agriculture news in marathi, Jalgaon districts 370 villages under 50 percent paisevari | Agrowon

जळगाव जिल्ह्यातील ३७० गावांची पैसेवारी ५० पैशांच्या खाली
टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

जळगाव : जिल्ह्यातील अमळनेर, मुक्ताईनगर आणि बोदवड या तालुक्‍यांमधील ३७० गावे ही दुष्काळी मदतीसाठी पात्र ठरणार असून, त्यांची पैसेवारी ५० पैशांच्या आत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. जिल्हा प्रशासनाने नुकतीच जिल्ह्यातील १५०२ गावे, पाडे आदींची सुधारित पैसेवारी जाहीर केली. प्रशासनाने जाहीर केलेल्या पैसेवारीनुसार जिल्ह्यातील एक हजार १३२ गावांची पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा अधिक आहे. 

जळगाव : जिल्ह्यातील अमळनेर, मुक्ताईनगर आणि बोदवड या तालुक्‍यांमधील ३७० गावे ही दुष्काळी मदतीसाठी पात्र ठरणार असून, त्यांची पैसेवारी ५० पैशांच्या आत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. जिल्हा प्रशासनाने नुकतीच जिल्ह्यातील १५०२ गावे, पाडे आदींची सुधारित पैसेवारी जाहीर केली. प्रशासनाने जाहीर केलेल्या पैसेवारीनुसार जिल्ह्यातील एक हजार १३२ गावांची पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा अधिक आहे. 

जिल्ह्यातील १५०२ गावांची पैसेवारी पावसाळा सुरू असताना म्हणजेच १५ सप्टेंबर रोजी प्रशासनाने जाहीर केली होती. त्यात एक हजार ४६७ गावांची पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा अधिक होती. तर केवळ ५० गावे ही ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारीच्या यादीत होती. यानंतर प्रशासनाने ऑक्‍टोबर अखेरीस सुधारित पैसेवारीची माहिती जारी केली आहे. अर्थातच सुधारित पैसेवारीमध्ये जिल्ह्यातील दुष्काळी छायेतील गावांची संख्या वाढली असून, ती तब्बल ३२० ने अधिक आहे. 

तीन तालुके पूर्णतः दुष्काळी
जिल्ह्यातील मुक्ताईनगर, बोदवड आणि अमळनेर हे तालुके पूर्णतः दुष्काळी दाखवले आहेत. त्यात अमळनेर तालुक्‍यातील १५४, मुक्ताईनगरमधील ८१ आणि बोदवड तालुक्‍यातील ५१ गावांमध्ये ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. 

५० पैशांपेक्षा अधिक पैसेवारीची गावे
जिल्ह्यातील ५० पैशांपेक्षा अधिक पैसेवारी असलेल्या गावांमध्ये जळगाव तालुक्‍यातील ९२, जामनेरातील १५२, भुसावळातील ५४, रावेरातील १२१, पाचोरामधील १२९, चोपडामधील ११७, भडगावमधील ६३, पारोळा तालुक्‍यातील ७९, यावलमधील ८१, चाळीसगाव तालुक्‍यातील ९० गावांचा समावेश आहे. 

सुधारित पैसेवारीवरही आक्षेप
जळगाव जिल्ह्यात पावसाळ्यात कुठल्याही तालुक्‍यात सरासरीएवढा पाऊस झाला नाही. फक्त तीनच तालुके दुष्काळी दाखविणे योग्य नाही. प्रशासनाने आकडेवारी सादर करून बनवाबनवी करू नये. यामुळे एका तालुक्‍याला न्याय व दुसऱ्यावर अन्याय होतो. खरीप तर गेलाच आता रब्बी हंगामाबाबतही जेमतेम, अशी स्थिती आहे. दुष्काळी गावांची संख्या अधिक आहे, असे शेतकरी संघटनेचे कडूअप्पा पाटील यांनी म्हटले आहे.

इतर ताज्या घडामोडी
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...