agriculture news in marathi, jalgaon, maharashtra | Agrowon

केळीवरील करपा निर्मूलनासाठी अनुदान द्यावे
चंद्रकांत जाधव
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017
जळगाव : केळी पिकावर सातत्याने करप्याचा प्रादुर्भाव होतो. त्याच्या निर्मूलन, व्यवस्थापन व इतर कार्यवाहीसाठी जिल्हा परिषदेने अनुदान उपलब्ध करून द्यावे, असा ठराव जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत नुकताच करण्यात आला. 
 
जिल्हा परिषदेतील साने गुरुजी सभागृहामध्ये ही सभा झाली. अध्यक्षस्थानी उज्ज्वला पाटील होत्या. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सभापती रजनी चव्हाण, पोपट भोळे, दिलीप पाटील, सदस्य कैलास सरोदे, मधुकर पाटील, ज्योती पाटील, शशिकांत साळुंखे, सरोजिनी गरुड, मनोहर पाटील, प्रताप पाटील, नानाभाऊ महाजन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जळगाव : केळी पिकावर सातत्याने करप्याचा प्रादुर्भाव होतो. त्याच्या निर्मूलन, व्यवस्थापन व इतर कार्यवाहीसाठी जिल्हा परिषदेने अनुदान उपलब्ध करून द्यावे, असा ठराव जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत नुकताच करण्यात आला. 
 
जिल्हा परिषदेतील साने गुरुजी सभागृहामध्ये ही सभा झाली. अध्यक्षस्थानी उज्ज्वला पाटील होत्या. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सभापती रजनी चव्हाण, पोपट भोळे, दिलीप पाटील, सदस्य कैलास सरोदे, मधुकर पाटील, ज्योती पाटील, शशिकांत साळुंखे, सरोजिनी गरुड, मनोहर पाटील, प्रताप पाटील, नानाभाऊ महाजन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
जळगाव जिल्हा केळी पीक लागवडीत राज्यात अग्रेसर आहे. सर्वाधिक उत्पादन जळगाव जिल्ह्यात घेतले जाते. परंतु जिल्हा परिषद व इतर यंत्रणांच्या माध्यमांतून केळी पिकासाठी कुठलीही मदत, उपक्रम राबविले जात नाही. पूर्वी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करपा निर्मूलनासाठी निधी दिला जायचा. परंतु हा निधी देणे बंद झाले. हा निधी किंवा अनुदान नियमित केले जावे व जिल्हा परिषदेने करपा निर्मूलन कार्यक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असा ठराव या सभेत करण्यात आला. 

जिल्हा प्रशासन व इतर यंत्रणांसाठी ‘करपा’ दखलपात्र नाही का, असा प्रश्‍नही उपस्थित करण्यात आला. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन व इतर सदस्यांनी याबाबत विविध मुद्दे मांडले. हा ठराव करून तो जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषद प्रशासन व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला सादर करण्यात आल्याची माहिती मिळाली.

इतर ताज्या घडामोडी
पीक सल्ला१६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पेरणी लांबल्यास संकरीत...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...
सातारा जिल्ह्यातील पश्‍चिम भागात दमदार...सातारा : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील महाबळेश्वर,...
कोल्हापुरात पंधरा लाख लिटर दुधाचे संकलन...कोल्हापूर ः गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये...
बीड जिल्ह्यात दुधाचे संकलन ठप्पबीड : दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...