agriculture news in marathi, Jalyukta permission date extended till June | Agrowon

जलयुक्त शिवार कामांच्या मंजुरीसाठी जूनपर्यंत मुदतवाढ : जलसंधारणमंत्री
टीम अॅग्रोवन
सोमवार, 14 मे 2018

पुणे : जलयुक्त शिवार अभियानासाठी २०१७-१८ मध्ये देण्यात आलेल्या निधीतून मार्चपूर्वी कामे पूर्ण करायची होती. मंजुरी अभावी शिल्लक राहिलेल्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामांना मुदतवाढ दिली आहे. जूनअखेरपर्यंत या कामांना मंजुरी द्यावी, असे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती राज्याचे मृदा व जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी दिली. 

पुणे : जलयुक्त शिवार अभियानासाठी २०१७-१८ मध्ये देण्यात आलेल्या निधीतून मार्चपूर्वी कामे पूर्ण करायची होती. मंजुरी अभावी शिल्लक राहिलेल्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामांना मुदतवाढ दिली आहे. जूनअखेरपर्यंत या कामांना मंजुरी द्यावी, असे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती राज्याचे मृदा व जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी दिली. 

रविवारी (ता. १३) पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री शिंदे म्हणाले, ‘‘जलयुक्त शिवार अभियानासाठी विशेष निधीची तरतूद केली आहे. अातापर्यंत १२ हजार गावे जलपरिपूर्ण झाली आहेत. ४ लाख २५ हजारांपेक्षा अधिक कामे मार्च महिन्यापूर्वी पूर्ण झाली आहेत. त्यात आणखी वाढ होणार आहे. २०१७-१८ ची कामे मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना होत्या. मात्र या कामांना मुदतवाढ देण्यात आली असून, जून अखेरपर्यंत ही कामे पूर्ण करावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.’’मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांसाठी पाणीटंचाईमुक्त गावे करण्यासाठी २५ हजार गावांपर्यंत जलयुक्त शिवार अभियान नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. २०१८-१९ वर्षांसाठी १ हजार कोटी वितरीत केले आहेत. नवीन मंजुरी देऊन, कामे तत्काळ सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. गतवर्षीच्या निधीतील कामे जून अखेरपर्यंत पूर्ण होतील तसेच चालू वर्षाच्या निधीतनूही बरीचशी कामे मार्गी लागतील, असेही शिंदे यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...