agriculture news in marathi, Jain freshfood takeovers Belgium's Innova Food company | Agrowon

‘जैन’कडून बेल्जियमच्या इनोव्हा फूड्स कंपनीचे अधिग्रहण
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 मार्च 2018

जळगाव : जैन इरिगेशनची उपकंपनी जैन फार्म फ्रेश फूड्‌सने जागतिक दर्जाच्या बेल्जियम येथील इनोव्हा फूड्‌ या कंपनीचे शंभर टक्के भागभांडवल खरेदी करून तिचे अधिग्रहण केले. इनोव्हा फूडच्या अधिग्रहणामुळे युरोपियन बाजारपेठांसह आशियाई देशांमध्ये जैन फार्म फ्रेश फूड्‌सच्या उत्पादनांची शृंखला पोचणार आहे. यामूळे गुणवत्तापूर्ण कांदा, लसूण निर्जलीकरण केलेल्या भाज्या आणि नुकताच सुरू झालेल्या मसाला व्यवसायाचा विस्तार वाढला आहे.

जळगाव : जैन इरिगेशनची उपकंपनी जैन फार्म फ्रेश फूड्‌सने जागतिक दर्जाच्या बेल्जियम येथील इनोव्हा फूड्‌ या कंपनीचे शंभर टक्के भागभांडवल खरेदी करून तिचे अधिग्रहण केले. इनोव्हा फूडच्या अधिग्रहणामुळे युरोपियन बाजारपेठांसह आशियाई देशांमध्ये जैन फार्म फ्रेश फूड्‌सच्या उत्पादनांची शृंखला पोचणार आहे. यामूळे गुणवत्तापूर्ण कांदा, लसूण निर्जलीकरण केलेल्या भाज्या आणि नुकताच सुरू झालेल्या मसाला व्यवसायाचा विस्तार वाढला आहे.

जैन फार्म फ्रेश फूड्‌स लिमिटेड ही जगातील सर्वांत मोठी फळ आणि भाजीपाला प्रक्रिया करणारी कंपनी आहे. जैन फार्म फ्रेश फूड्‌सने बेल्जिमयच्या इनोव्हा फूड्‌स एन. व्ही. बेल्जियम आणि संलग्न कंपन्यांचे शंभर टक्के भागभांडवल खरेदी केले. इनोव्हा फूड ही कंपनी बेल्जियममधील निर्जलीकरण केलेल्या भाजीपाला, मसाले, मसाले अर्क आणि इतर अन्न घटकांची विक्री करणारी कंपनी आहे. इनोव्ह फूड्‌सने भारत, चीन, अमेरिका (यूएसए), युरोपीयन युनियन (इयू), मोरोक्को, इंडोनेशिया आणि उझबेकिस्तान या देशांत उत्तम गुणवत्ता, अजोड आणि दीर्घकालीन पुरवठा साखळी विकसित केली आहे.

बेल्जियम येथील अँटवर्प येथे या कंपनीचे प्रमुख कार्यालय आहे. इनोव्हा फूडच्या अधिग्रहणामुळे जैन फार्म फ्रेश फूड्‌सचे युरोपियन युनियनमधील महत्त्वाच्या बाजारपेठेत व्हर्टिकल इंटिग्रेशन होईल.
इनोव्हा फूड ही व्यवस्थापन केलेली नफ्यातील कंपनी आहे. इनोव्हा फूडचा सध्याचा व्यवस्थापन गट तसाच कायम राहून पुढील भविष्यातील वाढीसाठी प्रयत्न केले जातील.

विकसनशील व गतिशील कंपनीत गुंतवणूक करताना अतिशय आनंद होत आहे. मागील काही काळापासून जैन आणि इनोव्हा फूड्‌स यांचे घनिष्ठ संबध आहेत. जैन फार्म फ्रेश फूड्‌सच्या दृष्टीने हे अधिग्रहण महत्त्वाचे ठरणार आहे.
- अनिल जैन, अध्यक्ष, जैन फार्म फ्रेश फूड्स लि. जळगाव

गेल्या पंधरा वर्षांपासून भारतातील जैन फार्म फ्रेश फूड्स लि. आमचा महत्त्वाचा पुरवठादार आहे. आता हे संबंध अधिक दृढ झाले आहेत. जैन फार्म फ्रेश फूड्‌सच्या निर्जलकीकरण केलेल्या भाज्या आणि मसाला व्यवसाय यामुळे इनोव्हा फूड्‌सला निष्ठावान ग्राहकांना सेवा देता येईल.
- मिचेल ड्रायसेन्स, अध्यक्ष, इनोव्हा फूड्‌स एन. व्ही. बेल्जियम 

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...
हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर झाले...नागपूर ः शासनाची हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर...
नगरला गव्हाला १६४१ ते १८५० रुपये...नगर : नगर बाजार समितीत गव्हाची आवक बऱ्यापैकी होत...
नाशिकला आंबा, खरबूज, कलिंगड तेजीतनाशिक : वाढत्या उन्हाबरोबरच नाशिक बाजार समितीत...
कासवाच्या लिंगनिर्धारणामागील जनुकीय...गेल्या ५० वर्षांपासून अंडी उबण्याच्या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा  : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा वाढू...
अग्रणी नदी पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यातसांगली : तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील अग्रणी...
पुण्यातील डाळिंब, पेरू, चिकू बागांना...पुणे  : जिल्ह्यातील मृग बहारातील डाळिंब,...
इंदापुरातील नीराकाठची पिके जळण्याच्या...वालचंदनगर, जि. पुणे  ः इंदापूर तालुक्‍यातील...
नगर जिल्ह्यात ‘कृषी’च्या कामांवरच ‘...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानाची कामे...
विषबाधा बळीप्रकरणी पावणेदोन कोटींची मदतअकोला : कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन मृत...
हिंगोलीतील १०३ गावांची ‘जलयुक्त शिवार’...हिंगोली : जलयुक्त शिवार अभियानाच्या चौथ्या...
विधान परिषदेच्या ६ जागांसाठी उत्साहात...मुंबई ः स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान...
सैन्य दलात अधिकारी होण्याची संधीमुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात...
कर्नाटक: कामगारांच्या पत्राशेडमध्ये...विजयपूर : नुकतेच कर्नाटकात विधानसभेची निवडणुका...