शेतकरी गटाच्या माध्यमातून अडचणींवर मात करणे शक्य

अरण येथील भूमाता सेंद्रिय शेतकरी गटाच्या वतीने सेंद्रिय पद्धतीने होणाऱ्या डाळिंब शेतीला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी भेट दिली. या वेळी डाळिंब केंद्राचे संचालक डॉ. आर. के. पाल, आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे.
अरण येथील भूमाता सेंद्रिय शेतकरी गटाच्या वतीने सेंद्रिय पद्धतीने होणाऱ्या डाळिंब शेतीला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी भेट दिली. या वेळी डाळिंब केंद्राचे संचालक डॉ. आर. के. पाल, आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे.

सोलापूर : एकत्रित आल्याशिवाय आणि गट शेतीशिवाय शेती राहिलेली नाही. शेतकरी गटाच्या माध्यमातून उत्पादन, विक्री, मार्केटिंग या सर्व अडचणींवर सहज मात होऊ शकते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केली.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) माध्यमातून अरण (ता. माढा) येथील भूमाता सेंद्रिय शेतकरी गटाच्या माध्यमातून सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला, कडधान्य, डाळिंब उत्पादन घेतले जात आहे. या गटाने केलेल्या शेती पद्धतीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. के. पाल यांनी नुकतीच भेट दिली.

आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, शेतकरी गटाचे अध्यक्ष बी. एस. पाटील, अभिमन्यू पाटील, शरद शिंदे, अमोल पाटील, ॲड. विजय काळे, संभाजी पाटील, एल. एम. गायकवाड आदी या वेळी उपस्थित होते. या गटाद्वारे मूग, उडीद, तूर, हरभराडाळीची पुण्यातील ग्राहकांना थेट विक्री होते. सेंद्रिय प्रमाणीकरणांतर्गत पीजीएस प्रमाणपत्रही या शेतकरी गटाला मिळाले आहे.

या भेटीत अभिमन्यू पाटील यांच्या शेतातील सेंद्रिय पद्धतीच्या डाळिंबाची पाहणी या वेळी जिल्हाधिकारी भोसले यांनी केली. शरद शिंदे यांनी सेंद्रिय डाळिंब उत्पादनाबाबत व विक्रीच्या व्यवस्थेबाबत गटाची माहिती दिली. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी अरणच्या गटाने केलेल्या कामाचे कौतुक केले. डॉ. पाल यांनीही डाळिंबाच्या प्रक्रिया उद्योगावर शेतकऱ्यांनी भर द्यावा, त्यामध्ये मोठ्या संधी आहेत, असे सांगितले. श्री. बरबडे यांनीही आत्माच्या कामासह अन्य शेतीविषयक विविध प्रयोगांची माहिती उपस्थित पाहुण्यांना दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com