agriculture news in Marathi, In Jalgaon, Dadar rates up to 3100 rupees | Agrowon

जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (ज्वारी) आवक सुरू झाली असून, मागील आठवड्यात प्रतिदिन सरासरी १०० क्विंटल आवक झाली. सुरवातीच्या दरांचा लाभ ज्वारी उत्पादकांना काहीसा मिळत असून, सरासरी ३१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. 

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (ज्वारी) आवक सुरू झाली असून, मागील आठवड्यात प्रतिदिन सरासरी १०० क्विंटल आवक झाली. सुरवातीच्या दरांचा लाभ ज्वारी उत्पादकांना काहीसा मिळत असून, सरासरी ३१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. 

आवक जळगाव, पाचोरा, जामनेर व धरणगाव भागांतून सुरू आहे. कोरडवाहू क्षेत्रात ओलावा नसल्याने पेरणी नगण्य झाली होती. गिरणा व तापी नदीकाठीच पेरणी झाली होती. ऑक्‍टोबरमध्ये पेरणी केलेल्या दादरची मळणी जवळपास पूर्ण झाली आहे. तर नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये पेरणीच्या दादरची मळणी व्हायला अजून महिनाभर वेळ लागेल. ज्यांनी आगाप पेरणी केली, त्यांनाच या दरांचा लाभ होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

मागील हंगामात दादरला सुरवातीला कमाल २७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला होता. या हंगामात दर बऱ्यापैकी असून, ते टिकून राहतील, असा अंदाज आहे. 

जळगावसह चोपड व अमळनेरच्या बाजारातही दादरची कमी अधिक स्वरूपात आवक मागील आठवड्यातच सुरू झाली. अमळनेर बाजारात सर्वाधिक प्रतिदिन २०० क्विंटलपर्यंतची आवक झाल्याची माहिती मिळाली. तेथेही दर ३१०० ते ३२०० पर्यंत आहेत. उत्पादन दर्जेदार असल्याने दरांबाबत कुठलीही तडजोड केली जात नसल्याचे सांगितले जात आहे. पुढील आठवड्यात आवक वाढू शकते. 

दादरच्या कडब्यासही यंदा एकरी ११ हजार रुपये उच्चांकी दर मिळाला आहे. हा कडबा कसदार व टिकाऊ मानला जातो. दुधाळ पशुधनासाठी अगदी धुळे, मध्य प्रदेशातील शेतकरी या कडब्याची खरेदी चोपडा, जळगाव, अमळनेर भागांतून करतात. एक एकरात किमान १७० ते २०० पेंढ्या कडबा मिळत आहे. मागील हंगामाच्या तुलनेत कडब्यास एकरी अडीच हजारांचा दर अधिक असल्याचे सांगण्यात आले.

तूर दर टिकून
संकरित व पारंपरिक वाणांच्या तुरीचे दर महिनाभरापासून टिकून असून, तुरीची आवक फक्त रावेर, चोपडा, अमळनेर, मुक्ताईनगर व पाचोरा येथील बाजारात कमी अधिक स्वरूपात होत आहे. लागवडच फक्त १८०० हेक्‍टरपर्यंत होती. बागायती किंवा सिंचनाची सुविधा असलेल्या तुरीचे उत्पादन बऱ्यापैकी असून, सध्या क्विंटलमागे ५३५० ते ५५०० रुपयांपर्यंतचे दर आहेत. पारंपरिक वाणांच्या तुरीला अधिक उठाव आहे. प्रमुख चार बाजार समित्यांमध्ये प्रतिदिन ५०० क्विंटलपर्यंतच तुरीची आवक होत आहे. 

केळी दरांवर दबाव
केळी दरांवर पाकिस्तानमधील निर्यात रखडत सुरू असल्याने दबाव आहे. यातच मागील आठवड्यात फैजपूर (ता. यावल) व सावदा (ता. रावेर) येथील एजंटनी केळीची पाकिस्तानात पाठवणूक करण्यास सपशेल नकार दिल्याने दर क्विंटलमागे २० ते ३० रुपयांनी कमी झाले. सध्या ९८० रुपये प्रतिक्विंटलचा दर नवती केळीला रावेर, यावल व मुक्ताईनगर भागांत मिळत आहे.

इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...
शेतकऱ्यांचे नाही, तर श्रीमंतांचे...प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९००...नगर ः नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भुसार...
शिरवळला पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे...सातारा : सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या...
स्वाभिमानीसोबत दिलजमाईसाठी बुलडाण्यात...बुलडाणा ः लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने...
जळगावात गव्हाची आवक रखडत; दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक टिकून;...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...