Agriculture News in Marathi, Jakraya sugar delared purchase price of sugarcane, solapur district | Agrowon

जकराया शुगरकडून एकरकमी २५०० रुपये दर
टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 नोव्हेंबर 2017
सोलापूर ः ऊसदराच्या प्रश्‍नावरून सोलापूर जिल्ह्यात रान उठले अाहे. २७०० रुपयांची मागणी असताना शेतकरी संघटनांनी एक पाऊल मागे घेत एफआरपी अधिक ४०० रुपयांचा तोडगा मान्य करून माघार घेतली, पण कारखानदार अजूनही एकमेकांची वाट बघत बसले आहेत.
 
सोलापूर जिल्ह्यातीलच वटवटे (ता. मोहोळ) येथील जकराया शुगरने सर्वात अगोदर जाहीर केल्याप्रमाणे यंदाच्या हंगामाचा २५०० रुपयांचा दर बोलल्याप्रमाणे शेतकऱ्यांना अदा करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे अन्य कारखाने आता तरी बधतील का, हा प्रश्‍न आहे. गेल्या काही दिवसांपासून ऊसदराचा हा विषय जिल्ह्यात चांगलाच धुमसत आहे.
 
स्वाभिमानी, रयत, मनसे, जनहित या शेतकरी संघटनांनी आंदोलन आक्रमक पद्धतीने करून ते वाढवले होते, पण चर्चेच्या फेऱ्यानंतर एफआरपी अधिक ४०० रुपयांवर तोडगा निघाला. हा सगळा गोंधळ जिल्ह्यात सुरू असताना, त्या आधीच जकराया शुगरचे चेअरमन बी. डी. जाधव यांनी त्यांच्या कारखान्याच्या वतीने २५०० रुपये पहिला हप्ता देणार असल्याचे जाहीर करून, सगळ्यांनाच धक्का दिला. 
 

 भाजपसह अन्य संघटनांचा रास्ता रोको
ऊसदराच्या प्रश्‍नावर सोलापूर-पुणे महामार्गावर टेंभुर्णीत शुक्रवारी (ता.२४) सकाळी दहाच्या सुमारास भारतीय जनता पक्षाच्या तालुका शाखेसह इतर संघटनांनी रास्ता-रोको आंदोलन केले. इतके दिवस शेतकरी संघटनाच या प्रश्‍नात आक्रमक झाल्या होत्या, पण आता भाजपही या आंदोलनात उतरल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. भाजपचे संजय कोकाटे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजी कांबळे आदींनी याचे नेतृत्व केले.

 

आमची कोणाशीही स्पर्धा नाही. आम्ही बोलल्याप्रमाणे दर जाहीर केला आणि पहिला हप्ताही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे. भविष्यात सगळ्यांबरोबर जो अंतिम दर राहिल, त्याप्रमाणे आम्ही तो देऊ. 
- सचिन जाधव, सरव्यवस्थापक, जकराया शुगर, वटवटे

इतर ताज्या घडामोडी
स्मार्ट अचिव्हर्स योजनेचे विदर्भातील...पुणे ः राज्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास...
स्मार्ट अचिव्हर्स योजनेचे वऱ्हाडमधील...पुणे ः राज्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास...
वरुड येथे दूध दरप्रश्नी `स्वाभिमानी`चे...अमरावती   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध...
स्मार्ट अचिव्हर्स योजनेतील सहावे बक्षिस...पुणे ः राज्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास...
नाबार्ड पाच हजार `एफपीओं`चे उद्दिष्ट...``नाबार्डने शेतकरी उत्पादक संघ (एफपीओ) स्थापन...
अन्य सस्तनापेक्षा उंदराची विचार...दृष्टी किंवा दृश्यावर आधारीत समस्या सोडविण्यासाठी...
आंदोलन होणार असेल तर, आमचेही कार्यकर्ते...नाशिक : दुधाला दरवाढ दिली असून दूध संघांनी...
पशुखाद्याद्वारेही विषारी घटक शिरताहेत...पर्यावरणामध्ये वाढत असलेल्या सेंद्रिय प्रदूषक...
कोय, भेट पद्धतीने फळझाडांचे कलमीकरणआंब्याची अभिवृद्धी कोय कलम, पाचर कलमांद्वारे केली...
सातत्याने हेडर्स ठरू शकतात मेंदूसाठी...सध्या विश्वचषकामुळे फुटबॉलचा ज्वर सर्वत्र पसरलेला...
शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर कामगंध...जळगाव : बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी...
दारणा धरण ५०, तर पुनंद १०० टक्के भरलेइगतपुरी, जि. नाशिक  :  इगतपुरी...
मुंबईला एक थेंबही दूध जाऊ देणार नाहीनाशिक : दुधाला ठरवून दिलेला दर मिळत नसल्याने...
सोलापूर बाजार समिती पदाधिकारी निवड...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
वीज वितरण यंत्रणा दुरुस्तीसाठी ७५००...नागपूर   : राज्यातील वीज वितरण करणाऱ्या...
परभणीतील पीकविमा परतावाप्रश्नी ठोस...परभणी : पीकविमा परतावाप्रश्नी ठोस तोडगा निघत...
किसान सभा,शेतकरी संघर्ष समितीचा दूध...नाशिक  : दुधाला किमान २७ रुपये भाव द्यावा,...
मंत्री जानकर यांची दूध दरवाढीत एजंटशिप...कऱ्हाड, जि. सातारा : दुग्ध विकास व...
पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाची...पुणे  : पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रांमध्ये...
कपाशी नुकसानीपोटी मराठवाड्यासाठी ४०७...औरंगाबाद  : गुलाबी बोंड अळीच्या...