agriculture news in marathi, irrigation project implemention program, akola, maharashtra | Agrowon

अकोल्यातील सिंचन प्रकल्प वर्षभरात पूर्ण करू ः मुख्यमंत्री
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 डिसेंबर 2017
अकोला ः केंद्र शासन पुरस्कृत बळिराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत मंजूर झालेली या जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची कामे जास्तीत जास्त एक वर्षात पूर्ण करण्यासाठी सारी शक्ती पणाला लावू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
 
अकोला ः केंद्र शासन पुरस्कृत बळिराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत मंजूर झालेली या जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची कामे जास्तीत जास्त एक वर्षात पूर्ण करण्यासाठी सारी शक्ती पणाला लावू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
 
अकोला तालुक्यातील गांधीग्राम येथे या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ११ प्रकल्पांचे कार्यान्वितीकरण आणि राष्ट्रीय महामार्गांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते. जलसंपदामंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई वाघोडे आदी या वेळी उपस्थित होते.
 
मराठवाडा व विदर्भातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्रकल्पांची कामे रखडलेली होती, ही कामे मार्गी लावण्यासाठी केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बळिराजा संजीवनी योजनेअंतर्गत सदर भागातील १०७ प्रकल्पांना तत्काळ मंजुरी दिल्याने आता ही कामे मार्गी लागणार आहेत. ही कामे एक वर्षात निश्चितपणे पूर्ण केली जातील.
 
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत ४२ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. अकोला जिल्ह्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. यासाठी ७२८ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. ही योजना शेवटच्या पात्र शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत सुरू राहणार आहे. शेतकऱ्यांना ४५०० नवीन विहिरी देण्यात आल्या असून, नऊ हजारपेक्षा जास्त कृषिपंप वीजजोडण्या करण्यात आल्या आहेत. भविष्यात शेतकऱ्यांना वीज, पाण्याची अजिबात उणीव भासू दिली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
 
श्री. गडकरी म्हणाले, की बळिराजा जलसंजीवनीअंतर्गत मंजूर झालेली कामे शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी निराश होऊ नये. सिंचन प्रकल्पाची सर्व कामे एक वर्षात पूर्ण करण्यात यावी, यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. तसेच अकोला जिल्ह्यात नवीन उद्योग आणण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील.

इतर ताज्या घडामोडी
पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे...बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी ...
हल्ल्या मागे जे आहेत त्यांना शिक्षा...नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा...
आम्ही विसरणार नाही.. माफही करणार नाही...नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात...
काश्‍मीरमधील शेतकऱ्याला थकबाकीची रक्कम...पुणे : काश्‍मीरमधील शेतकऱ्याला सफरचंदाचे पैसे...
बिबट्याच्या दहशतीखाली चोरट्यांकडून...आंबेठाण, जि. पुणे : शिंदे गाव (ता. खेड) येथे दोन...
‘डिंभे’चे पाणी जोड बोगद्याद्वारे ‘...मुंबई : डिंभे डाव्या तीर कालव्यातील गळती...
विदर्भात आज गारपीट, हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पोषक हवामानामुळे आज (ता. १४) विदर्भात...
कापसासाठी ‘एमसीएक्‍स’कडून गोदामांची...मुंबई : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना समृद्ध...
कर्ज देण्याच्या नावाखाली ७३ शेतकऱ्यांची...गोंदिया : कर्ज देण्याच्या नावाखाली ७३...
इतिवृत्तात शेतकरी प्रतिनिधींच्या...नांदेड : ऊसदर निश्चित करण्याच्या बाबतीत...
पंतप्रधान दौऱ्याच्या दिनी मनसे वाटणार...यवतमाळ : निवडणुकीपूर्वी अच्छे दिनचे स्वप्न...
जमीन गैरव्यवहार चौकशी 'सक्तवसुली'मार्फत... पुणे : सोलापूरच्या जुनी मिल नावाने ओळखल्या...
उन्हाळी भुईमुगावरील रसशोषक किडींचे...उन्हाळी भुईमुगामध्ये पीक कालावधीत सुरवातीच्या...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ६०० ते २०००...परभणीत ६०० ते १००० रुपये  परभणी...
फुलांना भेट देणाऱ्या किटकांचे डीएनए...किटकांनी फुलांना भेट दिल्यानंतर तिथे सूक्ष्म असे...
रेशीम उत्पादकांचे उपोषण अखेर सुटलेजालना : मनरेगाअंतर्गत मिळणारे पेमेंट...
जळगावात शिक्षकांची 'व्हॉट्‌सॲप'वरून...जळगाव : शाळेत वेळेवर न येणे, वेळेअगोदरच शाळा...
जळगाव जिल्ह्यात `किसान सन्मान`च्या...जळगाव  : केंद्र शासनाने नुकत्याच जाहीर...
आरफळची ऊसबिलातून पाणीपट्टी वसूलतासगाव, जि. सांगली : दुष्काळी पार्श्वभूमीवर...
गोंदिया जिल्ह्यात अडीच लाख शेतकऱ्यांना...गोंदिया : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत...