जालना, औरंगाबाद, बीड, उस्मानाबादेत पाऊस लांबल्याने जनावरे छावणीतच

जालना, औरंगाबाद, बीड, उस्मानाबादेत पाऊस लांबल्याने जनावरे छावणीतच
जालना, औरंगाबाद, बीड, उस्मानाबादेत पाऊस लांबल्याने जनावरे छावणीतच

औरंगाबाद  : मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील चारा छावण्यांत जनावरे, छावण्यांची संख्येत मागील दोन आठवडे घट झाली. आता ती किंचित थांबली आहे. अर्धा जून लोटूनही पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे जनावरे छावणीतच ठेवण्याचा निर्णय शेतकरी घेत असल्याची स्थिती आहे. 

प्राप्त माहितीनुसार, १० जूनपर्यंत औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांत ११४८ चारा छावण्यांना मंजुरी होती. त्यापैकी  प्रत्यक्षात ७४५ चारा छावण्या सुरू होत्या. त्यामध्ये मोठी ४ लाख ६१ हजार ५९४, तर लहान ४२ हजार १३० अशी एकूण ५ लाख ३ हजार ७२४ जनावरे त्यात आश्रयाला होती. १४ जूनअखेर चारा छावण्यांची संख्येत घटून ती ६९५ वर आली.

छावण्यांमधील जनावरांची संख्या ४ लाख ५३ हजार २६३ वर आली. जनावरांची संख्या ५१ हजार ४६१ ने कमी झाली. आता सोमवारअखेर (ता. १७) पुन्हा चारही जिल्ह्यांतील छावण्यांच्या संख्या जवळपास आठ ने कमी झाली आहे. परंतु १० व १४ जुनदरम्यानच्या तुलनेत घट होण्याचे प्रमाण अगदीच कमी झाले आहे. 

चारा छावण्या ६८७ वर 

चारही जिल्ह्यांतील चारा छावण्यांची संख्या ६८७ वर आली आहे. दुसरीकडे ४ लाख ५३ हजार २६३ जनावरे आता जवळपास दोन हजारांनी घटली आहेत. आती ती ४ लाख ५१ हजार ९१ वर आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. चार जिल्ह्यांत सोमवारअखेर ६८७ चारा छावण्या सुरू आहेत. तर, ४ लाख ५१ हजार ९१ जनावरे या छावण्यांमध्ये असल्याची माहिती सूत्रांनी दिली. औरंगाबाद जिल्ह्यात १५ हजार ७०९, जालना जिल्ह्यात १६ हजार ४५, बीड जिल्ह्यात ३ लाख ४७ हजार ४१, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील चारा छावण्यांमधील जनावरांची संख्या ७२ हजार २९६ वर पोचली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com