agriculture news in marathi, irrigation scheme status, sangli, maharashtra | Agrowon

टेंभू योजनेतील साडेचौदा हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताविना
टीम अॅग्रोवन
सोमवार, 7 मे 2018

टेंभू उपसा सिंचन योजनच्या लाभक्षेत्रात परिसरातील पाच गावांचा समावेश नाही. त्यामुळे नेहमीच आम्हाला शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे. टेंभू उपसा सिंचन योजनेत परिसरातील पाच गावांचा समावेश करावा.

- नाना मोरे, विभूतवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली.
सांगली  ः टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी आटपाडी तालुक्‍याला मिळाले आहे. या पाण्यामुळे पीक पद्धतीत बदल झाला आहे. फळबाग, भाजीपाला पिकांचे क्षेत्र वाढले आहे.  मात्र, या योजनेचे आटपाडी तालुक्‍यातील एकूण लाभक्षेत्र १६ हजार हेक्‍टर असून, त्यापैकी केवळ १२०० हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली असून अजून १४ हजार ८०० हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली आलेले नाही. त्यामुळे उर्वरित क्षेत्राला ‘टेंभू’चे पाणी लवकरात लवकर द्यावे, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.
 
टेंभू योजनेच्या पाण्यामुळे आटपाडी तालुक्‍यातील शेती हिरवीगार होऊ लागली आहे. पाणी आल्याने भाजीपाला आणि फळबागांचे क्षेत्र वाढत आहे. तालुक्‍याची दुष्काळी ही प्रतिमा बदलत आहे. मात्र, उर्वरित क्षेत्राला पाणी मिळाले तर नक्कीच हा तालुका दुष्काळमुक्त होईल. त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि टेंभू उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांनी उर्वरित क्षेत्राला पाणी देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. 
 
आटपाडी तालुक्‍यात पाणीटंचाई नेहमीचीच आहे. पाणीटंचाई भासू लागली की टॅंकरची मागणी या तालुक्‍यातून पहिल्यांदा होते. पाणीटंचाई असूनदेखील डाळिंबाची लागवड येथील शेतकरी करत आहेत. आटपाडी तालुक्‍यात डाळिंबाचे क्षेत्र सुमारे २५०० हेक्‍टर आहे. चार-पाच वर्षांपासून ‘टेंभू’चे पाणी तालुक्‍यातील काही भागात आले आणि पाण्यासाठीचा संघर्ष थांबला. पाणी आल्याने डाळिंबाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. गेल्या चार वर्षांत डाळिंबाच्या क्षेत्रात एक हजार ते १२०० हेक्‍टरने वाढ झाली आहे.
 
‘टेंभू’चे पाणी तालुक्‍यातील बहुतांश तलावत पोचले. इतर भागात पाण्याच्या उपलब्धतेची परिस्थिती चांगली आहे. 
उन्हाळी हंगामात पीक लागवडीच्या क्षेत्रातही मोठी वाढ झाली आहे. ‘टेंभू’च्या पाण्यामुळेच हा बदल झालेला दिसत आहे.

आटपाडी तालुक्‍यात टेंभू योजनेचे पाणी आले आणि पाणीप्रश्‍न मिटला. वास्तविक पाहता, यातून तालुक्‍यातील केवळ १२०० हेक्‍टरला पाणी मिळाले. त्यामुळे तालुक्‍यातील सर्वच गावांना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नाही. झरे, विभूतवाडी परिसरातील पाच गावे या योजनेच्या पाण्यापासून अद्यापही वंचित आहेत. यामुळे या गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे.  या गावांना पाणी मिळणे कठीण झाले असून ही गावे ‘टेंभू’च्या लाभक्षेत्रात समाविष्ट करावी, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

इतर ताज्या घडामोडी
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
कळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...
नाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...
कपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...
सांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...
नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...
नाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...
अकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...