agriculture news in marathi, jalyukt shivar scheme, jalgaon, maharashtra | Agrowon

जळगावमधील २०६ गावांत होणार जलसंधारणाची कामे
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017
जळगाव : जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानातील सर्व कामांचे एकूण बजेट १३५ कोटी आहे. २०६ गावांमध्ये यातून जलसंधारणासह इतर कामे हाती घेण्यात आली असून, जिल्ह्यात या अभियानाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. 
 
जळगाव : जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानातील सर्व कामांचे एकूण बजेट १३५ कोटी आहे. २०६ गावांमध्ये यातून जलसंधारणासह इतर कामे हाती घेण्यात आली असून, जिल्ह्यात या अभियानाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. 
 
या अभियानातून जिल्हा परिषद, कृषी विभाग, लघुसिंचन विभागातर्फे (जलसंधारण) कंपार्टमेंट बंडींग, सीसीटी लूज बोल्डर स्ट्रक्‍चर, गॅबीयन स्ट्रक्‍चर, सिमेंट नाला बांध, नाला खोलीकरण, नवीन सिमेंट नाला बांध, माती नाला बांध निर्मिती व दुरुस्ती, केटी वेअर बंधारे दुरुस्ती, पाझर तलाव, गाव तलाव दुरुस्ती, गाळ काठणे, विहीर पुनर्भरण, सलग समतल चर, दगडी बांध, वनबंधारा, जलशोष खड्डे आदी कामे घेतली जातील. 

कृषी विभागातर्फे ५८ कोटी ९४ लाख ५५ हजार रुपयांची ३३०७ कामे, जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागातर्फे ४९ कोटी ६८ लाख ३५ हजार रुपयांची ६१५ कामे, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेतर्फे एक कोटी आठ लाख रुपयांची १८४ कामे, जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातर्फे तीन कोटी ६६ लाख ३५ हजार रुपयांची १७७१ कामे, लघुसिंचन (जलसंधारण) विभागातर्फे चार कोटी सहा लाख ७६ हजार रुपयांची ५९ कामे, वनविभागातर्फे १७ कोटी ६४ लाख ४६ हजार रुपयांची ४२२ कामे अशी एकूण १३५ कोटी आठ लाख ४७ हजार रुपयांची सहा हजार ३५८ कामे घेतली जातील. 

जलयुक्त शिवार अभियानातून कामांसंबंधी गावांची निवड केली आहे. त्यात सर्वाधिक ३० गावे मुक्ताईनगर व बोदवड तालुक्‍यातील आहेत. यापाठोपाठ जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघातील २६ गावे आहेत. जळगाव तालुक्‍यातील १२, भुसावळातील १४, रावेरातील सात, यावलमधील सात, अमळनेरातील १६, धरणगावमधील ११, पारोळातील १४, एरंडोलमधील १०, चोपडामधील १०, पाचोरामधील १६, भडगावमधील १२, चाळीसगावमधील २१ गावांची निवड या अभियानासाठी केली आहे. 

जलयुक्त शिवार अभियानासंबंधीच्या आराखड्याला जिल्हा प्रशासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. हा या अभियानाचा तिसरा टप्पा आहे. यासंबंधीच्या बैठकीत जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर, उपवनसंरक्षक एम.आदर्शकुमार रेड्डी, संजय दहिवले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते. मार्चअखेर ही कामे पूर्ण करायची असून, त्या दृष्टीने अनेक ठिकाणी कामे सुरू झाली आहेत.

इतर ताज्या घडामोडी
जात पडताळणीसाठी रक्त नात्यातील दाखला...नागपूर : रक्त नात्यातील व्यक्तीची जात पडताळणी...
कोंबडीखताचा वापर कसा करावा?मशागतीच्या वेळी पेरणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर...
ऊस पाचटाचे गांडूळ खत कसे तयार करावे?गांडूळ खताच्या निर्मितीसाठी उत्तम निचरा होणारी...
कृषी सल्ला : कापूस, भुईमूग, बाजरी, मका... कापूस बीटी कापूस बोंड अळ्यांना प्रतिकारक्षम...
मका, सोयाबीन, हळदीच्या भावात घसरणएनसीडीईएक्समध्ये या सप्ताहात साखर व सोयाबीन वगळता...
अभिनव पद्धतीने सणसरला आंदोलनभवानीनगर, जि. पुणे   ः सणसर येथील कुरवली...
मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध :...नागपूर : मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत...
पुणे जिल्ह्यातील काही भागांत पावसाची...पुणे  ः जिल्ह्यातील अनेक भागांत गेल्या दहा...
खारपाणपट्ट्यात भूसुधारणा कार्यक्रम...अकोला  : जिल्ह्यात खारपाणपट्ट्याचे प्रमाण...
...तर जिनिंग मिल मालकांविरोधात कारवाई ः...वर्धा   ः गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर कायमनगर  : अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
स्वाभिमानीचा सर्जिकल स्ट्राईक,...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून...
सातारा जिल्ह्यात दूध दरप्रश्नी तिसऱ्या...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...
संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखीचे सोलापूर...सोलापूर : पिटू भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा...
कोयना, कण्हेर धरणांतून विसर्गसातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी...
कर्नाटकातून येणारे दूध आंदोलकांनी अडवलेसोलापूर :  दुधाच्या वाढीव दरासाठी स्वाभिमानी...
किणी टोल नाका येथे पोलिसांची जबरदस्ती;...कोल्हापूर- : स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने पुणे...
कनिष्ठ सहायकाची एक वेतनवाढ बंदनाशिक  : जिल्हा परिषदेची सभा असो की मुख्य...
भेंडीची वेळेवर लागवड आवश्यकभाजीपाला पिकांमध्ये भेंडी पिकाची लागवड वाढत आहे....
दूध दरप्रश्‍नी राज्य सरकार दोषी : राज...पुणे  ः दूधदराचा प्रश्न गंभीर होत आहे....