agriculture news in marathi, jamner taluka faces hailstrom in khandesh | Agrowon

खान्देशात गारपिटीने जामनेर तालुक्यात नुकसान
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

जळगाव : खानदेशात रविवारी (ता. ११) तापीकाठावरील काही गावांमध्ये एक ते दीड मिनीट हरभऱ्याच्या आकाराच्या गारपिटीसह पावसाचा शिडकावा झाला. कुठेही गारपिटीने मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. परंतु मळणीवरील हरभरा, दादर यांचे ढीग ताडपत्रीने झाकून ठेवावे लागले. तर कापणीवर आलेल्या केळीची तातडीने मिळेल त्या दरात कापणी करून घेण्याची वेळ केळी उत्पादकांवर आली. 

जळगाव : खानदेशात रविवारी (ता. ११) तापीकाठावरील काही गावांमध्ये एक ते दीड मिनीट हरभऱ्याच्या आकाराच्या गारपिटीसह पावसाचा शिडकावा झाला. कुठेही गारपिटीने मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. परंतु मळणीवरील हरभरा, दादर यांचे ढीग ताडपत्रीने झाकून ठेवावे लागले. तर कापणीवर आलेल्या केळीची तातडीने मिळेल त्या दरात कापणी करून घेण्याची वेळ केळी उत्पादकांवर आली. 

रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. तर दुपारी १२.४५ च्या सुमारास तापीकाठावरील चोपडा, जळगाव, अमळनेर, यावल आदी भागांत एक ते दीड मिनीट पावसाचा हलका शिडकावा झाला. सोबतच बारीक गाराही पडल्या. यामुळे केळीसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले नाही, परंतु शेतकऱ्यांची धावपळ उडाली. शेतात पडलेले दादरची कणसे, हरभरा यांचे ढीग लागलीच ताडपत्री व प्लॅस्टिकच्या पेपरने झाकून ठेवावे लागले. तसेच सिंचनाची कामेही काही ठिकाणी थांबविण्यात आली. 
पाऊस आला किंवा गारपीट झाली तर मोठे नुकसान होईल, या भीतीने यावल, जळगाव, चोपडा भागात जुनारी व आगाप नवती केळी बागांमध्ये केळीची कापणी रविवारी दुपारनंतर सुरू झाली. तर सोमवारी सकाळीही कापणी हाती घेण्यात आल्याचे चित्र दिसून आले. जिल्ह्यात अमळनेर, चाळीसगाव, पाचोरा, पारोळा, मुक्ताईनगर, रावेर भागांतही अर्धा ते एक मिनिटच पाऊस झाला. काही भागांत ऊन सावल्यांचा खेळ सुरू होता. शेतकरी शेतातच कामे आवरत होते. 

जामनेरात नुकसान
जामनेर तालुक्‍यातील फत्तेपूर, तोंडापूर, भारूडखेडा, वडाळी, मांडवे, वाकोद आदी भागांत बोरांच्या आकाराचा गारा पडला. तसेच पाऊसही अधिकचा झाला. १० ते १५ मिनिटे या भागात पाऊस झाला. तर गाराही एक ते दीड मिनीट पडल्या. त्यात गहू, कांदा, हरभरा व इतर फळ पिकांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली. सोमवारी (ता. १२)देखील ढगाळ व आर्द्रतायुक्त वातावरण कायम होते. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. 

सकाळी ऊन पडले होते. दुपारी ऊन-सावल्यांचा खेळ सुरू झाला. तर पूर्वेकडून पश्‍चिमेकडे वारे वाहत होते. धुळे जिल्ह्यातील शिरपूर भागातही तरडी बभळाज, थाळनेर भागात अर्धा मिनीट बारीक गारांचा पाऊस झाला. शिंदखेडा, साक्री, धुळे भागांत मात्र ढगाळ वातावरण होते. अशीच स्थिती नंदुरबार जिल्ह्यातही होती. तेथेही रविवारी गारांसह पावसामुळे मोठे नुकसान झालेले नसल्याची माहिती मिळाली. 

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...