agriculture news in marathi, jayant patil speaks about election planning, bhandara, maharashtra | Agrowon

समविचारी पक्षांशी युती करून निवडणूक लढविणार : जयंत पाटील
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

भंडारा  ः केंद्र आणि राज्यातील सरकारकडून जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे. या सरकारला खाली खेचण्यासाठी समविचारी पक्षांशी युती करून राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढविणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

भंडारा  ः केंद्र आणि राज्यातील सरकारकडून जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे. या सरकारला खाली खेचण्यासाठी समविचारी पक्षांशी युती करून राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढविणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

राज्यातील कार्यकर्त्यांशी संवाद व संघटनात्मक बांधणीसाठी १५ ऑगस्टपासून सेवाग्राम येथून राज्यव्यापी दौऱ्याची सुरवात करण्यात आली. या दौऱ्याअंतर्गत त्यांनी भंडारा येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी खासदार मधुकर कुकडे, माजी मंत्री अनिल देशमुख, नाना पंचबुद्धे, माजी आमदार राजेंद्र जैन, राष्ट्रवादीचे प्रदेश महासचिव धनंजय दलाल उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, की पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांत विकासात्मक कोणत्याच योजना राबविण्यात आल्या नाही. उद्योग उभारले गेले नाही, परिणामी या भागात बेरोजगारी वाढीस लागली आहे. भंडारा येथे भेल प्रकल्पदेखील भाजपने येऊ दिला नाही. सिंचन प्रकल्पांना गती दिली नाही. या जिल्ह्यावर भाजपचा इतका आकस असण्याचे कारण काय  असा प्रश्‍न त्यांनी या वेळी उपस्थित केला.

वर्धा आणि चंद्रपूर या दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात दारूचा सुळसुळाट झाला आहे. अवैध धंदे निर्माण करण्याचे यश या सरकारच्या खात्यावर जमा झाले आहे. केंद्र सरकारच्या धोरणांवर देखील त्यांनी या वेळी टीका केली.  देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आली असून आज एक डॉलर ७० रुपये २२ पैशांपर्यंत पोचला आहे. राज्यातील मराठा, धनगर, ओबीसींचे प्रश्‍न कायम आहेत. राज्यघटनेची प्रत जाळण्यात आली; त्या प्रकरणात आजवर कोणालाच अटक झाली नाही, हा चिंतेचा विषय असल्याचे देखील ते म्हणाले.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...