राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार; प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड निश्चित
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड निश्चित

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड करण्यात आली. तर प्रदेशाध्यक्षपदाची धुरा राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांच्याकडे सोपविण्याची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केली. 

माजी विधानसभाअध्यक्ष दिलीप वळसे पाटील , माजी अर्थमंत्री जयंत पाटील , शशिकांत शिंदे आणि विरोधी पक्षनेते जयंत पाटील यांची नावे प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत होती. नुकत्याच झालेल्या हल्लाबोल आंदोलनात जयंत पाटील यांनी सरकारविरोधात अतिशय आक्रमक भूमिका घेतली होती. तटकरे यांनी गेली चार वर्षे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. आता त्यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीसदी निवड झाली आहे.  पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची कार्यकारिणी बैठक आणि सर्वसाधारण सभा दुपारी मार्केट यार्ड येथील निसर्ग मंगल कार्यालयात सुरु झाली.  विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आल्याने त्यांचा ९ वर्षांचा प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्वसाधारण सभेस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दिलीप वळसे पाटील असणार असून, बैठकीला विधिमंडळ नेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांच्यासह सर्व माजी मंत्री, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांच्यासह एक हजार प्रतिनिधी उपस्थित आहेत. या सभेमध्ये पक्षाचे राष्‍ट्रीय अध्यक्ष शरद पवार विद्यमान राजकीय घडामाेडींवर भाष्य करणार आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com