agriculture news in Marathi, Jalgaon and Raver Constituency for BJP, Maharashtra | Agrowon

जळगावसह रावेर मतदारसंघ भाजपकडेच?
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

जळगाव ः आगामी लोकसभा निवडणुकीसंबंधी शिवसेना व भाजपची युती झाल्याचे जाहीर झाल्यानंतर राजकीय आडाखे बांधायला सर्वांनी सुरवात केलेली आहे. यातच मागील फॉर्म्युल्यानुसार जळगाव व रावेर हे जळगाव जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघ भाजपसाठी सुटतील, अशी शक्‍यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. 

जळगाव ः आगामी लोकसभा निवडणुकीसंबंधी शिवसेना व भाजपची युती झाल्याचे जाहीर झाल्यानंतर राजकीय आडाखे बांधायला सर्वांनी सुरवात केलेली आहे. यातच मागील फॉर्म्युल्यानुसार जळगाव व रावेर हे जळगाव जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघ भाजपसाठी सुटतील, अशी शक्‍यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. 

मागील लोकसभा निवडणूक सेना-भाजपने एकत्रपणे लढली. त्या वेळेस जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघ भाजपसाठी सोडण्यात आले होते. जळगावसह रावेर लोकसभा मतदारसंघ मागील दोन पंचवार्षिक भाजपच्या ताब्यात आहे. रावेरात भाजपचे नेते एकनाथ खडसे यांची स्नुषा रक्षा खडसे या सध्या खासदार आहे. तर जळगावात ए. टी. पाटील हे सलग दोनदा निवडून आले आहे.

पाटील यांना मोटीलाटेत मोठे मताधिक्‍य मिळाले होते. यातच जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी मात्र शिवसेनेचा आग्रह आहे. शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते या युतीसंबंधी नाराज असले तरी पक्षादेश अंतिम असतील, असे सोमवारी (ता. १८) एका पत्रपरिषदेत राज्यमंत्री तथा शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे. 

मोदीनंतर गांधी धुळ्यात येणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (ता. १६) धुळ्यात प्रचारसभेसंबंधी आले. त्यांनी अहिराणी भाषेत संवाद साधून मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. आता काॅँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे येत्या १ मार्च रोजी धुळ्यात प्रचारसभेनिमित्त येणार आहे. मोठे शक्तीप्रदर्शन काॅँग्रेस या सभेनिमित्त करणार असल्याचे सांगितले जात आहे.

इतर ताज्या घडामोडी
नदी नांगरणीचे सातपुड्याच्या पायथ्याशी...जळगाव ः शिवार व गावांमधील जलसंकट लक्षात घेता...
प्रत्येक गावात नेमणार भूजल...नगर ः राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता...
अरुणाग्रस्तांच्या स्थलांतराचा तिढा कायम सिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पग्रस्त आणि जिल्हा...
पाणीप्रश्नावरील आंदोलनाचे नेतृत्व करणार...नगर : ‘कुकडी’सह घोड धरणातील पाणीसाठे वाढविणे...
पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात...पुणे : मॉन्सूनचा पाऊस लांबल्याने जिल्ह्यात...
नाशिकमध्ये आले प्रतिक्विंटल ८७०० ते...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
आव्हानांवर मात करण्यासाठी कारखान्यांनी...पुणे : साखर उद्योगासाठी यंदाचे वर्ष ‘टर्निंग...
गेल्या खरिपातील सोयाबीनचे बियाणे झाले...परभणी  : २०१८-१९ च्या खरीप हंगामात...
पीकविम्याच्या नावाखाली भाजप सरकारकडून...मुंबई : शेतकऱ्यांकडून पीक कर्ज घेताना...
विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...मुंबई : नवनिर्वाचित गृहनिर्माणमंत्री...
सोयाबीन पीकविमाप्रश्‍नी शेतकरी संघर्ष...पुणे  ः गेल्या वर्षी बीड जिल्ह्यात पाऊस न...
कळमणा बाजार समितीत हरभरा ४१०० रुपयांवरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत हरभरा वगळता...
सोलापुरात हिरवी मिरची, टोमॅटोच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...