agriculture news in marathi, Jawar sowing is preferred in Jalgaon district | Agrowon

जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला पसंती
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल असून, चाऱ्याची गरज आणि पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकरी ज्वारीची पेरणी करीत आहेत. जिल्ह्यात तापीकाठासह कमी पाणी उपलब्ध असलेल्या भागात दादर व संकरित ज्वारी पेरणी सुरू आहे.

जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल असून, चाऱ्याची गरज आणि पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकरी ज्वारीची पेरणी करीत आहेत. जिल्ह्यात तापीकाठासह कमी पाणी उपलब्ध असलेल्या भागात दादर व संकरित ज्वारी पेरणी सुरू आहे.

काही शेतकरी परभणी कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या ज्वारीच्या वाणांची मागणी करीत आहेत. त्यात परभणी ज्योती वाणाची मागणी अधिक आहे. हे वाण जळगाव, चोपडा येथील बाजारात उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. यामुळे पारंपरिक दादरची पेरणी काही शेतकरी करीत आहेत. यंदा जेवढा हरभरा असेल, तेवढीच ज्वारी असेल, असा नवा अंदाज व्यक्त केला जात आहे. कारण हरभऱ्याला मागील वर्षी कवडीमोल दरात विकावे लागले. हरभऱ्याची काड, भुसा चारा म्हणून फारशी उपयोगात येत नाही. दुधाळ पशुधनासाठी ती वारंवार खाऊ घालणे शेतकरी अयोग्य मानतात. काबुली व इतर हरभऱ्यालाही दर नव्हते. शासकीय खरेदीची बोंबाबोंब झाल्याने अडचणी अधिक निर्माण झाल्या.

ज्वारीचे दरही बरे, चारा उपयुक्त
ज्वारी कमी पाण्यावर येणारे पीक आहे. दादर केवळ हवेतील आर्द्रतेवर येते. तिला काळ्या कसदार जमिनीत सिंचनाचीदेखील गरज नसते. संकरित ज्वारी एक दोनदा चांगले पट पद्धतीने सिंचन केले, तर जोमात येते. चारा चांगला मिळतो. यंदा चारा पुरेसा नाही. मागील वर्षी दादरचा कडबा ३६०० रुपये शेकडा होता. यामुळे कडब्यातच बऱ्यापैकी पैसा शेतकऱ्यांना मिळाला. म्हणून शेतकरी यंदा ज्वारी पेरणी वाढवीत असल्याचे चित्र आहे.
खानदेशात शहादा, शिंदखेडा, तळोदा, चोपडा, जळगाव, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव भागांत ज्वारीची पेरणी यंदा वाढू शकते, असा अंदाज आहे. ही पेरणी जवळपास ७० ते ८० हजार हेक्‍टरपर्यंत जाऊ शकते, असेही कृषी विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...