनाथ काळे यांच्या अधिपत्याखाली सिंचन सहयोगची शाखा उघडणे.
  • सोयगाव तालुका शाखेने राज्य सहयोग सिंचन शाखेशी सतत संपर्क ठेवावा.

इतर ताज्या घडामोडी
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...