‘जयभवानी’ने तयार केला स्वत:चा जलमार्ग

‘जयभवानी’ने तयार केला स्वत:चा जलमार्ग
‘जयभवानी’ने तयार केला स्वत:चा जलमार्ग

बीड : कुठलाही कारखाना चालविण्यासाठी कच्च्या मालाईतकाच पाणी महत्त्वाचे आहे. कच्चा माल असूनही पाणीटंचाईमुळेच कारखाने बंद राहतात. सरत्या हंगामात पाण्यामुळे डिस्टिलरी प्रकल्प काही काळ बंद राहून नुकसान झाल्याच्या अनुभवातून गढी (ता. गेवराई) येथील जयभवानी सहकारी साखर कारखान्याने आता स्वत:चा जलमार्ग शोधला आहे. कारखान्याने नऊ कोटी ६० लाख लिटर क्षमतेचे महाकाय शेततळे खोदले आहे. जयभवानी साखर कारखान्याची अडीच हजार मेट्रिक टन प्रतिदिन गाळप क्षमता आहे. गेवराई परिसरातील एकमेव कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरलेला आहे. दुष्काळामुळे २०११ पासून पाच वर्षे कारखाना बंद होता. सरत्या हंगामात कारखान्याने तीन लाख ६९ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून तीन लाख ५५ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले. कारखान्यात प्रतिदिन ३० हजार लिटर डिस्टिलरी उत्पादन क्षमतेचा प्रकल्प असून शेवटच्या पंधरवड्यात पाणीटंचाईने प्रकल्प बंद राहिल्याने तब्बल साडेचार लाख लिटर डिस्टिलरीचे उत्पादन बुडाले. त्यामुळे कारखान्याचे सव्वा कोटी रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान, कारखान्यासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी शिंदेवाडी तलाव आणि गोदावरी नदीवरून १७ किलोमीटर अंतराच्या पाईपलाईनने पाणी आणले जाते; मात्र शेवटच्या टप्प्यात पाणी कमी पडल्याने कारखान्याला हे नुकसान सहन करावे लागले.  आता शेततळ्यातून जलमार्ग कारखान्याने आता शेततळ्याच्या माध्यमातून स्वत:चा जलमार्ग तयार केला आहे. २४ हजार स्क्वेअर फूट जागेत शेततळे खोदले आहे. ६० मीटर रुंद आणि ११५ मीटर लांबीचे शेततळ्याच्या भिंतीची उंची १० मीटर एवढी आहे. शेततळ्यात सहा कोटी ९० लाख लिटर पाणी साठणार आहे. शेततळ्यात ११ लाख रुपये खर्च करून ताडपत्री टाकल्याने पाणी झिरपण्याचाही प्रश्‍न नाही. खोदकाम आणि ताडपत्रीसाठी ६० लाख रुपयांचा खर्च आला आहे. पावसाळ्यात परिसरातील नदीतून वाहून जाणारे पाणी साठविण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com