जायकवाडी भरले, गोदावरीत पाणी सोडले...

जायकवाडी धरण
जायकवाडी धरण

पैठण, जि. औरंगाबाद : जायकवाडी(नाथसागर) धरणात काल (गुरुवारी) रात्री १२ वाजता तब्बल १ लाख १७ हजार क्युसेक्सची आवक सुरू झाली. त्यामुळे सकाळची वाट न पाहता प्रकल्पातून गोदावरी पात्रात प्रारंभी १० हजार क्युसेक्सचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यासाठी जायकवाडी धरणाच्या २७ दरवाज्यांपैकी १० ते २७ क्रमांकाचे असे १८ दरवाजे ६ ईंच उघडण्यात आले आहेत. धरणाचे १ ते ९ क्रमांकाचे ९ दरवाजे हे आणीबाणीसाठी राखून ठेवण्यात आलेले आहेत. पाण्याची आवक व पाणलोटक्षेत्रातील पाऊस लक्षात घेऊन पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहेत. आवक सुरुच असल्याने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com