agriculture news in Marathi, J. P. Mina says, Guidelines for Operation green within a month, Maharashtra | Agrowon

‘ऑपरेशन ग्रीन’च्या मार्गदर्शक सूचना महिनाभरात : जे. पी. मीना
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

पुणे : देशातील बटाटा, कांदा, टोमॅटोच्या पिकांच्या समस्या हाताळण्यासाठी केंद्र शासनाने ‘ऑपरेशन ग्रीन’ योजना तयार केली आहे. महाराष्ट्रासाठी अधिक उपयुक्त असलेल्या या योजनेच्या मार्गदर्शक सूचना महिनाभरात जाहीर केल्या जातील, असे केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाचे सचिव जे. पी. मीना यांनी स्पष्ट केले. 

पुणे : देशातील बटाटा, कांदा, टोमॅटोच्या पिकांच्या समस्या हाताळण्यासाठी केंद्र शासनाने ‘ऑपरेशन ग्रीन’ योजना तयार केली आहे. महाराष्ट्रासाठी अधिक उपयुक्त असलेल्या या योजनेच्या मार्गदर्शक सूचना महिनाभरात जाहीर केल्या जातील, असे केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाचे सचिव जे. पी. मीना यांनी स्पष्ट केले. 

राज्यातील अन्न प्रक्रिया उद्योगातील प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी यशदामध्ये आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलते होते. राज्याचे अपर मुख्य सचिव बिजय कुमार, कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, ‘एमएसीपी’चे प्रकल्प संचालक सुशील खोडवेकर, सातारा मेगा फूड पार्कचे उपाध्यक्ष विजयकुमार चोले; तसेच इतर उच्चपदस्थ अधिकारी या वेळी उपस्थित होते. 

‘‘देशात एक लाख कोटी रुपये किमतीचा शेतमाल दरवर्षी वाया जातो. यामुळे राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होते. त्यामुळे आता मूल्यवर्धन साखळी विकसित केल्याशिवाय कोणताही अन्य पर्याय नाही. त्यासाठीच केंद्र सरकारने सहा हजार कोटी रुपयांची प्रधानमंत्री किसान संपदा योजना आणली आहे. यातून देशात प्रक्रिया उद्योगाला चालना मिळेल.

शेतकऱ्यांचा आर्थिक विकास आणि ग्रामीण भागात रोजगार निर्माण करण्याची क्षमता अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये आहे. मात्र, जादा उत्पादनामुळे एका बाजूला रस्त्यावर माल फेकला जात असून, दुसऱ्या राज्यात त्याच मालाची टंचाई असल्याचे चित्र दिसते. ही स्थिती बदलण्याची क्षमता केवळ प्रक्रिया उद्योगातच आहे. शेतकऱ्याच्या उत्पन्न वाढीतदेखील या उद्योगाची मोठी भूमिका असेल, असेही श्री. मीना म्हणाले. 

अपर मुख्य सचिव बिजय कुमार म्हणाले, की राज्यातील प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री कृषी अन्नप्रक्रिया योजना चालू करण्यात आली आहे. त्यात आम्ही शेतकऱ्यांपासून ते बाजार व्यवस्थेपर्यंत सर्व साखळीचा विचार करतो आहे. काही बाबींवरील उपाय हे शासनाच्या कक्षेबाहेरचे असले तरी बंद पडलेल्या प्रक्रिया उद्योगांच्या समस्या जाणून घेण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्यात येईल. या वेळी राज्याचे कृषी प्रक्रिया संचालक विजय घावटे यांनी मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रिया योजनेचे सादरीकरण केले. 

प्रक्रियेच्या वाणांवर संशोधन का नाही
फळे आणि भाजीपाला उत्पादनात भारत जगात अग्रगण्य असताना देशाच्या अन्न प्रक्रिया उद्योगांना नाईलाजाने कच्चा माल चक्क विदेशातून आणावा लागतो. २० लाख टन गहू आयात केला जातोय. टोमॅटो प्रक्रियेसाठी ४० टक्के माल तर सफरचंद प्रक्रियेतील ८० टक्के माल आयात केला जात आहे. हे का घडते आहे हे मला कळत नाही. देशाच्या प्रक्रिया उद्योगांना लागणाऱ्या वाणांचा विकास आणि उत्पादन करण्याची जबाबदारी कृषी विद्यापीठांची आहे, असे केंद्रीय सचिवांनी या वेळी सांगितले.

इतर अॅग्रोमनी
कापसाच्या किमतीत आणखी सुधारणानिवडणुकीमुळे पुढील दोन महिने बहुतेक पिकांच्या...
जळगाव जिल्ह्यात हरभरा खरेदीसंबंधी तयारी...जळगाव ः जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसंबंधीची...
सेंद्रिय उत्पादनातून आठ वर्षात तीन...आधी शिक्षण, बहुराष्ट्रीय बॅंकेतील नोकरी यामुळे...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
कापसाच्या निर्यात मागणीत वाढीची शक्यताया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन व...
कापूस, हळद, हरभऱ्याच्या भावात वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका,...
बांबू व्यापाराला चांगली संधीयेत्या काळात राज्यातील बांबूचा व्यापार वाढवायचा...
भारतातील पाच कडधान्यांच्या हमीभावावर...वॉशिंग्टन : भारतात पाच कडधान्यांना दिल्या...
भारतीय चवीच्या चॉकलेटची वाढती बाजारपेठकार्तिकेयन पलानीसामी आणि हरीश मनोज कुमार या दोघा...
सुधारित पट्टापेर पद्धतीने वाढले एकरी ३१...पारंपरिक पद्धतीने सोयाबीन तूर हे आंतरपीक अनेक...
चीन, अमेरिकेचे कापूस उत्पादन पुढील...जळगाव : देशात ३१ जानेवारीअखेर सुमारे १८० लाख...
कापूस, गवार बी आणि हरभऱ्याचे भाववाढीचे...या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने साखर वगळता...
हरभरा निर्यात, स्थानिक मागणीत वाढ या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका व गहू...
सीताफळाच्या मूल्यवर्धनातून घेतला...`उद्योगाच्या घरी, रिद्धीसिद्धी पाणी भरी`, अशी...
कापसाच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू वगळता...
हलव्याच्या कार्यक्रमाने अर्थसंकल्पाची...नवी दिल्ली : नवीन वर्षाची सुरवात झाली की...
आयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवरग्रामीण भागाला डिजिटल करण्याच्या उद्देशाने दोन...
कृषिमालाच्या मूल्यवर्धनालाच खरे भविष्य...२०१८ मध्ये डॅनफॉस इंडिया या कंपनीने उत्तम असा...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
हरभऱ्याला वाढती मागणी या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस, गहू...