कोल्हापूर : येथील बाजार समितीत पाडव्यानिमित्त रविवारी (ता. १८) काढण्यात आलेल्या गूळरव्यास प्रतिक्विंटल २८०० ते ५१०० रुपये दर मिळाला. साताप्पा बुरगे यांच्या दुकानात हे सौदे काढण्यात आले. सभापती कृष्णात पाटील, उपसभापती अमित कांबळे यांच्या हस्ते हे सौदे काढण्यात आले.
बाजार समितीत रविवारी गुळाची १० गूळरव्याची आवक झाली. बाजार समितीच्या वतीने चांगल्या प्रतीच्या गुळास नेहमीच उच्चांकी दर देण्याचा प्रयत्न केला जातो. बाजार समितीत चांगल्या प्रतीचा गूळ यावा व त्याला चांगला दर मिळावा यासाठी बाजार समितीच्या वतीने विविध प्रकारची चर्चासत्रे, तज्ज्ञांचे मार्गदर्शनाचे आयोजन करून येणाऱ्या गुळाचा दर्चा सुधारण्याचा प्रयत्न बाजार समिती करत असल्याची माहिती सभापती श्री. पाटील यांनी दिली.
या वेळी विलास साठे, उत्तम धुमाळ, बाबूराव खोत, भगवान काटे, किरण पाटील, सचिव मोहन सालपे, रामचंद्र खाडे आदी उपस्थित होते.