परभणी जिल्ह्यात ‘जलयुक्त’ १११ गावांत प्रस्तावित

परभणी जिल्ह्यात ‘जलयुक्त’ १११ गावांत प्रस्तावित
परभणी जिल्ह्यात ‘जलयुक्त’ १११ गावांत प्रस्तावित

परभणी : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात २०१८-१९ मध्ये निवड झालेल्या १२४ गावांपैकी १११ गावांच्या आराखड्यामध्ये जलसंधारणाची १ हजार ९२३ कामे प्रस्तावित आहेत. त्यासाठी ३१ कोटी ६ लाख ९८ हजार रुपये निधी प्रस्तावित आहे. आजवर कार्यारंभ दिलेल्या कामांपैकी २५५ कामे पूर्ण झाली आहेत.

या अभियानद्वारे चौथ्या वर्षी २०१८-१९ मध्ये परभणी जिल्ह्यातील १२४ गावांची निवड झाली. यापैकी १११ गावांच्या शिवारात विविध यंत्रणांमार्फत करावयाच्या विविध प्रकारच्या जलसंधारणाच्या कामांचा आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार १ हजार ९२३ कामे प्रस्तावित करण्यात आली. त्यावर ३१ कोटी ६ लाख ९८ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रस्तावित कामांपैकी १ हजार ५३८ कामांच्या २२ कोटी २३ लाख ७ हजार रुपये निधी खर्चाची अंदाजपत्रके तयार करण्यात आली आहेत. १ हजार ४३५ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, १ हजार १२८ कामांची निविदा पूर्ण झाली आहे. ७ कोटी ८१ लाख ४२ हजार रुपये निधीच्या ७४१ कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. त्यापैकी २५५ कामे पूर्ण झाली असून, ५२ कामे सुरू आहेत. अद्याप ४३४ कामे सुरू झालेली नाहीत.

चालू वर्षी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत १ हजार २१८ कामे, जालना येथील जलसंधारण अधिकारी कार्यालयामार्फत ३० कामे, परभणी जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागामार्फत ६७ कामे, विभागीय वन अधिकारी कार्यालयामार्फत ४ कामे, सामाजिक वनीकरण विभागामार्फत ४१ कामे, वरिष्ठ भू-वैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि वाकस यंत्रणेमार्फत २२६ कामे केली जाणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com