agriculture news in marathi, jat taluka in 7 dam dry | Agrowon

जत तालुक्‍यातील सात तलाव कोरडे
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

सांगली ः जत तालुक्‍यात यावर्षी पुरेसा पाऊस झालेला नाही. परिणामी ऐन पावसाळ्यातही पिण्याच्या व शेतीसाठीच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली. तालुक्‍यातील २८ पैकी सात तलावांतील पाणीसाठा पूर्ण संपला आहे. दोन मध्यम प्रकल्पासह १४ तलावांतील पाणीसाठा मृतसंचयाखाली आहे. सनमडी वगळता बिरनाळसह सहा तलावात सोडण्यात आलेल्या म्हैसाळच्या पाण्यामुळे सध्या पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, हा पाणीसाठा केवळ पंधरा दिवसांत संपण्याची शक्‍यता आहे.

सांगली ः जत तालुक्‍यात यावर्षी पुरेसा पाऊस झालेला नाही. परिणामी ऐन पावसाळ्यातही पिण्याच्या व शेतीसाठीच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली. तालुक्‍यातील २८ पैकी सात तलावांतील पाणीसाठा पूर्ण संपला आहे. दोन मध्यम प्रकल्पासह १४ तलावांतील पाणीसाठा मृतसंचयाखाली आहे. सनमडी वगळता बिरनाळसह सहा तलावात सोडण्यात आलेल्या म्हैसाळच्या पाण्यामुळे सध्या पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, हा पाणीसाठा केवळ पंधरा दिवसांत संपण्याची शक्‍यता आहे.

रोहिणी, मृग नक्षत्रात पावसाने पाठ फिरवली. जत तालुक्‍यातील बळीराजा संकटाशी सामना करीत आहे. गेल्या अडीच महिन्यांत तालुक्‍यात अत्यल्प पाऊस झाला आहे. तालुक्‍याची पावसाची वार्षिक सरासरी ४५७.७ मि.मी आहे. आजअखेर १६४. १३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मे मध्ये २.५०, जूनमध्ये ८२.६३ आणि जुलैमध्ये १२.१३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

सात तलाव पूर्ण कोरडे
संख व दोड्डनाला या दोन मध्यम प्रकल्पासह २९ तलाव आहेत. त्यापैकी सोरडी, सिद्धनाथ, तिकोंडी- १, तिकोंडी २, पांडोझरी, बेळुंखी व खोजनवाडी अशा सात तलावांतील पाणीसाठा संपला आहे. या तलावात पाण्याचा एकही थेंब शिल्लक नाही.

१४ तलाव मृतसंचयाखाली
सात तलावांतील पाणी संपलेले आहे. संख व दोड्डानाला मध्यम प्रकल्पासह तालुक्‍यांतील १४ तलावांतील पाणीसाठाही मृतसंचयाखाली गेला आहे. या तलावातील पाणी पिण्यायोग्य नाही. तलावांतील सध्याचा पाणीसाठा (दशलक्ष घनफूट) संख मध्यम प्रकल्प (४.३९), दोड्डनाला मध्यम प्रकल्प (२४.८८), सोरडी ( ९.००), भिवर्गी ( ४.००), दरीबडची (१०.००), अंकलगी (०.८७),  शेगाव क्रमांक- २ (२.९१), वाळेखिंडी (३६.०१), गुगवाड (०.५२), येळवी (११.१४), मिरवाड (३.१७), डफळापूर (३.२२), बिळूर के (०.६८), उमराणी (१.०९).

जत तालुक्‍यातील तलाव भरून द्यावेत
एकीकडे जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नद्या भरून वाहात आहेत. त्याचवेळी जतसह पूर्वभागाला दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू करून जत तालुक्‍यातील तलाव पाण्याने भरून द्यावेत, अशी मागणी होऊ लागली आहे. मात्र, जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.

खरीप हंगाम पूर्ण वाया
पावसाळ्याच्या सुरवातीलाच शेतकऱ्यांना पुरेशा पावसाची आशा होती. गेल्या तीन महिन्यांत बहुतांश काळ उघडीपच आहे. खरीप वाया गेला आहे. शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. आता निदान रब्बी हंगामात तरी हाती काही लागेल का, या विवंचनेत शेतकरी आहेत.

इतर ताज्या घडामोडी
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...
नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...
शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...
मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर  : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...
दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...
कोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर  : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...
जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार  : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...