agriculture news in marathi, Its Government's responsibility for the proper agri commodity rate says Raju Shetty | Agrowon

शेतीमालाला योग्य भावाची जबाबदारी शासनाची : शेट्टी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 मे 2018

इचलकरंजी, जि. कोल्हापूर : ‘‘शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्यांने शेतकऱ्यांची नवी पिढी शेती करायला तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्याला नव्या तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा देऊन शेतीमालाला योग्य भाव मिळवून देण्याची शासनाची जबाबदारी आहे. अन्यथा शेती व्यवस्था उद्‌ध्वस्त झाली तर आपल्या देशात अन्न सुरक्षिततेचा प्रश्‍न गंभीर होईल,’’ असे मत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

इचलकरंजी, जि. कोल्हापूर : ‘‘शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्यांने शेतकऱ्यांची नवी पिढी शेती करायला तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्याला नव्या तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा देऊन शेतीमालाला योग्य भाव मिळवून देण्याची शासनाची जबाबदारी आहे. अन्यथा शेती व्यवस्था उद्‌ध्वस्त झाली तर आपल्या देशात अन्न सुरक्षिततेचा प्रश्‍न गंभीर होईल,’’ असे मत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

येथील मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत खासदार शेट्टी बोलत होते. ‘शिवार ते माजघर-शेतीमालाचा प्रवास सुखकर कसा होईल' या विषयाची त्यांनी मांडणी केली. खासदार शेट्टी म्हणाले, ‘‘शेतकरी आपली संस्कृती म्हणून शेती करीत असतो. पूर्णपणे व्यापार म्हणून शेती केली जात नाही. संघटित नसल्यामुळे तो आपल्या मालाचा भाव ठरवू शकत नाही. त्याचा गैरफायदा शासनकर्ते घेतात. त्यामुळेच तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्याला कमी किंमत मिळते. ग्राहक महागाईने त्रस्त आहे. ही परिस्थिती का निर्माण होत आहे. याचा विचार करून मार्ग काढण्याची आवश्‍यकता आहे.’’

ग्राहकांवर पडणारा बोजा थांबवायचा असेल आणि शेतकरी ही जगला पाहिजे, ही भूमिका घ्यायची झाली तर शेतीमध्ये नवे तंत्रज्ञान वापरले गेले पाहिजे. उत्पादन झालेल्या मालाची विक्री जलद गतीने होण्यासाठी पायाभूत सुविधा तयार केल्या पाहिजेत. नव्या तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही. शेतकरी उत्पादन ते ग्राहक यातील साखळी दूर केली तर सर्वांचेच भले होणार आहे, असे सांगून खासदार शेट्टी यांनी श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे दिली.

इतर ताज्या घडामोडी
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...
नगर जिल्ह्यातील १२८ गावांत दूषित पाणीनगर  : ‘सर्वांना शुद्ध पाणी’ यासाठी सरकार...
आमच्या काळात एकही घोटाळा नाही :...सोलापूर : काँग्रेस आघाडी देशाला मजबूत करू...
सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी...सातारा : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ...
बहुपयोगी नत्रयुक्त खत `कॅल्शिअम...सावकाश उपलब्ध होण्याच्या क्षमतेमुळे कॅल्शियम...
जल, मृद्‌संधारणासाठी पूर्वमशागत...जमिनीमध्ये चांगले पीक उत्पादन येण्याकरिता भौतिक,...
कृषी सल्ला : भुईमूग, आंबा पीक भुईमूग शेंगा अवस्था भुईमूग पीक आऱ्या...