नियमित कर्जदार शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोचवाव्यात
चंद्रकांत जाधव
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

जळगाव : कर्जमाफीची प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने सुरू केलेली असली, तरी यात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना फारशा सवलती नाहीत. जेव्हा जेव्हा कर्जमाफी जाहीर केली जाते, तेव्हा नियमित कर्ज भरणाऱ्या सभासदांचे नुकसान केले जाते. नियमित कर्जदार शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत जळगाव जिल्हा बॅंकेने पोचवाव्यात, अशी मागणी शुक्रवारी
(ता.२२) जिल्हा बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली.

जळगाव : कर्जमाफीची प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने सुरू केलेली असली, तरी यात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना फारशा सवलती नाहीत. जेव्हा जेव्हा कर्जमाफी जाहीर केली जाते, तेव्हा नियमित कर्ज भरणाऱ्या सभासदांचे नुकसान केले जाते. नियमित कर्जदार शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत जळगाव जिल्हा बॅंकेने पोचवाव्यात, अशी मागणी शुक्रवारी
(ता.२२) जिल्हा बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली.

सकाळी बॅंकेच्या रिंगरोडनजीकच्या मुख्यालयातील सभागृहात ही सभा झाली. अध्यक्ष रोहिणी खडसे-खेवलकर, उपाध्यक्ष आमदार किशोर पाटील, बॅंकेचे ज्येष्ठ संचालक तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे, वाडिलाल राठोड, प्रा. चंद्रकांत सोनवणे, अमोल चिमणराव पाटील, नंदकिशोर महाजन, तिलोत्तमा पाटील, डॉ. सुरेश पाटील, नानासाहेब देशमुख, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख आदी व्यासपीठावर होते.

राज्य शासनाने थकीत कर्जदारांना कर्जमाफी दिली; पण त्यात अनेक जण वंचित राहत आहेत. यातच जे शेतकरी नियमित कर्ज भरतात, त्यांना मात्र या कर्जमाफीचा फारसा लाभ होताना दिसत नाही. याशिवाय अर्ज भरण्याची प्रक्रियाही क्‍लिष्ट आहे. या सर्व समस्यांची माहिती, शेतकऱ्यांच्या भावना जिल्हा बॅंकेने राज्य शासनापर्यंत पोचवाव्यात, अशी अपेक्षा उपस्थित विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली. त्यावर माजी मंत्री खडसे यांनी शासनापर्यंत शेतकऱ्यांचे म्हणणे पोचवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न जिल्हा बॅंक करील, असे म्हटले.

जिल्हा बॅंकेला या संचालक मंडळाच्या काळात अ वर्ग दर्जा मिळाला. तसेच बॅंकेच्या ठेवीदेखील वाढल्या, असे संचालक मंडळ बॅंकेला यापूर्वी कधी मिळाले नव्हते. ही बाब जिल्हा बॅंक व शेतकरी किंवा सभासद वर्गासाठी निश्‍चितच भूषणावह असल्याच्या प्रतिक्रिया सोसायट्यांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केल्या. जवळपास सव्वा तासामध्ये नऊ विषय मंजूर झाले.

इतर ताज्या घडामोडी
मंचर बाजार समितीत कटतीद्वारे लूटपुणे : पालेभाज्यांसाठी आणि विशेषतः काेथिंबीरीसाठी...
नांदेड विभागात ३३ कारखान्यांच्या...परभणी : नांदेड विभागातील ५ जिल्ह्यांतील ३३ साखर...
समृद्धी महामार्गाच्या विरोधाची धार...घोटी, जि. नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
तापमान पुन्हा वाढू लागलेपुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांशी...
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पाटण, जि. सातारा ः कोयना धरण पाणलोट क्षेत्रात...
सांगलीत ज्वारीच्या कणसांना दाणेच आले... सांगली : कृषी विभागाने शेतकऱ्यांना वाटप...
केळीवरील करपा निर्मूलनासाठी अनुदान... जळगाव : केळी पिकावर सातत्याने करप्याचा...
परतीच्या पावसाने रब्बी पेरणीचा खोळंबा परभणी : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
शिरूर तालुक्यातील पिकांचे पावसामुळे... रांजणगाव सांडस, जि. पुणे : शिरूर तालुक्यातील...
जळगाव जिल्ह्यात हरभऱ्याचे क्षेत्र... जळगाव :  जिल्ह्यात मागील चार ते पाच...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे सोधी...वाशीम : संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने राबविण्यात...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली, दर स्थिरपुणे : पावसामुळे मार्केट यार्ड येथील...
सिंचन प्रकल्पांसाठी ७१८० कोटींचे... मुंबई ः महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त...
आमचे पैसे दंडासह परत करा ः...अकोला ः कृषी व संलग्न विषयांमध्ये अाचार्य पदवी...
पुणे जिल्ह्यातील सोळा धरणे तुडुंबपुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून परतीच्या...
वैद्यकीय महाविद्यालयांतील तज्ज्ञांचे... यवतमाळ : कपाशीवर कीटकनाशकांची फवारणी करताना...
कापूस उत्पादनात घटीसोबत दरातही दिवाळेऔरंगाबाद : सोयाबीनची सोंगणी व कापसाची पहिली वेचनी...
कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात ः...पुणे : कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली...
नाशिक विभागात कांदा चाळींसाठीचा निधी... नाशिक : कांदा साठवणुकीची सोय नसल्याने...
जळगाव जिल्ह्यात सोयाबीन, ज्वारीची कापणी... जळगाव : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...