agriculture news in marathi, Jalgaon district Growth of onion nursery | Agrowon

जळगाव जिल्ह्यात कांदा रोपवाटिकेत वाढ
टीम अॅग्रोवन
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

जळगाव : जळगाव जिल्ह्यात तापी व गिरणा काठावरील गावांमध्ये कांदा रोपवाटिका यंदा वाढत असून, शेतकरी ६०० ते ८०० रुपये प्रतिकिलो दराचे बियाणे आणून त्याची पेरणी वाफ्यांमध्ये करीत आहेत. प्रतिवाफा १२०० ते १५०० रुपये दरात विक्री होईल, असा विश्‍वास शेतकऱ्यांना आहे.

जळगाव : जळगाव जिल्ह्यात तापी व गिरणा काठावरील गावांमध्ये कांदा रोपवाटिका यंदा वाढत असून, शेतकरी ६०० ते ८०० रुपये प्रतिकिलो दराचे बियाणे आणून त्याची पेरणी वाफ्यांमध्ये करीत आहेत. प्रतिवाफा १२०० ते १५०० रुपये दरात विक्री होईल, असा विश्‍वास शेतकऱ्यांना आहे.

यंदा धुळे जिल्हा दुष्काळी स्थितीत असल्याने नुकसान झाले आहे. कांदा लागवड कमी होईल, अशी स्थिती आहे. कारण कूपनलिका किंवा विहिरींचे पाणी फक्‍त जानेवारीपर्यंतच पुरेल. कांद्याला मार्चअखेरपर्यंत पाणी लागेल. जळगाव जिल्ह्यातील गिरणा व तापी काठावरील गावांमध्ये कांदा लागवड वाढणार आहे. सध्या दर बऱ्यापैकी आहेत. अनेक शेतकरी रोपवाटिका तयार करीत आहेत. तीन बाय २० फुटांचे वाफे १२०० ते १५०० रुपयांना विकले जातील. रोपे विक्रीतूनच नफा मिळविण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे.

बी पेरल्यानंतर दीड महिन्यात रोप लागवडीसाठी तयार होते. कमी वेळेत आणि जागेत नफा कमविण्यासाठी शेतकऱ्यांनी रोपवाटिकांवर भर दिला आहे. तीन बाय २० ते २२ फुटांच्या १४ वाफ्यांमध्ये चार किलो बियाणे टाकत आहेत. रोपवाटिका जळगाव, चोपडा, धरणगाव, एरंडोल व पाचोरा तालुक्‍यात अधिक आहेत.

लागवड रावेर, यावल, चोपडा व जळगाव भागात वाढेल. कारण कांदा फक्त साडेतीन महिन्यांचे पीक असून, बेवडसाठीही उपयुक्त आहे. डिसेंबरमध्ये लागवड
केल्यास मार्चअखेर क्षेत्र रिकामे होईल. लागलीच त्या क्षेत्रात कापसाची लागवड करता येईल. जमिनीचा पोतही सुधारेल. म्हणून कांदा लागवडीला शेतकरी पसंती देत आहेत, असे सांगण्यात आले.

इतर बातम्या
सोलापूर जिल्ह्यात चार पाणीपुरवठा...सोलापूर : जिल्ह्यातील महाराष्ट्र जीवन...
आपेगाव, हिरडपुरी बंधाऱ्यांत पाणी न...औरंगाबाद : जायकवाडी प्रकल्पाखाली असलेल्या...
गोंदिया जिल्ह्यात ‘जलयुक्‍त’साठी १४...गोंदिया ः राज्य दुष्काळमुक्‍त करण्याच्या...
अकोल्यात आंतरविद्यापीठ कर्मचारी क्रीडा...अकोला ः सुवर्ण जयंती क्रीडा महोत्सवातंर्गत येथे...
‘कर्जाची वरात मुख्यमंत्र्यांच्या दारात...नागपूर  ः शेतकऱ्यांचा सात-बारा उतारा सरसकट...
औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...
`सेवाकर प्रश्न मिटेपर्यंत सांगलीत...सांगली   : मुंबईत भाजप कार्यालयातील...
पुणे जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र ४१ हजार...पुणे  ः जमिनीत ओल नसल्याने यंदा रब्बी...
राज्यात तरी लोकायुक्तांची नियुक्ती करा...नगर   : ‘लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी...
कांदा पट्टयात अस्वस्थता; चौघांनी संपवले...नाशिक   ः गंभीर दुष्काळ स्थिती, कर्ज,...
`कृषिक`मध्ये शेवंतीच्या जाती,...बारामती, जि. पुणे  ः येथे आयोजित कृषिक...
कांद्याच्या उभ्या पिकात चरण्यासाठी...राहुरी, जि. नगर  : कूपनलिकेचे पाणी अचानक...
‘एमसीडीसी’ शेतकरी कंपन्या स्थापन करणारपुणे : महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ नाबार्डच्या...
अप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...
सोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...
धान उत्पादकांना बोनस कधी?नागपूर : लगतच्या छत्तीसगड राज्याच्या तुलनेत...
उत्तर भारतात थंडी कायमश्रीनगर : जम्मू-काश्‍मीर, पंजाब, हरियाना व हिमाचल...
राज्यात थंडी झाली कमीपुणे : राज्यात अपवाद वगळता सर्वच ठिकाणच्या किमान...
'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच...नवी दिल्ली  : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि...
संत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल...नागपूर  ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित...