agriculture news in marathi, jalyukt shivar,akola, maharashtra | Agrowon

‘जलयुक्त शिवार’च्या कामांमध्ये चालढकल नको : शिंदे
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017
अकाेला  ः राज्यात राबविल्या जात असलेल्या महत्त्‍वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामात चालढकल करू नका, अशा सूचना जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी येथे झालेल्या विभागीय बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या. 
 
अकाेला  ः राज्यात राबविल्या जात असलेल्या महत्त्‍वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामात चालढकल करू नका, अशा सूचना जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी येथे झालेल्या विभागीय बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या. 
 
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात बुधवारी (ता.८) अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांची अाढावा बैठक श्री.शिंदे यांच्या प्रमुख्य उपस्थितीत झाली. यावेळी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई वाघोदे, उमाताई तायडे (बुलडाणा), मृद व जलसंधारण खात्याचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय अायुक्त पीयूष सिंग, जिल्हाधिकारी अास्तिककुमार पांडेय यांच्यासह अकोला, बुलडाणा, वाशीम, अमरावती अाणि यवतमाळ या पाच जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते. ‘जलयुक्त’च्या कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना श्री. शिंदे यांनी दम भरला. तसेच अशा अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
 
या बैठकीत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१५-१६ अाणि २०१६-१७ या वर्षातील कामाच्या प्रगतीचा तसेच २०१७-१८ या वर्षातील कामे व नियोजनाचा सविस्तर अाढावा त्यांनी घेतला. यावेळी अकोल्याचे अामदार रणधीर सावरकर यांनी कृषी व जिल्हा परिषद यंत्रणेकडून जलयुक्त शिवार याेजनेच्या कामात माेठ्या प्रमाणात चालढकल करण्यात येत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. ई-क्लासमध्ये १०० बाय १०० मीटरचे शेततळे, मागेल त्याला शेततळे, नाला सरळीकरण अादी प्रश्नावर त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
 
यावेळी अामदार हरिष पिंपळे यांनी मूर्तिजापूर मतदार संघातील ‘जलयुक्त’ची मंजूर व प्रस्तावित कामे तातडीने करण्याची मागणी केली. अामदार अमित झनक यांनी वाशीम जिल्ह्यातील जलयुक्तच्या कामात प्रशासकीय यंत्रणेकडून हाेणाऱ्या दिरंगाईचा मुद्दा उपस्थित केला. याेजनेंतर्गत लाखाे रुपये खर्च करूनही केटीवेअरमध्ये पाणी अडविले जात नसल्याचे त्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनात अाणून दिले.
 
त्यावर मंत्री शिंदे यांनी संबंधित कार्यकारी अभियंता, उपअभियंत्यांना शासन परिपत्रक वाचले काय? त्यानुसार काय काम केले? असा जाब विचारला. मात्र, त्यावर अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तर देता अाले नसल्याने त्यांची विभागीय चाैकशी सुरू करून प्रशासकीय कारवाई करण्याचे अादेशही दिले. 

इतर ताज्या घडामोडी
बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’ बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’...
प्रथिनांद्वारे मिळवता येईल अधिक टिकाऊ...निसर्गातील कोळ्याच्या धाग्यापासून प्रेरणा घेत चीन...
ऊसतोडणी कामगारांच्या गावांत दुष्काळी...नगर ः जनावरे जगवण्यासाठी आणि रोजगाराच्या शोधात...
नामपूरात शेतमालाला दर, कर्जमाफीसाठी...नामपूर, जि. नाशिक : कांदा पिकासह शेतमालाचे...
वजनकाट्यात घोळ करणाऱ्यांनी लाज बाळगावीमाळेगाव, जि. पुणे ः ‘माळेगाव साखर कारखान्याचे...
कोल्हापूर जिल्ह्यास ३०० एकर तुती...कोल्हापूर : महारेशीम अभियानांतर्गत कोल्हापूर...
हमीभावाने साडेदहा हजार क्विंटल शेतीमाल...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
पुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिर;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
केळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...
करडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...
रताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...
औरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...
मराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...
तुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...
टँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...
दिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...
सातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...
नाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...
कर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...