Agriculture News in Marathi, Jaggery production low, Sangli district | Agrowon

सांगली जिल्ह्यातील गुऱ्हाळमालक आर्थिक संकटात
टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 नोव्हेंबर 2017
सांगली ः शिराळा तालुक्‍याची गूळ उत्पादक तालुका म्हणून ओळख आहे. तालुक्‍यातील गुऱ्हाळघरे सुरू झाली आहेत. मात्र मजुरांच्या टंचाईमुळे गुऱ्हाळांच्या संख्येत घट होण्याची शक्‍यता आहे. त्यातही मजरांकडून फसवणूक होत असल्याने गुऱ्हाळ घरमालक आर्थिक संकटात सापडले आहेत. 
 
शिराळा तालुक्‍यातील गुऱ्हाळ उद्योगाला मोठा इतिहास आहे. या उद्योगाच्या माध्यमातून शेकडो हातांना रोजगाराची संधी प्राप्त होत होती. कोल्हापूर आणि कऱ्हाड (जि. सातारा) तालुक्‍यातील बाजारपेठेत शिराळा व शाहूवाडी तालुक्‍यांतील गुळाच्या अवीट चवीने तालुक्‍याची ओळख सर्वदूर नेली आहे.
सांगली ः शिराळा तालुक्‍याची गूळ उत्पादक तालुका म्हणून ओळख आहे. तालुक्‍यातील गुऱ्हाळघरे सुरू झाली आहेत. मात्र मजुरांच्या टंचाईमुळे गुऱ्हाळांच्या संख्येत घट होण्याची शक्‍यता आहे. त्यातही मजरांकडून फसवणूक होत असल्याने गुऱ्हाळ घरमालक आर्थिक संकटात सापडले आहेत. 
 
शिराळा तालुक्‍यातील गुऱ्हाळ उद्योगाला मोठा इतिहास आहे. या उद्योगाच्या माध्यमातून शेकडो हातांना रोजगाराची संधी प्राप्त होत होती. कोल्हापूर आणि कऱ्हाड (जि. सातारा) तालुक्‍यातील बाजारपेठेत शिराळा व शाहूवाडी तालुक्‍यांतील गुळाच्या अवीट चवीने तालुक्‍याची ओळख सर्वदूर नेली आहे.
 
शिराळा तालुक्‍यात गुऱ्हाळघरांना पुरेल एवढ्या उसाची उपलब्धता आहे. मात्र, याच तालुक्‍यात कारखानादेखील आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी ऊस कारखान्यास देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षीच्या हंगामात केवळ २० गुऱ्हाळघरे सुरू झाली होती. मात्र, यंदा २० गुऱ्हाळघरे सुरू होणार का, असा प्रश्‍न गूळ उत्पादकांना पडला आहे. एकेकाळी तालुक्‍यात ५० गुऱ्हाळघरे होती. मात्र, दरवर्षी गुऱ्हाळे सुरू होण्याची संख्यादेखील कमी होत चाचली आहे. दरवर्षी या उद्योगास कामगारांचा तुटवडा भासत आहे. 
 
फसवणुकीचे प्रकार
शिराळा तालुक्‍यात चांगल्या प्रतीचा गूळ तयार होतो. गुळाला सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड येथे मोठी बाजार पेठ आहे. या ठिकाणी गुळाला दरही चांगला मिळतो. यामुळे गुऱ्हाळघरे सुरू करण्यासाठी गुऱ्हाळ घरमालक धडपड करत आहेत. मात्र, कामगार मिळत नसल्याने परिसरात जाऊन कुशल कामगाराच्या शोधात आहेत. जरी कामगार मिळाले, तर त्यांना अगोदर उचल द्यावी लागते, तर कामगार गुऱ्हाळघरामध्ये कामाला येतो. मात्र, यंदा वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे.
 
कामगारांना गुऱ्हाळमालकांनी उचल दिली आहे; मात्र अद्यापही कामगार आलेले नाहीत. अनेक गुऱ्हाळमालकांची फसवणूक झाली आहे. यामुळे हा उद्योग भविष्यात टिकणार का, हा चिंताजनक विषय बनला आहे.
 
गेल्या तीन ते चार वर्षांपूर्वी एका गुऱ्हाळघरामध्ये सुमारे १० टन उसाचे गाळप होते. मात्र गुऱ्हाळघर चालविण्यासाठी कामगारांची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे केवळ ५ टन उसाचे गाळप होण्यास सुरवात झाली आहे. पुढील काळात गुऱ्हाळ उद्योग टिकविण्यासाठी मजूर उपलब्ध होणे आवश्‍यक आहे.
- संजय नांगरे, गुऱ्हाळ घरमालक, कोकरूड, जि. सांगली.

इतर ताज्या घडामोडी
देशातील रब्बी पेरणी माघारलीनवी दिल्ली  : देशभरात शुक्रवारअखेर (ता. ८)...
कुपोषण, प्रथिने जागृतीकडे लक्ष...पुणे : भारतात प्रथिनांच्या कमततेअभावी होणाऱ्या...
‘त्या’ कंपनीला काळ्या यादीत टाका :...लातूर ः येथील शासनाच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर...
रेशन धान्य दुकानदारांनी ई-पॉस मशिन...वडूज, जि. सातारा : रेशन घेण्यास आलेल्या...
भारनियमनामुळे शेती ऑफलाइननांदुरा, जि. बुलढाणा : शासनाने सर्व योजनांचे...
दूध संघांना अनुदान द्या : अरुण नरकेपुणे ः राज्य सरकारने दुधाला २७ रुपये प्रतिलिटरचा...
पुण्यात पालेभाज्यांची आवक टिकून; दर...पुणे : मार्केट यार्ड येथील भाजीपाला बाजारात सलग...
साहित्य संमेलनाध्यक्षपदी लक्ष्मीकांत...नागपूर : बडोदा येथे फेब्रुवारीत होणाऱ्या 91 व्या...
नरभक्षक बिबट्याला अखेर ठार मारलेमेहुणबारे/ पिलखोड/ चाळीसगाव : गिरणा परिसरात...
सरसकट कर्जमाफीसाठी होणार जेल भरो औरंगाबाद  ः शेतकरी, शेतमजूर, शेतीपूरक...
उद्धव ठाकरे गप्प बसा; अन्यथा रहस्ये...सांगली ः शिवसेना सोडण्याचे कारण उद्धव ठाकरे आहेत...
गिरणा धरणातून पहिले आवर्तन सोडलेचाळीसगाव :  गिरणा धरणातून सिंचनासाठीचे पहिले...
पीक नुकसानीचे दहा दिवसांत पंचनामे...औरंगाबाद : कापूस व धान पिकाच्या झालेल्या...
दक्षिण गुजरात, सौराष्ट्राचा कौल मतपेटीत...अहमदाबाद, गुजरात : येथील विधानसभेच्या पहिल्या...
रोहित्र दुरुस्तीचा विलंब भोवला; भरपाई...अकोला :  वीज रोहित्राची वेळेवर दुरुस्ती न...
व्यावसायिक कल्चरमुळे वाढते...खाद्यपदार्थ किण्वनातील जिवाणूंचा झाला अभ्यास...
बोगस बियाणे निर्मितीच्या संशयावरून...बुलडाणा : नांदुरा तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर...
कृषि सल्ला : पालेभाज्या, फळभाज्याडिसेंबर महिन्यात बहुतांश पालेभाजी पिकांची लागवड...
औरंगाबादेत कांदा १००० ते ३५०० रुपयेऔरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
मध्यम आकाराचे मांसभक्षक येतील पर्यावरण...मध्यम आकाराच्या मांसभक्षक प्राण्यांवर...