agriculture news in marathi, Jalgaon district have sufficient fertilizers for kharif Season assures Agri department | Agrowon

जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खते
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 मे 2018

जळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. रावेर, चोपडा व यावल भागात शेतकरी खतांचा संचयही करून घेत आहेत. खते मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, युरिया व इतर सरळ खते आणि मिश्र खतांचा मुबलक पुरवठा झाला आहे. कुठलीही खतटंचाई यंदा भासणार नाही, असा दावा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केला आहे. 

जळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. रावेर, चोपडा व यावल भागात शेतकरी खतांचा संचयही करून घेत आहेत. खते मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, युरिया व इतर सरळ खते आणि मिश्र खतांचा मुबलक पुरवठा झाला आहे. कुठलीही खतटंचाई यंदा भासणार नाही, असा दावा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केला आहे. 

जिल्हा खतांच्या वापरात राज्यात आघाडीवर आहे. यंदा खरिपात युरियाची एक लाख ३४ हजार मेट्रिक टन, डीएपीची २० हजार, सुपर फॉस्फेटची ४५ हजार मेट्रिक टन, पोटॅशची ५५ हजार मेट्रिक टन आणि मिश्र खतांची एकूण ८६ हजार मेट्रिक टन एवढी मागणी कृषी विभागाने कृषी आयुक्तालयाकडे केली होती. जेवढी मागणी कृषी विभागाने खते मिळण्यासंबंधी आयुक्‍तालयाकडे केली मागणीनुसार पुरवठा लक्ष्यांक मंजूर झालेला नसला तरी जिल्ह्यास युरियाचा मंजूर लक्ष्यांकाच्या तुलनेत ३० टक्के पुरवठा झाला आहे.

मागील हंगामातील युरियाही शिल्लक असून, शिल्लक युरिया धरून सुमारे ६० टक्के पुरवठा युरियाचा झाला आहे. पोटॅश व फॉस्फेटचा पुरवठा मंजूर लक्ष्यांकाच्या तुलनेत २५ टक्के झाला आहे. दर महिन्याचा पुरवठा लक्ष्यांक कंपन्यांना दिला जात आहे. त्यानुसार पुरवठा सुरू असून, डीएपीचा मंजूर लक्ष्यांकाच्या तुलनेत ३५ टक्के पुरवठा झाल्याचा दावा करण्यात आला. जिल्ह्यात युरियाचा सुमारे ३० हजार मेट्रिक टन साठा आहे. तर मिश्र खतांचा एकूण सुमारे २५ हजार मेट्रिक टन साठा आहे, अशी माहिती मिळाली. 

काही कंपन्यांच्या डीएपी, पोटॅश व मिश्र खतांच्या दरात वाढ झाली आहे. किमान ५५  व कमाल १३० रुपये एवढी वाढ एका गोणीमागे झाली आहे. याचा फटका यंदा शेतकऱ्यांना बसणार आहे; परंतु दरवाढीने खतांचा वापर कमी होईल, असा दावा खतपुरवठादार व काही विक्रेत्यांनी केला आहे.  
खतांची मागणी एक दोन पाऊस झाल्यानंतर वाढेल. तसेच यंदा पूर्वहंगामी कापूस लागवड उशिराने होत असल्याने पूर्वहंगामी कापूस उत्पादकही जूनच्या मध्यानंतरच खतांची खरेदी करतील, असे संकेत मिळत आहेत. 

मंजूर मासिक पुरवठा लक्ष्यांकाच्या तुलनेत युरियाचा ३५ टक्के पुरवठा झाला आहे. टंचाई नाही. तसेच मागील हंगामातील युरिया व मिश्र खतांचा साठाही शिल्लक आहे. 
- मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी, 
जिल्हा परिषद, जळगाव

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात १८९ मंडळात जोरदार पाउस औरंगाबाद : मराठवाड्यातील 421 महसुल मंडळांपैकी तब्...
हिंगोली जिल्ह्यात सोळा मंडळात अतिवृष्टीहिंगोली : जिल्ह्यात मागील चोवीस तासांमध्ये दोन...
परभणीतील २४ मंडळात अतिवृष्टी नदी, नाले...परभणी : जिल्ह्यात बुधवार पासून पावसाचे...
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीनादेड : जिल्ह्यातील माहूर, किनवट, भोकर, हिमायतनगर...
कोयनेत पूरस्थिती शक्‍यपाटण, जि. सातारा : कोयना धरण पाणलोट...
कर्जमाफीसाठी मीपण आत्महत्या करू का ?सातारा - ‘‘सोसायटीचे एक लाख ३० हजार रुपयांचे...
यवतमाळ जिल्ह्यात पूर परिस्थिती यवतमाळ  : जिल्हयात सुरु असलेल्या संततधार...
राज्यात भेंडी ५०० ते ३००० रुपये...सांगलीत दहा किलोस २५० ते ३०० रुपये  सांगली...
राज्याचा पुरोगामित्वाचा वारसा जपूया :...मुंबई: शेती, पाणी, गुंतवणूक, गृहनिर्माण अशा विविध...
विदर्भात पावसाचे जोरदार कमबॅकनागपूर ः गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या...
शिराळ्यात नागप्रतिमेची पूजाशिराळा, जि. सांगली ः  अनेक वर्षे जिवंत...
अकोल्यात पावसाचे आगमनअकोला : या भागात गेल्या २० पेक्षा अधिक...
एकात्मिक कीड नियंत्रणात फेरोमोन...कामगंध सापळ्यांचा वापर केल्यास कमी खर्चात कीड...
उत्पादनवाढीसाठी एअरोसोल्सद्वारे...पृथ्वीच्या वातावरणामध्ये कृत्रिमरीत्या सल्फेट...
राजकीय सभ्यता व सुसंस्कृतपणा जपणारा एक...पुणे : राजकिय विरोध कितीही असला तरी राजकारणातील...
अटलजी : एका उत्तुंग नेतृत्वाचा अस्तभारताचे माजी पंतप्रधान, देशाचे लोकप्रिय नेते...
देशाने महान पुत्र गमावला : राहुल गांधी नवी दिल्ली : ''आज भारताने महान पुत्र गमावला...
वाजपेयींच्या निधनाने एका युगाचा अंत :...नवी दिल्ली : ''अटलजींच्या निधनाने एका युगाचा...
अजातशत्रू, मुरब्बी राजकारणी : अटल...शालीन, सभ्य राजकारणाने विरोधकांना जिंकणारे,...
...या आजारांनी वाजपेयींना ग्रासले होतेनवी दिल्लीः माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी...