agriculture news in Marathi, jaggery season affected by rain in kolhapur district, Maharashtra | Agrowon

पाडव्यानिमित्त गूळ सौद्याचा केवळ मुहूर्तच
राजकुमार चौगुले
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर: गुळाच्या मुहूर्ताच्या सौद्यास आज (ता. २०) येथील बाजार समितीत प्रारंभ होत असला, तरी जोरदार पावसाने अद्याप ही गुऱ्हाळे सुरू झाली नाहीत. यामुळे प्रत्यक्षात गूळ येण्यास अजून पंधरा दिवसांचा कालावधी लागणार आहे. बाजार समितीत प्रत्येक वर्षी दीपावली पाडव्यानिमित्त मुहूर्ताचे सौदे निघतात; मात्र यंदा पाडव्यानिमित्त गूळ सौद्याचा केवळ मुहूर्तच होईल, अशी शक्यता आहे. 

कोल्हापूर: गुळाच्या मुहूर्ताच्या सौद्यास आज (ता. २०) येथील बाजार समितीत प्रारंभ होत असला, तरी जोरदार पावसाने अद्याप ही गुऱ्हाळे सुरू झाली नाहीत. यामुळे प्रत्यक्षात गूळ येण्यास अजून पंधरा दिवसांचा कालावधी लागणार आहे. बाजार समितीत प्रत्येक वर्षी दीपावली पाडव्यानिमित्त मुहूर्ताचे सौदे निघतात; मात्र यंदा पाडव्यानिमित्त गूळ सौद्याचा केवळ मुहूर्तच होईल, अशी शक्यता आहे. 

गेल्या काही वर्षांत परतीच्या पावसाने एखादा आठवड्याचा विलंब गूळनिर्मितीसाठी व्हायचा. यंदा सलग पंधरा दिवस दररोज जोरदार पाऊस झाल्याने गुऱ्हाळघरांचे वेळापत्रकच विस्कळित झाले आहे. गुऱ्हाळघराला जाणाऱ्या ऊस शेतीतही पाणी साचून राहिल्याने अद्याप ऊसतोडणीसाठी वाफसा नाही. पाऊस थांबून दोन तीन दिवस झाले; तरीही शेतातून पाणी हटत नसल्याची परिस्थिती आहे. ऊसतोडणीसाठी पूर्ण वाफसा येण्यास आणखी किमान पंधरा दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे गूळ उत्पादकांनी सागितले. यामुळे स्वत:च्या शेतातील उसाचे गुऱ्हाळघरासाठी गाळप करणेही अशक्‍य असल्याचे गुऱ्हाळमालकांचे म्हणणे आहे.

 गुऱ्हाळच्या भोवताली सर्वत्र ओलसरपणा असल्याने जळण काढणे, ते सुरक्षित ठेवणे आव्हान ठरत आहे. जोरदार पावसामुळे तातडीने गूळनिर्मिती होणे सध्या तरी शक्‍य नसल्याचे गूळ उत्पादकांनी सांगितले. गुळाची नियमित आवक होण्यास नोव्हेंबरच उजाडेल, असा अंदाज गूळ उत्पादकांचा आहे. यामुळे पाडव्यानिमित्त केवळ मुहूर्तच होईल, प्रत्यक्षात यंदाचा गूळ नियमित येण्यास नोव्हेंबर उजाडण्याची शक्‍यता बाजार समितीतून व्यक्त होत आहे.

इतर बातम्या
शिवकुमार स्वामी यांचे १११व्या वर्षी...बंगळूर : तुमकुरू येथील सिद्धगंगा मठाचे प्रमुख,...
निफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवातनिफाड, जि. नाशिक  ः तालुक्‍यातील उगाव,...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : यंदाच्या दुष्काळी स्थितीमुळे नांदेड,...
शेतकऱ्यांना साह्यभूत नवनव्या योजना...कोल्हापूर : ‘‘शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न...
येलदरी धरणातील उपयुक्त पाणीसाठा...परभणी : पूर्णा नदीवरील येलदरी धरण तसेच...
...तर भविष्यात निवडणुका होणारच नाहीत :...कासेगाव, जि. सांगली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र...
नाशिक जिल्ह्यात पाण्यासाठी गावे पाहतात...येवला, जि. नाशिक : यंदा दुष्काळाच्या माहेरघरांसह...
थकीत पाच कोटी दिले तरच तूर खरेदीयवतमाळ ः खरेदी विक्री संघाचे थकीत कमिशन आणि...
पशुगणनेकरिता आता महिनाअखेरपर्यंत मुदतनागपूर   ः पशुगणनेसाठी पूरक साहित्याचा...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक टाळण्यासाठी...सांगली ः  दादा... द्राक्षांची विक्री करताना...
ट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण प्रकल्प...नागपूर ः कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील...
राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाणून...औरंगाबाद :  राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही...
पंजाब गारठलेले; काश्‍मीरला दिलासाश्रीनगर/चंडीगड : पंजाब आणि हरियानातील...
शेवगाव, वैजू बाभूळगाव येथे लोकसहभागातून...नगर   ः दुष्काळाने होरपळ सुरू असताना...
पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी आपले ज्ञान...बारामती, जि. पुणे  ः ज्याप्रमाणे...
पुणे विभागात ४२६२ शेततळ्यांची कामे पूर्णपुणे  ः दुष्काळी स्थितीत फळबागा, पिकांसाठी...
फसव्या भाजप सरकारला हद्दपार करा ः धनंजय...वरवट बकाल, जि. बुलडाणा   ः भाजप सरकारने...
कृषिक प्रदर्शनाला दिली दोन लाखांवर...बारामती, जि. पुणे  ः गेल्या चार दिवसांत दोन...
सरकारचे अपयश लोकांसमोर प्रभावीपणे...नगर   ः सरकार कामे करण्यापेक्षा घोषणा...
रस्ते विकासासाठी ३० हजार कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यात रस्ते विकासाचा भरीव...