agriculture news in marathi, jalyukt shivar scheme status, pune, maharashtra | Agrowon

पुणे विभागात ‘जलयुक्त’ची आठ हजारांवर कामे पूर्ण 
टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 मे 2019

जलयुक्त शिवार अभियानासाठी पुणे विभागात निवडलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कामे पूर्ण झाली आहेत. प्रगतिपथावरील कामांनाही निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे लवकरच ही कामे पूर्ण होतील. विभागातील एकूण प्रस्तावित कामांपैकी ७६.३० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. पूर्ण झालेल्या कामांमुळे २६,८१४ टीसीएम पाणीसाठा क्षमता निर्माण झाली आहे. 
- विनयकुमार आवटे, अधीक्षक कृषी अधिकारी, विभागीय आयुक्तालय, पुणे.
 

पुणे : भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने राज्य शासनामार्फत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत पुणे विभागात १० मेअखेरपर्यंत निवडलेल्या ६०२ गावांमध्ये आठ हजार ४४६ कामे पूर्ण झाली. या गावात प्रकल्प आराखड्यानुसार ७६.३० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. अजूनही ‘जलयुक्त’ची कामे सुरू असून झालेल्या कामांमुळे पावसाळ्यात सुमारे २६ हजार ८१४ टीसीएम पाणीसाठा निर्माण होईल, असा अंदाज पुणे विभागीय कार्यालयाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे. 

पुणे विभागास २०१८-१९ मध्ये जलयुक्त शिवार अभियानातंर्गत कामांसाठी शासनाकडून १० मे २०१९ च्या शासन निर्णयान्वये ३३.७१ कोटी रुपये वितरित झाले आहेत. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी विभागातील ६०२ गावांची निवड करण्यात आली होती. निवड केलेल्या गावांचा गाव आराखडा तयार करून त्याला जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर प्रत्यक्षात कामास सुरवात झाली होती. निवडलेल्या गावातील प्रस्तावित ११,०६९ कामांपैकी सध्या आठ हजार ४४६ कामे पूर्ण झाली आहेत. एक हजार ८२५ कामे प्रगतिपथावर आहेत. त्यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे कामे जलदगतीने पूर्ण होण्यास मदत होईल.

दरवर्षी या योजनेतून सिमेंट साखळी नाला बांध बांधणे, जुने अस्तित्वातील सिंमेट नालाबांध, कोल्हापूरपद्धतीच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती व नूतनीकरण करणे, जलस्रोतांमधील गाळ काढणे, जलस्रोतांचे बळकटीकरण करणे, विहीर पुर्नभरण, ओढे, नाल्याचे खोलीकरण व रूंदीकरण करणे आदी हाती घेण्यात आली आहेत. प्रकल्प आराखड्यानुसार ५० टक्क्यांपेक्षा जास्त कामे पूर्ण झालेल्या गावांची संख्या अधिक आहे. 
 

जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत पुणे विभागातील कामांची स्थिती ः
जिल्हा  गावांची संख्या  पूर्ण झालेली कामे  होणारा पाणीसाठा (टीसीएममध्ये) 
पुणे २१३ २७६५  ८२८८
सातारा  ९१ ६८५  २१२६ 
सांगली १०३ २५६३  ६७८३
सोलापूर   १२३ २०२५ ८१४१ 
कोल्हापूर ७२ ४०८   १४७७

 

इतर ताज्या घडामोडी
फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १०...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
नाचणी प्राक्रियेत संधीनाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत...
बीबीएफ तंत्रज्ञानानेच पेरणी, विश्वी...बुलडाणा ः येत्या हंगामात बीबीएफ तंत्रज्ञानाने...
सांगली जिल्ह्यात १८३ गावांना टँकरने...सांगली : जून महिना सुरू होऊन दुसरा आठवडा संपला...
जळगाव जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे...जळगाव  ः खानदेशात सिंचन प्रकल्पांमध्ये मिळून...
आषाढी वारीत शासकीय महापूजेचा वेळ...सोलापूर : आषाढी एकादशी दिवशीची श्री विठ्ठल-रुक्‍...
जळगाव बाजार समितीत व्यापारी संकुलावरून...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
वऱ्हाडात महाबीज बियाणे मिळण्यापूर्वी...अकोला ः राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहीम व ग्राम...
सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयात...सातारा  : टेंभू उपसा सिंचन योजनेतून खटाव...
मंगळवेढा बाजार समितीत वांग्याला राज्यात...मंगळवेढा जि. सोलापूर : मंगळवेढा येथील कृषी...
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ९८...
पाऊस लांबल्याने आता कोणते पीक घ्यावे?...नगर : मॉन्सून लांबल्याने आता खरीप पिकांत बदल...