agriculture news in Marathi, jaggery at 3700 to 4900 rupees in kolhapur, Maharashtra | Agrowon

कोल्हापुरात गूळ प्रतिक्विंटल ३७०० ते ४९०० रुपये
राजकुमार चौगुले
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात गुळाची पंधरा हजार रव्यापर्यंत आवक झाली. गुळास क्विंटलला ३७०० ते ४९०० रुपये इतका दर मिळाला. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत गुळाचे उत्पादन घटण्याची शक्‍यता निर्माण झाल्याने यंदा गुळाला चांगला दर मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. यंदा गुळाचा प्रारंभापासूनच दर सातत्याने ३५०० रुपयांच्या वर असल्याने गूळ उत्पादकांत काहीसा उत्साह आहे. गेल्या आठवड्यापासून गुळाची नियमित आवक सुरवात झाली.

कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात गुळाची पंधरा हजार रव्यापर्यंत आवक झाली. गुळास क्विंटलला ३७०० ते ४९०० रुपये इतका दर मिळाला. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत गुळाचे उत्पादन घटण्याची शक्‍यता निर्माण झाल्याने यंदा गुळाला चांगला दर मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. यंदा गुळाचा प्रारंभापासूनच दर सातत्याने ३५०० रुपयांच्या वर असल्याने गूळ उत्पादकांत काहीसा उत्साह आहे. गेल्या आठवड्यापासून गुळाची नियमित आवक सुरवात झाली.

गेल्या सप्ताहात गुळाची दररोज पाच ते सात हजार गूळ रव्याची आवक होती. आता त्यात चाळीस टक्‍क्यांपर्यंत वाढ होऊन सप्ताहात दररोज दहा हजार रव्यांच्या वर गूळ रव्यांची आवक झाल्याचे गूळ बाजारातील सूत्रांनी सांगितले. गेल्या सप्ताहाच्या तुलनेत गुळाची दहा हजार क्विंटलने आवक वाढल्याचे गूळ बाजारातून सांगण्यात आले. 

कांद्याच्या आवकेत गेल्या सप्ताहाच्या तुलनेत दीड हजार क्विंटलनी घट झाली. कांद्यास क्विंटलला सरासरी २७०० रुपयांपर्यंत दर मिळाला. गेल्या सप्ताहात हाच दर २६०० रुपयांपर्यंत होता. बटाट्याच्या आवकेतही एक हजार क्विंटलने वाढ झाल्याचे कांदा, बटाटा विभागातून सांगण्यात आले. बटाट्यास सरासरी दर ७८० रुपये इतका होता. 

वांग्याची दररोज चारशे ते पाचशे करंड्या आवक झाली. वांग्यास दहा किलोस १५० ते ५५० रुपये दर होता. ढोबळी मिरचीस दहा किलोस १८० ते ४५० रुपये इतका दर होता. गवारीची दररोज दीडशे पोती आवक होती. गवारीस दहा किलोस २०० ते ४५० रुपये इतका दर होता. पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची बारा ते पंधरा हजार पेंढ्या आवक होती. कोथिंबिरीस शेकडा ६०० ते १५०० रुपये दर होता.

या सप्ताहात गुळाला क्विंटलला मिळालेला दर (रुपये)

दर्जा     दर (प्रतिक्विंटल)
स्पेशल      ४६००
नं १  ४४००
नं. २ ४२००
नं ३     ४०००
नं ४  ३७२५

   
    

   

इतर अॅग्रो विशेष
अंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...
रोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...
साखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...
‘ॲग्रोवन’ आमचा..! आम्ही ‘ॲग्रोवन’चे..!!पुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...
वर्धापन दिनानिमित्ताने ‘अॅग्रोवन’वर...पुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...
भारतासह दक्षिण आशियात यंदा सामान्य पाऊसपुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
चंद्रपूरला अजूनही उच्चांकी तापमानपुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यातील ऊन...
रत्नागिरी, देवगड, अलिबाग हापूसला...मुंबई : हापूस ‘कोणा’चा हा गुंता आता सुटण्याच्या...
‘ॲग्रोवन’चे आज चौदाव्या वर्षात पदार्पण !पुणे ः राज्यभरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या...
कृषी विज्ञान केंद्रांमध्ये हवामान...पुणे : ‘‘देशातील शेतकऱ्यांना मोबाईलवरून हवामान...
चंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी...पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
३२०० साखर दराची अंमलबजावणी व्हावी :...कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाने...
केसर आंबा संकटातचऔरंगाबाद :  सुरवातीला मोहराच्या काळात...
त्रस्त शेतकरी वाटणार ३ मेपासून मोफत दूधनगर/औरंगाबाद  : गतवर्षी शेतकरी संपानंतर...
पीक फेरपालट, सेंद्रिय खतांचा केला वापरप्रभाकर चौधरी हे १९७६ पासून शेती करतात. त्यांची...
खडकाळ, हलक्या जमिनीतही आणली सुपीकताकोणतेही पीक येईल की नाही, अशा खडकाळ जमिनीचे संजय...
नैसर्गिक शेतीतून राखले जमिनीचे आरोग्यअमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा (संभू)( ता. भातकुली...
जमिनीवरील अत्याचार थांबवा !पुणे : एक इंच माती तयार होण्यासाठी ५०० वर्षे...
दुग्ध व्यवसायाला २८०० कोटींचा फटकापुणे : उत्पादन खर्चात वाढ आणि नफा घटल्यामुळे...
मुदत संपलेल्या जिल्हा बँकांवर प्रशासक...मुंबई : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण चार...