agriculture news in marathi, jalyukt shivar scheme status, pune, maharashtra | Agrowon

`जलयुक्त`साठी पुणे जिल्ह्यातील 221 गावांची निवड
टीम अॅग्रोवन
बुधवार, 18 एप्रिल 2018
पुणे  ः पाणीटंचाई कमी करण्यासाठी राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत २०१८-१९ साठी जिल्ह्यातील २२१ गावांची निवड करण्यात आली आहे. निवड केलेल्या गावांमध्ये ‘जलयुक्त’अंतर्गत जलसंधारणाची कामे करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ही गावे ‘जलयुक्त’ होऊन भूजल पातळीत वाढ होणार आहे. 
 
मागील पाच ते सहा वर्षांपासून असलेल्या दुष्काळामुळे पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. ही समस्या कमी करण्यासाठी राज्य सरकाराने जलयुक्त शिवार अभियान २०१५-१६ पासून राबविण्यास सुरवात केली.
 
पुणे  ः पाणीटंचाई कमी करण्यासाठी राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत २०१८-१९ साठी जिल्ह्यातील २२१ गावांची निवड करण्यात आली आहे. निवड केलेल्या गावांमध्ये ‘जलयुक्त’अंतर्गत जलसंधारणाची कामे करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ही गावे ‘जलयुक्त’ होऊन भूजल पातळीत वाढ होणार आहे. 
 
मागील पाच ते सहा वर्षांपासून असलेल्या दुष्काळामुळे पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. ही समस्या कमी करण्यासाठी राज्य सरकाराने जलयुक्त शिवार अभियान २०१५-१६ पासून राबविण्यास सुरवात केली.
 
त्यासाठी जिल्ह्यातील १८९१ पैकी २०० गावांची निवड पहिल्या वर्षी करण्यात आली होती. दुसऱ्या वर्षी १९० तर तिसऱ्या वर्षी १९० गावांची निवड करण्यात आली होती. यंदाही २२१ गावांची निवड करण्यात आली आहे. निवडलेल्या गावांमध्ये जलयुक्त अभियानाअंतर्गत ओढे खोलीकरण, सरळीकरण, गाळ काढणे, सिंमेट बंधारे बांधणे, नाला बंडिग, समतल चर खोदणे अशी विविध कामे करण्यात येत आहेत. 
 
२०१६-१७ या आर्थिक वर्षात प्रस्तावित केलेल्या आराखड्यापैकी ७१४५ कामांपैकी सात हजार ५८ कामे पूर्ण झाली. २०१७-१८ मध्ये प्रस्तावित केलेल्या चार हजार ७७६ कामांपैकी २२६५ कामे पूर्ण केली. लोकसहभागातून एक हजार ७३४ कामे पूर्ण झाली आहेत. ‘सीएसआर’मधून ३८३ कामे पूर्ण झाली आहेत. त्याचा फायदा पाणी साठवणुकीसाठी झाला असल्याचे दिसून येतो. 
 
त्यामुळे यंदाही जलयुक्त अभियानाअंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे हाती घेण्यात येण्यात येणार आहे. एक हजार ९० गावांमध्ये ‘जलयुक्त’ची कामे होणे बाकी आहे. येत्या काही वर्षांत या गावांमध्येही कामे हाती घेतली जाणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले. 
 
तालुकानिहाय निवडलेली गावांची संख्या
तालुका निवडलेली गावे
भोर २३ 
वेल्हा २०
मुळशी १५
मावळ २० 
हवेली १५
खेड २२
आंबेगाव २०
जुन्नर ३१ 
शिरूर
पुरंदर २८ 
बारामती ८ 
इंदापूर ११

 

इतर ताज्या घडामोडी
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...
पाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...
शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...
हुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा  ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...