जळगावात आले २५०० ते ६००० रुपये प्रतिक्विंटल

जळगावात आले २५०० ते ६००० रुपये प्रतिक्विंटल
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये प्रतिक्विंटल

जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता. १८) आल्याला किमान २५०० रुपये तर कमाल ६००० रुपये आणि सरासरी ३५०० रुपये दर प्रतिक्विंटलला मिळाला. तर २८ क्विंटल एवढी आवक झाली. आवक यावल, जामनेर, पाचोरा आदी भागांतून होत आहे.

बाजार समितीत हिरव्या मिरचीची २५ क्विंटल आवक झाली. मिरचीला ६०० ते १००० व सरासरी ७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. चवळी शेंगांची पाच क्विंटल आवक झाली. चवळीला प्रतिक्विंटल २००० ते ३००० व सरासरी २५०० रुपये दर होता. भेंडीची १४ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १००० ते २००० व सरासरी १५०० रुपये दर मिळाला. गंगाफळाची ३५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ५०० ते १००० व सरासरी ८०० रुपये दर मिळाला.

कोबीची २२ क्विंटल आवक झाली. तिला ८०० ते १५०० व सरासरी १००० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. कोथिंबिरीची १० क्विंटल आवक झाली. कोथिंबिरीला १००० ते २५०० व सरासरी १५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. लाल कांद्याची ८०० क्विंटल आवक झाली. कांद्याला प्रतिक्विंटल २५० ते ८०० व सरासरी ५५० रुपये दर मिळाला. बटाट्याची २५० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ९०० ते १५०० व सरासरी ११०० रुपये दर मिळाला. मेथी भाजीची चार क्विंटल आवक झाली. मेथीला प्रतिक्विंटल १२०० ते ३००० व सरासरी २००० रुपये दर मिळाला. कारल्यांची सात क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १५०० ते ३००० व सरासरी २००० रुपये दर मिळाला. फ्लॉवरची १५ क्विंटल आवक झाली. फ्लॉवरला प्रतिक्विंटल १००० ते २००० व सरासरी १५०० रुपये दर मिळाला. पालकची दोन क्विंटल आवक झाली.

पालकला प्रतिक्विंटल १४०० रुपये दर होता. पोकळ्याची पाच क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ५०० ते १२०० व सरासरी १००० रुपये दर मिळाला. वांग्यांची ३२ क्विंटल आवक झाली. वांग्यांना प्रतिक्विंटल ८०० ते २५०० व सरासरी १५०० रुपये दर होता. गिलक्‍याची १० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १००० ते २००० व सरासरी १५०० रुपये दर मिळाला. बीटची पाच क्विंटल आवक झाली. बीटला प्रतिक्विंटल १००० ते २००० व सरासरी १५०० रुपये दर होता. लिंबूची आठ क्विंटल आवक झाली. लिंबूला प्रतिक्विंटल ७०० ते २५०० व सरासरी १७०० रुपये दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com