सिंचन प्रकल्प, तलावांमध्ये साचला गाळ

सिंचन प्रकल्प, तलावांमध्ये साचला गाळ
सिंचन प्रकल्प, तलावांमध्ये साचला गाळ

जळगाव : आसमानी संकटांनी सध्या शेतकरी राजा होरपळलेला आहे. डोक्‍यावर कर्जाचा डोंगर आणि शेतात विहिरी कोरड्या पाहून बळिराजा हतबल झाला आहे. हीच वेळ भविष्यात यायला नको म्हणून उपाययोजना म्हणून येथील हतनूर प्रकल्पासह खानदेशातील विविध मध्यम प्रकल्प, तलावांमधील गाळ काढावा, अशी मागणी शेतकरी, ग्रामस्थ करीत आहेत. 

तापी नदीवरील भुसावळ व मुक्ताईनगर तालुक्‍यानजीकच्या हतनूर प्रकल्पात गाळ साचला आहे. हा प्रकल्प १०० टक्के भरतो. पण फेब्रुवारी, मार्चमध्येच ८० ते ८५ टक्के रिकामा होतो. या प्रकल्पात गाळ मोठ्या प्रमाणात असल्याने पाणी कमी साचते. ३० ते ४० टक्के गाळ या प्रकल्पात असल्याने पाण्याचा हवा तेवढा संचय होत नाही. वाघूरमध्येही गाळ साचू लागला आहे. जामनेर तालुक्‍यातील तीन लघू प्रकल्प व तलावांमध्ये गाळ आहे.

पाचोरा तालुक्‍यातील हिवरा, बहुळा प्रकल्पात गाळ वाढला आहे. चाळीसगावमधील मन्याड प्रकल्पातही गाळामुळे जलसंचयासंबंधी अडचणी येत आहेत. धुळे जिल्ह्यातही करवंद प्रकल्पासह लघू प्रकल्पांमध्ये काहीसा गाळ आहे. नंदुरबार जिल्ह्यात दरा प्रकल्पात गाळ साचू लागला आहे. शनिमांडळ (ता. नंदुरबार) गावालगतच असणाऱ्या ब्रिटिशकालीन तलावातून गेल्या अनेक वर्षांपासून गाळ काढण्यात आलेला नाही. दरवर्षी पावसाचे पाणी तलावातून खोली कमी असल्यामुळे वाहून वाया जाते. तलाव लवकरच कोरडेठाक होतो. परिणामी पाऊस येऊनही त्याचा काहीच फायदा होत नाही. 

गाळामुळे पावसाळ्यात प्रकल्प, तलाव पूर्णक्षमतेने उपयोगात येत नाहीत. कारण गाळामुळे जलसंचय होत नाही. पाणी वाया जाते. गाळ काढला गेला तर परिसरातील शेतीसाठी तो उपयोगात येणार आहे. भूजलपातळी वाढण्यासही मदत होईल. नदीत पाण्याचे आवर्तन सोडता येईल. रब्बी हंगामासाठी चांगला उपयोग होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com