agriculture news in marathi, Jalgaon district farmers faces slow loan process for Kharif | Agrowon

जळगाव जिल्ह्यात पीक कर्ज वितरण संथगतीने
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 मे 2018

जळगाव : जिल्ह्यात खरीप पीक कर्ज वितरणासंबंधी राष्ट्रीयीकृत व इतर बॅंकांमध्ये धीम्या गतीने कार्यवाही सुरू असून, निर्देशित लक्ष्यांकाच्या ३० टक्केही कर्ज वितरण जिल्ह्यात झालेले नसल्याची माहिती आहे. 

जळगाव : जिल्ह्यात खरीप पीक कर्ज वितरणासंबंधी राष्ट्रीयीकृत व इतर बॅंकांमध्ये धीम्या गतीने कार्यवाही सुरू असून, निर्देशित लक्ष्यांकाच्या ३० टक्केही कर्ज वितरण जिल्ह्यात झालेले नसल्याची माहिती आहे. 

अग्रणी बॅंक व इतर सहकारी बॅंकांसोबत जिल्हाधिकारी यांनी पतपुरवठा आराखडा व खरीप पीक कर्ज याबाबत चर्चा केली होती. या वेळेस एकही शेतकरी कर्जाविना राहायला नको, कर्ज वितरण लवकर करावे, अशा सूचना दिल्या होत्या. परंतु या सूचनांनुसार कार्यवाही झालेली नाही. कारण जिल्ह्यात सर्व बॅंकांना मिळून सुमारे १८०० कोटी खरीप पीक कर्ज वितरण करायचे आहे. यातील ३० टक्के वितरणही झालेले नाही. मध्यंतरी राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये रोकडटंचाई होती. सध्या कोणत्याही टंचाईची माहिती समोर आलेली नसली तरी कर्ज वितरण फारशा गतीने सुरू नाही. जिल्हा बॅंकेने आपले कर्ज दर मंजूर करून पीक कर्ज वितरणास वेळेत सुरवात केली. परंतु कर्जमाफीचा घोळ व इतर कामे यात नियमित कर्जदारांना कर्ज वितरणाच्या कामावर काहीसा परिणाम दिसून येत आहे, असे विविध कार्यकाही सहकारी सोसायट्यांच्या सचिवांचे म्हणणे आहे. जिल्हा बॅंक सोसायट्यांना पतपुरवठा करते. सोसायटीकडून शेतकऱ्याला कर्ज मिळते. कर्जासंबंधी शेतकऱ्यांनी आपले सातबारा उतारे सचिव यांच्याकडे दिले आहेत. सचिव मंडळीने फक्त नियमित कर्जदारांकडून सातबारा उतारे घेतले आहेत. यात काही नियमित कर्जदारांचे सातबारा उतारे अजूनही सचिवांनी पूर्णपणे गोळा केलेले नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

मे महिन्यात नियमित कर्जदारांना कर्ज वितरण पूर्ण होईल, असे सांगितले जात होते. परंतु कर्ज वितरण अजूनही पूर्ण झालेले नाही. काही सोसायट्यांमध्ये तर एकाही शेतकऱ्याला कर्ज मिळालेले नाही. वित्तीय अडचणींमुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाच्या नियोजनावर परिणाम होत आहे. कारण शेतकऱ्यांना जमीन तयार करणे, बियाणे, मजुरी यासाठी निधीची गरज आहे. जिल्ह्यात कापूस उत्पादक अधिक आहेत. त्यांना बियाणे घ्यावे लागणार आहे. तसेच बागायतदार किंवा कृत्रीम जलसाठे उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना ठिबक, ठिबकचे सबमेन पाइप यासाठी निधीची गरज असणार आहे. परंतु हातात पुरेसा पैसा नसल्याने शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडत आहे. उधार, उसनवारीने शेतीची मशागत व इतर प्राथमिक कामे शेतकऱ्यांना करून घ्यावी लागत असल्याचे सांगितले जात आहे. 

राष्ट्रीयीकृत व इतर बॅंकांकडून पीक कर्ज वितरण गतीने सुरू नाही. यामुळे कर्ज भरूनही शेतकरी पैशांच्या प्रतीक्षेत आहेत. सध्याच्या काळात शेतकऱ्यांकडे पुरेसे पैसे हवे असतात. परंतु शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन कोणीही काम करीत नसल्याचे चित्र आहे. 
- रमेश पाटील, शेतकरी, रावेर

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...