जळगाव जिल्ह्यातील ‘जलयुक्त’चा चौथा टप्पा मंजूर

जळगाव जिल्ह्यातील ‘जलयुक्त’चा चौथा टप्पा मंजूर
जळगाव जिल्ह्यातील ‘जलयुक्त’चा चौथा टप्पा मंजूर

जळगाव : जलयुक्त शिवार अभियानातील चौथ्या टप्प्यातील ४ हजार ७९६ कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी १२१ कोटी ४७ लाखांची तरतूद करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

कृषी विभाग, लघुसिंचन विभाग (जिल्हा परिषद), वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, ग्रामपंचायत विभाग, लघुसिंचन विभाग (जलसंधारण), वन विभागातर्फे ही कामे केली जाणार आहेत. यात कंपार्टमेंट बंडिंग, सीसीटी, विहीर पुनर्भरण, नवीन सिमेंट नालाबांध, नवीन माती नालाबांध, केटी वेअर दुरुस्ती, साठवण बंधारा, नाला खोलीकरण, विहीर पुनर्भरण, दगडी बांध, सलग समतल चर, घळी बंदिस्ती, अनगड दगडी बांध, वन बंधारा, गावतलाव दुरुस्ती आदी कामे करण्यात येणार आहेत. या कामांमुळे ३२ हजार ८९९ हेक्‍टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.

या अभियानात आतापर्यंत जिल्ह्यातील १५०४ गावांपैकी ८९३ गावांची निवड करण्यात आली. जामनेर तालुक्‍यातील सर्वाधिक १३४ गावांची निवड करण्यात आली आहे.

अभियानाचे चार टप्पे असे

  एक : २०१५-१६ मध्ये या अभियानात २३२ गावांची निवड झाली. त्यामध्ये विविध यंत्रणांमार्फत ७ हजार ३१६ कामे पूर्ण करण्यात आली. २३२ गावे शंभर टक्के जलयुक्त झाली. त्यामुळे जिल्ह्यात ३६ हजार ११८ टी.सी.एम. साठवण क्षमता निर्माण झाली होती.

दोन :२०१६-१७ मध्ये २२२ गावांची निवड झाली. त्यामध्ये ४ हजार ८५६ कामे प्रस्तावित होती. यापैकी ४ हजार ८४६ कामे झाली. १२४ कोटी ७६ लाख २३ हजार रुपये खर्च झाला. सर्व गावे शंभर टक्के जलयुक्त झाली.

तीन : २०१७-१८ मध्ये २०६ गावांची निवड झाली. विविध यंत्रणांमार्फत ४ हजार २७१ कामे प्रस्तावित केली आहेत. यापैकी १२०७ कामे पूर्ण, तर २३९४ कामे प्रगतिपथावर आहेत.

चार : २०१८-१९ मध्ये जिल्ह्यातील २३३ गावांची निवड करण्यात आली. त्यात ४ हजार ७९६ कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी १२१ कोटी ४७ लाखांची तरतूद आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com