जळगाव बाजार समिती चार दिवसांपासून ठप्प

जळगाव बाजार समिती चार दिवसांपासून ठप्प
जळगाव बाजार समिती चार दिवसांपासून ठप्प

जळगाव  : सोशल मीडियासह इतर माध्यमांद्वारे सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी दरात मालाची खरेदी केल्यास दंड व शिक्षेची तरतूद असण्याचे वृत्त पसरल्याने शेतकरी संभ्रमात आहेत. त्यांनी आणलेला माल व्यापारी खरेदी करीत नसल्याने चार दिवसांपासून बाजार समितीत व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. या संदर्भात कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वत: तसे परिपत्रक नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल बाजार समितीत आणावा. तो खरेदी केला जाईल. या संदर्भात कोणतीही अडचण आल्यास सभापती अथवा बाजार समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मण पाटील यांनी केले आहे.

 ‘‘सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी दरात मालाची खरेदी केल्यास दंड व शिक्षेची तरतूद असण्याच्या वृत्ताने व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, असे कोणतेही परिपत्रक नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी माल बाजार समितीत आणावा. तो खरेदी केला जाईल, व्यापाऱ्यांनीही तो खरेदी करावा,’’ असे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मण पाटील यांनी सांगितले.

गावागावांत खरेदी केंद्र हवे

सरकारने जाहीर केलेल्या हमीभावाच्या तुलनेत बाजारातील भाव कमी असल्याने व्यापारी हमीभावात माल कसा खरेदी करणार, असा सवाल पाटील यांनी केला. एकीकडे सरकार हमीभाव जाहीर करते व त्यापेक्षा सरकार खरेदी करणाऱ्या मालाची कमी दराने निविदा काढते. यामुळे कोणता व्यापारी माल खरेदी करेल, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यासाठी सरकारने केवळ तालुक्‍याच्या ठिकाणी शासकीय खरेदी केंद्र न ठेवता प्रत्येक गावात खरेदी केंद्र सुरू करून हमीभावात माल खरेदी करावा अथवा मध्य प्रदेश सरकारप्रमाणे भावांतर योजनेअंतर्गत फरकाची रक्कम द्यावी, अशी मागणी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com