सांगलीत गूळ प्रतिक्विंटल ३३०० ते ४४०० रुपये

गुळ
गुळ

सांगली ः येथील बाजार समितीत गुळाची आवक कमी अधिक प्रमाणात होत आहे. मंगळवारी (ता. १२) ३३२६ क्विंटल आवक झाली होती, त्यास प्रतिक्विंटल ३३०० ते ४४०० तर सरासरी ३८५० असा दर मिळाला. गुळाची आवक कमी अधिक होत असली तर दर स्थिर असल्याची अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. विष्णूअण्णा पाटील फळ व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात कांद्याची १४२ क्विंटल आवक झाली होती, त्यास प्रतिक्विंटल १००० ते ४२०० रुपये असा दर मिळाला. बटाट्याची १४५१ क्विंटल आवक झाली होती, त्यास प्रति क्विंटलला ७०० ते ९०० रुपये असा दर होता. सफरचंदाची १९४६ पेटी आवक झाली होती. सफरचंदाच्या प्रति पेटीस ८०० ते १५०० रुपये असा दर होता. मोसंबीची २८५० डझन आवक झाली होती, त्यास २००ते ५०० रुपये प्रति दहा किलोस असा  दर मिळाला. चिकूची ५६० डझन आवक झाली होती, त्यास प्रति दहा किलोस १०० ते २०० रुपये असा दर मिळाला. डाळिंबाची २८७० डझन आवक झाली असून त्यास प्रति दहा किलोस २०० ते ६०० रुपये असा दर मिळाला. बोराची ७५ क्विंटल आवक झाली होती, त्यास प्रति क्विंटलला १००० ते २००० रुपये असा दर मिळाला. बाजार समितीतील शेतमालाची आवक व दर (प्रतिक्विंटल/रुपये)  

शेतीमाल आवक किमान कमाल सरासरी
मूग ४० ५६०० ६००० ५८००
मटकी २५ ५००० ६५०० ५७८०
ज्वारी (हायब्रीड) ६६ १८०० २७०० १९००
ज्वारी (शाळू) १३५ १८०० २७०० २२५०
बाजरी ८६ १६०० २००० १८००
गहू ३३५ १८०० २७०० २२५०
तांदूळ ६८० २२०० ६००० ४१००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com