agriculture news in marathi, Israeli PM arrives in India | Agrowon

इस्राईलबरोबर कृषी, जल क्षेत्राबाबत करार होणार
वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

नवी दिल्ली : इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू रविवारी (ता. १४) भारतात दाखल झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रोटोकॉल तोडत त्यांचे विमानतळावर स्वागत केले. इस्राईलच्या पंतप्रधानांनी १४ वर्षांनंतर भारत दौरा केला असून, या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये संरक्षण, कृषी, जल, संरक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच अंतराळ सुरक्षेसह अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे.

नवी दिल्ली : इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू रविवारी (ता. १४) भारतात दाखल झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रोटोकॉल तोडत त्यांचे विमानतळावर स्वागत केले. इस्राईलच्या पंतप्रधानांनी १४ वर्षांनंतर भारत दौरा केला असून, या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये संरक्षण, कृषी, जल, संरक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच अंतराळ सुरक्षेसह अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे.

नेतान्याहू यांची पत्नी साराही भारताच्या दौऱ्यावर आल्या आहेत. नेतान्याहू हे नवी दिल्लीत दाखल झाल्यानंतर त्यांनी तीन मूर्ती चौकाला भेट दिली आणि त्यांनी हायफाच्या शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. यापूर्वी २००३ मध्ये इस्राईलचे माजी पंतप्रधान एरियल शेरोन भारताच्या दौऱ्यावर आले होते. गेल्या वर्षी पंतप्रधान मोदीही इस्राईलला गेले होते. त्यानंतर आता बेंजामिन नेतान्याहू भारताच्या दौऱ्यावर आहेत. भारतातील आपल्या सहा दिवसांच्या दौऱ्यादरम्यान ते दिल्ली, आग्रा, अहमदाबाद आणि मुंबई या शहरांना भेटी देणार आहेत.

दौऱ्यातील कार्यक्रम

  • १५ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेतान्याहू यांच्यात द्विपक्षीय चर्चा होईल. त्यानंतर नेतान्याहू राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतील.
  • १६ जानेवारी रोजी नेतान्याहू रायसिना संवादामध्येही भाग घेणार आहेत.
  • १७ जानेवारीला ते गुजरातमध्ये कृषी क्षेत्रातील राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राला भेट देणार आहेत.
  • १८ जानेवारी रोजी नेतान्याहू हे मुंबईला जाणार आहेत. या ठिकाणी ते व्यावसायिक चर्चा करणार आहेत. भारत दौऱ्यादरम्यान नेतन्याहू आग्रा येथील जगप्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू ताजमहलला भेट देणार आहेत.
  • १९ जानेवारी रोजी परतीचा प्रवास

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...