agriculture news in marathi, jaggery price increase, kolhapur, maharashtra | Agrowon

कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढ
टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

कोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात झाली आहे. ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत बाजारसमितीत साडेचार लाख गूळ रव्यांची आवक झाली आहे. यंदा गुळाचे उत्पादन कमी होणार हे गृहीत धरून पहिल्या टप्प्यात व्यापाऱ्यांनी गुळाच्या खरेदीला उत्साह दाखविल्याने दर समाधानकारक आहेत.

कोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात झाली आहे. ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत बाजारसमितीत साडेचार लाख गूळ रव्यांची आवक झाली आहे. यंदा गुळाचे उत्पादन कमी होणार हे गृहीत धरून पहिल्या टप्प्यात व्यापाऱ्यांनी गुळाच्या खरेदीला उत्साह दाखविल्याने दर समाधानकारक आहेत.

पहिल्या टप्प्यात आलेल्या गुळास ३२०० ते ४५०० रुपये क्विंटल असा दर मिळत असल्याने गूळ उत्पादकांत समाधान आहे. गेल्या वर्षीच्या सुरवातीच्या गुळाच्या तुलनेत हे भाव क्विंटलला २०० ते ३०० रुपयांनी जास्त आहेत. ही स्थिती हंगाम पूर्ण होईपर्यंत टिकावी, अशी अपेक्षा गूळ उत्पादकांची आहे. करवीर, पन्हाळा, कागल तालुक्‍यांतून गूळ आवक होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा शंभर ते दोनशे रुपयांनी दर जास्त आहेत.

यंदा उसाचे प्रमाण जास्त असले तरी कोल्हापूर जिल्ह्याला ऊस वाढीच्या दृष्टीने हा हंगाम फारसा चांगला गेला नाही. गूळ उत्पादक पट्यात असणाऱ्या करवीर, पन्हाळा, कागल, गगनबावडा तालुक्‍यांत सलग तीन महिने पाऊस हटला नाही. पाणी साचून ऊस कुजून गेला. यातच कोरड्या ठिकाणी ‘हुमणी’च्या प्रादुर्भावामुळे अनेक ठिकाणच्या उसाची चिपाडे झाली. याचा एकत्रित परिणाम सध्या ऊसतोडणीवर दिसून येत आहे. प्रत्येक प्लॉटमागे अंदाजे दहा ते वीस टनांनी उसात घट कायम आहे. जिल्ह्यातील पश्‍चिम भागातील तालुक्‍यात उसाचे सरासरी उत्पादन एकरी चाळीस टनापर्यंतच आहे.

मध्यंतरीच्या प्रतिकूल परिस्थिीमुळे एकरी केवळ तीस ते पस्तीस टन इतकेच उत्पादन येत असल्याने ऊस उत्पादक हैराण झाले आहे. साहजिकच याचा परिणाम गूळ उद्योगावर झाला आहे. अशा परिस्थितीमुळे गूळ उत्पादनातही घट अपेक्षित असल्याने बाजार समितीत मोठ्या प्रमाणात गुळाची खरेदी सुरू आहे. साहजिकच चढाओढीतून गुळाचा दर सातत्याने साडेतीन ते चार हजार रुपये क्विंटलच्या आसपास आहे. अजून तीन महिने तरी बाजार समितीत गुळाची सातत्यपूर्ण आवक अपेक्षित आहे. पुढील एखाद्या महिन्यात दर काहीसे कमी आले तरी शेवटच्या टप्प्यात तरी गुळाचे दर चांगले राहतील, असा अंदाज व्यापारी सूत्रांनी व्यक्त केला.

 

इतर ताज्या घडामोडी
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...
अठराशेवर गावांमध्ये घेतल्या जाणार २६५२...औरंगाबाद   : येत्या खरीप हंगामात...
खानदेशात बाजरी मळणीचा हंगाम आटोपलाजळगाव  ः खानदेशात बाजरीचा मळणी हंगाम आटोपला...
धुळे, नंदुरबारमध्ये राष्ट्रीयीकृत...धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंकेने १२ हजारांवर...
कोल्हापुरात ‘पाणीबाणी’ची शक्यताकोल्हापूर : जिल्ह्यात वेळेवर पाऊस सुरू न झाल्यास...
आरग येथे नागिलीच्या पानांचे सौदे सुरूसांगली  ः कधीकाळी खाण्यासाठी वापरण्यात...
अकोला जिल्ह्यात २० टक्क्यांपर्यंत...अकोला :  आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक...
नगर जिल्ह्यातील १२४ गावांचे पाणी दूषितनगर  : जिल्ह्यातील २६४५ गावांचे पाणीनमुने...
बुलडाणा जिल्हा कृषी विक्रेता संघटनेच्या...बुलडाणा ः जिल्हा कृषी विक्रेता संघटनेची १४...
निफाड तालुक्यात द्राक्षबागांच्या...नाशिक  : निफाड तालुक्यातील द्राक्षबागांमध्ये...
सोलापूर जिल्हा परिषद करणार ‘रोहयो’ची...सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाच्या...
भूगर्भात पाणीसाठा टिकविण्यासाठी भूमिगत...भूमिगत बंधारा बांधण्याचे काम जमिनीखाली असल्याने...
सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांत टाकली...नागपूर ः दुष्काळी मदत नाही, कर्जमाफीच्या...
वडगाव येथील पाटबंधारे कार्यालयासमोर...वडगाव निंबाळकर, जि. पुणे  ः नीरा डावा...
पुणे बाजार समितीवर पुन्हा प्रशासकीय...पुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणे बाजार...
अळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मातलोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी...