agriculture news in marathi, Jaggery Testing Lab soon to check quality | Agrowon

गुळाचा दर्जा तपासण्यासाठी लवकरच गूळ टेस्टिंग लॅब
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

कोल्हापूर : बाजार समितीत येणाऱ्या गुळाची प्रत कायम राहावी, यासाठी लवकरच बाजार समितीत गूळ टेस्टिंग लॅब सुरू करण्यात येणार आहे. याचबरोबर गूळ उत्पादकाला चांगले दर मिळवून देण्यासाठी कोल्ड स्टोअरेजच्या उभारणीसही प्राधान्य देत असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती कृष्णात पाटील यांनी गुरुवारी (ता. 4) येथे दिली.

कोल्हापूर : बाजार समितीत येणाऱ्या गुळाची प्रत कायम राहावी, यासाठी लवकरच बाजार समितीत गूळ टेस्टिंग लॅब सुरू करण्यात येणार आहे. याचबरोबर गूळ उत्पादकाला चांगले दर मिळवून देण्यासाठी कोल्ड स्टोअरेजच्या उभारणीसही प्राधान्य देत असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती कृष्णात पाटील यांनी गुरुवारी (ता. 4) येथे दिली.

गेल्या महिन्यापासून गुळाचे दर घसरत आहेत. या बाबतीत विचारविनिमय करण्यासाठी बाजार समितीच्या वतीने गूळ उत्पादकांची बैठक बोलावण्यात आली, त्या वेळी ते बोलत होते. दर घसरत असल्याने गूळ उत्पादकांच्या संतापाचा सामना या वेळी संचालकांना करावा लागला. संतप्त गूळ उत्पादकांनी गुळाच्या दरवाढीसाठी काय करता येईल याकडे गांभीर्याने पाहावे, असे सांगत संचालकांना धारेवर धरले. हमीभाव मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचा ठराव या वेळी संमत करण्यात आला.

गेल्या महिन्यापासून गुळाचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. गुजरातच्या बाजारपेठेत बाहेरचा गूळ येत आहे. तसेच कोल्हापुरी गुळातही काही शेतकरी साखरेची भेसळ करून गूळ तयार करत आहेत. याचा फटका सगळ्यांनाच बसत असल्याने असे प्रकार उत्पादकांनी टाळावेत. कोल्हापुरी गुळाच्या ब्रॅंडला धोका उत्पन्न होइल असा गूळ तयार करू नये, यासाठी स्वत:च काहीतरी बंधने घालून घ्यावीत, असे आवाहन माजी उपसभापती विलास साठे यांनी केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भगवान काटे यांनी गूळ उत्पादकाच्या हितासाठी कोणालाही भेटण्याची तयारी आहे, असे सांगत असतानाच उत्पादक संजय पाटील यांनी भाषणबाजीपेक्षा दराचे काहीतरी बोला, अशी मागणी करीत गूळ उत्पादक दराच्या खेळात भरडला जात असल्याचे सांगितले.

गूळ तपासताना तो चाकू लावून तपासला जातो, हा प्रकार रोखण्याची गरज असल्याची मागणी तानाजी आंग्रे यांनी केली. संचालकांनी एकदातरी सौद्याच्या वेळी हजेरी लावावी, मग आमच्या व्यथा समजतील. तुम्ही आल्यानंतर दरात थोडीतरी वाढ झालेली तुम्हाला आढळून येईल असे सांगताच, अध्यक्ष श्री. पाटील यांच्यासह संचालकांनीही आम्ही सौद्याच्या वेळी उपस्थित राहून माहिती घेऊ असे कबूल केले. येत्या काही दिवसांत चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत यांच्यासह अन्य प्रतिनिधींची भेट घेऊन चर्चा करण्याचे बाजार समितीच्या प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. या वेळी श्रीकांत घाटगे, दादा पाटील, बी. जी. पाटील, बाळासाहेब पाटील आदी उत्पादकांनी तीव्र स्वरूपात आपल्या भावना मांडल्या. या वेळी उपसभापती अमित कांबळे, सचिव दिलीप राऊत आदींसह बाजार समितीचे संचालक उपस्थित होते.

"ऍग्रोवन'चा उल्लेख
"ऍग्रोवन'ने काही दिवसांपूर्वीच "उत्तर प्रदेशच्या गुळाचा कोल्हापुरी गुळाला फटका' अशा आशयाचे वृत्त दिले होते. याची चर्चा बैठकीत झाली. उत्तर प्रदेशच्या गुळाला रोखायचे असेल, तर कोल्हापुरी गुळाचा ब्रॅंड बळकट करण्याची गरज असल्याचे या वेळी वक्‍त्यांनी सांगितले. स्पर्धेत टिकून दर मिळविण्यासाठी उत्पादकांनी दर्जात तडजोड करू नये, असे आवाहन या वेळी वक्‍त्यांनी केले.

 

इतर ताज्या घडामोडी
शेतमालाला भाव न देणारे उत्पन्न दुप्पट...भंडारा : शेतमालाला भाव नसल्याने अधिक...
भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष : रावतेनागपूर : भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष...
कृषी सल्ला : भात, भुईमुग, आंबा,...भात ः सध्या रोपवाटिकेसाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू...
द्राक्ष बागेत रोगांच्या प्रादुर्भावाची... सर्व द्राक्ष विभागांमध्ये...
कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्‍यासक्रम...मुंबई : राहुरी येथील महात्मा फुले कृषी...
सातारा जिल्ह्यात आले लागवडीस गतीसातारा  ः उष्णतेत वाढीमुळे रखडलेल्या आले...
शेतकऱ्यांना मिळणार पाच रुपयांत पोटभर...लातूर  : शंभर-दीडशे किलोमीटर अंतरावरून आपला...
रोहित्राच्या बाॅक्समधील फ्यूज तारांच्या...परभणी ः जिल्ह्यातील कृषी पंपाना वीजपुरवठा...
नष्ट होत असलेल्या देशी वाणांचे संवर्धन...पुणे ः हरितक्रांतीच्या नादात अधिक उत्पादनाच्या...
यवतमाळ जिल्ह्यात फळबागांनी टाकल्या मानायवतमाळ  : कडाक्‍याच्या उन्हामुळे...
कागदपत्रांची पूर्तता करूनही लिलाव बंद...मालेगाव, जि. नाशिक  : मालेगाव कृषी उत्पन्‍न...
शेतकऱ्यांना ‘करार शेती’च्या माध्यमातून...नवी दिल्ली : शेतमालाचा बाजार आणि किंमतीतील...
सोलापूर बाजार समितीत ३९ कोटींचा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला,...नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व...
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...