सांगली बाजार समितीत गूळ प्रतिक्विंटल २३५० ते ३१९१

सांगली बाजार समितीत गूळ प्रतिक्विंटल २३५० ते ३१९१
सांगली बाजार समितीत गूळ प्रतिक्विंटल २३५० ते ३१९१

सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. १५) कोल्हापूरी गुळाची आवक २३१९ क्विंटल झाली असून, त्यास प्रतिक्विंटल २३५० ते ३१९१ तर सरासरी २७७१ रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.  हळदीची १६८२ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतिक्विंटल ६३०० ते ८६५० तर सरासरी ७४७५ असा दर होता. तांदळाची आवक कमी अधिक प्रमाणात होते आहे. तांदळाची ३२१ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल २२०० ते ६००० तर सरासरी ४१०० रुपये असा दर होता. विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम आवारात कांद्याची २०१२ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतिक्विंटल २०० ते ८०० रुपये असा दर होता. बटाट्याची ९१५ क्विंटल आवक झाली होती. त्यास १००० ते १८०० रुपये असा दर मिळाला. डाळिंबाची १२४० डझन आवक झाली असून, त्यास प्रति दहा किलोस १०० ते ४०० रुपये असा दर होता. चिक्कूची ३५८० डझन आवक झाली होती. चिक्कूस प्रति दहा किलोस १०० ते ४०० रुपये असा दर होता. आंबा बॉक्‍स (प्रतिबॉक्‍स एक डझनाचा) २०२८९ आवक झाली असून प्रतिपेटीस १०० ते ५०० रुपये असा दर मिळाला. सफरचंदाची २०० पेटीची आवक झाली होती. सफरचंदाच्या प्रतिपेटीस १००० ते १५०० रुपये असा दर मिळाला.   

सांगली बाजार समितीत मंगळवारी (ता. १५) आवक झालेला शेतीमाल (आवक व दर क्विंटलमध्ये)
शेतीमाल आवक किमान कमाल सरासरी
मटकी ३५ ४५०० ६००० ५२५०
ज्वारी (शाळू) २२५ १७५० २७०० २२२५
ज्वारी (हायब्रीड) ९५ १७०० १७५० १७२५
बाजरी ६१ १४२५ १६५० १५३८
गहू २९५ १७५० २७०० २२५०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com