agriculture news in marathi, jalyukt shivar scheme status, sangli, maharashtra | Agrowon

सांगलीतील दहा हजार गावांमध्ये ‘जलयुक्त शिवार’ची कामे पूर्ण
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 9 मार्च 2018
सांगली  ः जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेतून कामे झाल्याने दुष्काळी भागातील शेतीला फायदा झाला आहे. यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. जिल्ह्यात तीन वर्षांत १० हजार ८८ गावांमध्ये या योजनेतून कामे पूर्ण झाली आहेत. २०१८-१९ या वर्षाकरिता जलयुक्त शिवार योजनेसाठी नवीन गावांची निवड करण्यास प्रारंभ केला असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 
 
सांगली  ः जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेतून कामे झाल्याने दुष्काळी भागातील शेतीला फायदा झाला आहे. यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. जिल्ह्यात तीन वर्षांत १० हजार ८८ गावांमध्ये या योजनेतून कामे पूर्ण झाली आहेत. २०१८-१९ या वर्षाकरिता जलयुक्त शिवार योजनेसाठी नवीन गावांची निवड करण्यास प्रारंभ केला असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 
 
जलयुक्त शिवार योजना जिल्ह्यात गावोगावी पोचली आहे. या योजनेसाठी शेतकरीही पुढाकार घेत आहेत. गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यातील ४२१ गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली होती. यामधील एकूण १० हजार ६४० कामांपैकी १० हजार ८८ कामे पूर्ण झाली आहेत. ५५२ कामे सुरू आहेत. ती मार्चअखेरपर्यंत पूर्ण करायची असल्याने शासकीय पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. 
 
जलयुक्त शिवार योजना राबविण्याठी महसूल, कृषी विभाग, जिल्हा परिषदेचा लघू पाटबंधारे विभाग, वन विभाग, पाटबंधारे विभाग यांसह संस्था पुढाकार घेत आहेत. जिल्ह्यात ही योजना सुरू झाल्यापासून २०१५-१६ मध्ये ५१० मिमी पावसाची नोंद झाली, त्यातून या कामांत ५०,१२५ टीसीएम पाणीसाठा झाला. त्यापैकी २५,०७६ टीसीएम पाण्याचा वापर शेतीसाठी करता आला आहे. 
 
चालू वर्षी भूजल सर्वेक्षणाच्या अहवालानुसार ०.६४ मीटरने पाणीपातळी वाढली आहे. जलयुक्त शिवार योजनेचे अंतिम ध्येय संरक्षित सिंचन क्षेत्र वाढविणे आहे. या दोन वर्षांतील सिंचन क्षेत्रातील वाढ पाहता पहिल्या वर्षांत २५ हजार ०७६ हेक्‍टर तर दुसऱ्या वर्षात १४ हजार २९१ हेक्‍टर इतके क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. २०१७-१८ या वर्षात झालेल्या कामातून किती क्षेत्र सिंचनाखाली आले आहे, हे मार्च अखेरीस स्पष्ट होईल. 
 
२०१८-१९ या शेवटच्या वर्षासाठी जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेसाठी गाव निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्या गावांचा पूर्वी जलयुक्त शिवार योजनेत समावेश नव्हता, अशा गावांचा समावेश होणार आहे. 

इतर ताज्या घडामोडी
मत्स्यपालनामध्ये योग्य तांत्रिक बदलांची...सध्याच्या मत्स्यपालन पद्धतीमध्ये कोणतेही बदल न...
जळगाव बुरशीयुक्त शेवयांच्या प्रकरणात...जळगाव ः शालेय पोषण आहार वाटपानंतर अंगणवाडीमधील...
सातगाव पठार परिसरात बटाटा लागवडीस सुरवातसातगाव पठार, जि. पुणे : काही गावांमध्ये पावसाने...
सोलापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह...सांगोला/करमाळा : जिल्ह्याच्या काही भागांत...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात...पुणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी...
मातीचा प्रत्येक कण सोन्यासारखा; तो वाया...नाशिक : शेतातील माती म्हणजे कोट्यवधी सूक्ष्म...
नांदेड जिल्ह्यात १ लाख ६५ हेक्टरवर पेरणीनांदेड ः नांदेड जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीप...
शेतकऱ्यांना पीककर्ज देणे टाळले तर ठेवी...नगर  ः शेतकऱ्यांना सध्या खरीप हंगामासाठी...
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायमसातारा  ः जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, माण,...
नांदेड जिल्ह्यात फक्त ८.२९ टक्के...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील यंदा खरीप पीककर्ज...
तापीच्या पाण्यास गुजरातचा नकारमुंबई  ः पार-तापी नर्मदा नद्याजोड...
कापूस पीक नियोजनातून हमखास उत्पादन वाढसोनगीर, जि. धुळे ः कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी...
औरंगाबाद जिल्ह्यात अखेर पाऊस बरसलाऔरंगाबाद  : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या...
`दमणगंगा नदीजोड योजनेचे फेरसर्व्हेक्षण...नाशिक : दमणगंगा (एकदरे) नदीजोड योजनेचे...
मराठवाड्यात साडेतीन लाख हेक्‍टरवर पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ३ लाख ६७...
पीककर्जासाठी बँक अधिकाऱ्याने केली...दाताळा, जि. बुलडाणा : पीककर्ज मंजूर करून...
माॅन्सून सक्रिय, सर्वत्र चांगल्या...महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी झालेले असून १००४...
‘एसआरआय’पद्धतीने भात लागवडीचे तंत्रएसआरआय पद्धतीने भात लागवड केल्यामुळे रोपे, माती,...
भूमिगत निचरा प्रणालीद्वारे जमिनींची...पाणी व रासायनिक खते यांच्या अनियंत्रित वापरामुळे...
लागवड सावा पिकाची...जून महिन्यात सावा पिकाची पेरणी करावी. दोन ओळीतील...